Friday, 13 February 2026

संसदीय लोकशाहीची कार्यप्रणाली व निवडणूक प्रक्रियेचा संदर्भ देत लोकप्रतिनिधींची कायदे व अर्थसंकल्प

 मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील सातवी तुकडी तसेच विधि विधान इंटर्नशिप’ कार्यक्रमातील पाचवी तुकडी यांच्या अभ्यासभेटीच्या निमित्ताने आयोजित मार्गदर्शन  सत्रात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३ डॉ. विलास आठवले यांनी कायदा निर्मिती आणि अर्थसंकल्प याबाबतची प्रक्रिया सविस्तरपणे सांगितली.

सचिव-३ डॉ. विलास आठवले म्हणाले कीकेंद्र व राज्य शासनाचे अधिकार वेगळे आहेत. केंद्र सूचीराज्य सूची आणि सामायिक सूची यांचा उल्लेख करूनकायदे बनविताना विषय कोणत्या सूचीत आहेहे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.  राज्य विधानमंडळाचे स्वरूपही त्यांनी मांडले.

 संसदीय लोकशाहीची कार्यप्रणाली व निवडणूक प्रक्रियेचा संदर्भ देत लोकप्रतिनिधींची कायदे व अर्थसंकल्प प्रक्रियेत भूमिका याबाबतही सांगितले. वित्त विभागअंदाज समिती आणि विधानमंडळ यांचे कार्य सांगितले. अर्थसंकल्प निर्मिती, संसदीय कार्यपद्धतीचे याबाबतही त्यांनी माहिती दिली.

सह सचिव नागनाथ थिटे यांनी समिती पद्धती व संसदीय आयुधे यावर मार्गदर्शन केले. विधानमंडळातील विविध समित्यांची कार्यपद्धतीत्यांचे महत्त्व तसेच संसदीय प्रक्रियेतील विविध साधनांचा (आयुधांचा) प्रभावी वापर याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.  प्रश्नोत्तरेलक्षवेधी सूचनातात्काळ विषयठरावविधानपरिषदेतील चर्चासत्रे आदी संसदीय साधनांचा उपयोग करून लोकांच्या प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते

 निष्ठाप्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते

-         विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

·         मुख्यमंत्री फेलोशिप’ व विधि विधान इंटर्नशिप’ तुकडी अभ्यासभेट

 

मुंबईदि. ११ :सामाजिक प्रश्न सोडविताना निष्ठाप्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते. प्रश्न फक्त प्रसिद्धीसाठी नव्हेतर सर्वसामान्यांच्या हितासाठी मांडले गेले पाहिजेतअसे प्रतिपादन 

विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

विधानभवनात 'मुख्यमंत्री फेलोशिपकार्यक्रमअंतर्गत कार्यरत फेलोजची सातवी तुकडी तसेच 'विधि विधान इंटर्नशिपउपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पाचवी तुकडी यांच्यासाठी अभ्यासभेटमार्गदर्शन व चर्चा-संवाद आयोजित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३ डॉ. विलास आठवले, कार्यक्रम समन्वयक प्रिया खानसह सचिव नागनाथ थिटेवि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने आणि मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील सातवी तुकडी आणि विधि विधान इंटर्नशिप’ उपक्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.

कामगार संहितेमध्ये ऑडीओ-व्हिज्युअल क्षेत्रातील कामगारांसाठी करण्यात

 कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले कीकामगार संहितेमध्ये ऑडीओ-व्हिज्युअल क्षेत्रातील कामगारांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींनुसार सिने क्षेत्रातील कलाकार व संबंधित कामगारांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार नवीन कामगार संहितेमध्ये त्यांना सामाजिकआर्थिक संरक्षणाच्या तरतुदी समाविष्ट आहेत.

 

 सिने कलाकारांना द्यावयाच्या संरक्षणाच्या तरतुदींबाबत सविस्तर सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्यानुषंगाने कामगार संहितेस अनुसरुन तयार करण्यात येणाऱ्या नियमांच्या प्रारुप अधिसूचनेच्या अनुषंगाने सूचना व हरकती सादर करण्याबाबत ‘सिंटा’च्या अध्यक्षांना सूचित करण्यात आले. अंतिम नियमांची अधिसूचना प्रसिध्द करण्यापूर्वी सिने कलाकारांकडून आलेल्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येतीलअसे कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.

००००००

नवीन कामगार संहितेच्या नियमांमध्ये सिने कलाकारांसाठी तरतुदी समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक

 नवीन कामगार संहितेच्या नियमांमध्ये

 सिने कलाकारांसाठी तरतुदी समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक

-         कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

 

मुंबईदि. ११ : नवीन कामगार संहिता केंद्र शासनाकडून तयार करण्यात आली असूनसदर संहितेअंतर्गत नियमावली तयार करण्यात येत आहे. नियमावलीची अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापूर्वी जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

 

सद्यस्थितीत सिने क्षेत्रातील कलाकारांसाठीत्यांच्या न्याय्य हक्कांबाबत नवीन कामगार संहितेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या नियमांमध्ये तरतूदी करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी कामगार मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदनकामगार आयुक्त एच. पी. तुम्मोडउपसचिव  रोशनी कदम-पाटीलअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेपूनम ढिल्लो यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महिला सशक्तीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रभावी व गुणवत्तापूर्ण

 महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी महिला सशक्तीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रभावी व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्यावर भर दिला. आदिशक्ती अभियानाचा मुख्य उद्देश महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणेत्यांची सुरक्षिततास्वावलंबन व आत्मविश्वास वाढविणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविणे असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभियानामुळे महिलांचा सामाजिकआर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील सहभाग अधिक बळकट होणार असून त्यासाठी ग्राम पातळीपासून राज्यस्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभियानाची अंमलबजावणी गांभीर्याने करावी तसेच ठरविण्यात आलेल्या उद्दिष्टांची वेळेत पूर्तता करावीअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणीप्रलंबित बाबी तसेच आवश्यक सुधारणा उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिशक्ती अभियान अधिक प्रभावी ठरावे यासाठी प्रशासनाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत व व्यापक जनजागृती करावीअसे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा

 आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास

 मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा

·         सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के सहभाग घेण्याच्या सूचना

 

मुंबईदि. ११  : आदिशक्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व राज्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावाअसे निर्देश महिला व बाल विकास मंत्री  आदिती तटकरे यांनी दिले.

 

मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी आदिशक्ती अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस सचिव डॉ. अनुप कुमार यादवआयुक्त नयना गुंडेएकात्मिक बालविकास सेवा योजनाचे कैलास पगारेराज्य महिला आयोगाचे सचिव नंदिनी आवडेविभागाचे सहसचिव विलास ठाकूर व उपसचिव आनंद भोंडवे उपस्थित होते. उपायुक्त जामसिंग गिरासे यांनी सादरीकरण केले. या बैठकीमध्ये राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रमाधिकारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऑनलाईन पद्धतीने बैठकीस उपस्थित होते.

पशुप्रदर्शन ऐतिहासिक

 पशुप्रदर्शन ऐतिहासिक

या प्रदर्शनात पशुपालकांना गायीम्हशीघोडेशेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळणार आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हेतर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालनआहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.

हा अत्यंत सुंदर योगायोग

महाशिवरात्र आणि महा पशुधन एक्सपो हा अत्यंत सुंदर योगायोग आहे. परळीत असे प्रदर्शन व्हावे अशी माझी इच्छा होती. नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

००००

Featured post

Lakshvedhi