निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते
- विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे
· मुख्यमंत्री फेलोशिप’ व ‘विधि विधान इंटर्नशिप’ तुकडी अभ्यासभेट
मुंबई, दि. ११ :सामाजिक प्रश्न सोडविताना निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते. प्रश्न फक्त प्रसिद्धीसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हितासाठी मांडले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन
विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
विधानभवनात 'मुख्यमंत्री फेलोशिप' कार्यक्रमअंतर्गत कार्यरत फेलोजची सातवी तुकडी तसेच 'विधि विधान इंटर्नशिप' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पाचवी तुकडी यांच्यासाठी अभ्यासभेट, मार्गदर्शन व चर्चा-संवाद आयोजित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३ डॉ. विलास आठवले, कार्यक्रम समन्वयक प्रिया खान, सह सचिव नागनाथ थिटे, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने आणि मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील सातवी तुकडी आणि ‘विधि विधान इंटर्नशिप’ उपक्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment