कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, कामगार संहितेमध्ये ऑडीओ-व्हिज्युअल क्षेत्रातील कामगारांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींनुसार सिने क्षेत्रातील कलाकार व संबंधित कामगारांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार नवीन कामगार संहितेमध्ये त्यांना सामाजिक, आर्थिक संरक्षणाच्या तरतुदी समाविष्ट आहेत.
सिने कलाकारांना द्यावयाच्या संरक्षणाच्या तरतुदींबाबत सविस्तर सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्यानुषंगाने कामगार संहितेस अनुसरुन तयार करण्यात येणाऱ्या नियमांच्या प्रारुप अधिसूचनेच्या अनुषंगाने सूचना व हरकती सादर करण्याबाबत ‘सिंटा’च्या अध्यक्षांना सूचित करण्यात आले. अंतिम नियमांची अधिसूचना प्रसिध्द करण्यापूर्वी सिने कलाकारांकडून आलेल्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येतील, असे कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.
००००००
No comments:
Post a Comment