Friday, 13 February 2026

संसदीय लोकशाहीची कार्यप्रणाली व निवडणूक प्रक्रियेचा संदर्भ देत लोकप्रतिनिधींची कायदे व अर्थसंकल्प

 मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील सातवी तुकडी तसेच विधि विधान इंटर्नशिप’ कार्यक्रमातील पाचवी तुकडी यांच्या अभ्यासभेटीच्या निमित्ताने आयोजित मार्गदर्शन  सत्रात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३ डॉ. विलास आठवले यांनी कायदा निर्मिती आणि अर्थसंकल्प याबाबतची प्रक्रिया सविस्तरपणे सांगितली.

सचिव-३ डॉ. विलास आठवले म्हणाले कीकेंद्र व राज्य शासनाचे अधिकार वेगळे आहेत. केंद्र सूचीराज्य सूची आणि सामायिक सूची यांचा उल्लेख करूनकायदे बनविताना विषय कोणत्या सूचीत आहेहे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.  राज्य विधानमंडळाचे स्वरूपही त्यांनी मांडले.

 संसदीय लोकशाहीची कार्यप्रणाली व निवडणूक प्रक्रियेचा संदर्भ देत लोकप्रतिनिधींची कायदे व अर्थसंकल्प प्रक्रियेत भूमिका याबाबतही सांगितले. वित्त विभागअंदाज समिती आणि विधानमंडळ यांचे कार्य सांगितले. अर्थसंकल्प निर्मिती, संसदीय कार्यपद्धतीचे याबाबतही त्यांनी माहिती दिली.

सह सचिव नागनाथ थिटे यांनी समिती पद्धती व संसदीय आयुधे यावर मार्गदर्शन केले. विधानमंडळातील विविध समित्यांची कार्यपद्धतीत्यांचे महत्त्व तसेच संसदीय प्रक्रियेतील विविध साधनांचा (आयुधांचा) प्रभावी वापर याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.  प्रश्नोत्तरेलक्षवेधी सूचनातात्काळ विषयठरावविधानपरिषदेतील चर्चासत्रे आदी संसदीय साधनांचा उपयोग करून लोकांच्या प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi