Friday, 13 February 2026

पशुप्रदर्शन ऐतिहासिक

 पशुप्रदर्शन ऐतिहासिक

या प्रदर्शनात पशुपालकांना गायीम्हशीघोडेशेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळणार आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हेतर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालनआहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.

हा अत्यंत सुंदर योगायोग

महाशिवरात्र आणि महा पशुधन एक्सपो हा अत्यंत सुंदर योगायोग आहे. परळीत असे प्रदर्शन व्हावे अशी माझी इच्छा होती. नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi