Thursday, 12 February 2026

ग्लोबल साऊथचा आवाज

 ग्लोबल साऊथचा आवाज

 

हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम विकसनशील देशांवर होतोपरंतु उपाययोजनांच्या चर्चेत त्यांना कमी महत्त्व मिळते. मुंबई क्लायमेट वीक ग्लोबल साऊथ देशांसाठी एक नेतृत्व मंच उपलब्ध करून देणार आहे. मुंबई क्लायमेट वीक व्यापक भागीदारीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक हा मुख्य भागीदार आहे. डेलॉईट ही धोरणात्मक ज्ञान भागीदार संस्था आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएसआणि आयआयटी बॉम्बे हे शैक्षणिक भागीदार आहेत.

एव्हरसोर्स कॅपिटलइंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्हशक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशनवर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडियाक्लायमेट ग्रुपसी 40, महिंद्रा ग्रुपइंडियन मर्चंट्स चेंबर यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग असणार आहे. युनिसेफच्या युवाह (YuWaah!) या उपक्रमाद्वारे  युवक सहभाग भागीदार असणार आहे.

अर्थशॉट प्राईज या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे विशेष सत्र होणार असून, या सत्रात निसर्ग, अन्न प्रणाली

 मुख्य केंद्रातील पहिल्या दिवशी अर्थशॉट प्राईज या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे विशेष सत्र होणार असूनया सत्रात निसर्गअन्न प्रणाली आणि मानव यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. केन्सिंग्टन पॅलेस (यूके) येथील पथकाच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा उपक्रम प्रिन्स विल्यम यांच्या संकल्पनेतून साकारलेला असूनमुंबई क्लायमेट वीकमध्ये तो प्रथमच आणि विशेष स्वरूपात सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात ग्लोबल साऊथमधील हवामान नवोन्मेषकप्रत्यक्ष उपाययोजना राबवणारे कार्यकर्ते तसेच भारतातील अग्रगण्य व्यक्ती सहभागी होणार असूनमोठ्या प्रमाणावर जनसहभाग वाढवण्याचा उद्देश आहे. याच कालावधीत विविध महाविद्यालयेवसाहती आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम होणार असूनत्यात रोड शोकला व माध्यम उपक्रम तसेच सस्टेनेबिलिटी मेला यांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे हवामान कृती दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हवामान चर्चेपासून प्रत्यक्ष उपायांकडे

 हवामान चर्चेपासून प्रत्यक्ष उपायांकडे

 

मुंबई क्लायमेट वीकचा उद्देश केवळ हवामान बदलावर चर्चा करणे नसूनप्रत्यक्ष अंमलात आणता येतील असे उपाय शोधणे आणि त्यांना गती देणे हा आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे तीन दिवस मुख्य कार्यक्रम होतीलतर मुंबई शहरभर महाविद्यालयेसमुदाय केंद्रे आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले जातील. त्यामध्ये नेतृत्व संवादविविध विषयांवरील ट्रॅक्स, MCW इनोव्हेशन चॅलेंजयूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज तसेच उपाययोजनांचे प्रदर्शन क्षेत्र आदींचा समावेश असणार आहे.

हब-अँड-स्पोक रचना म्हणजे एकाच वेळी धोरणात्मक चर्चा आणि लोकसहभाग दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होणार आहे. हवामान कृती ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहेहा संदेश यातून दिला जाणार आहे.

प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या वतीने

 प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मुंबईला भारत तसेच इतर ग्लोबल साऊथमधील शहरांसाठी हवामान उपाययोजनांची प्रयोगशाळा होणार आहे.

हवामान बदल ही भविष्यातील किंवा केवळ वैज्ञानिक चर्चेची गोष्ट राहिलेली नाही. पूर, उष्णतेच्या लाटा, अनियमित

 हवामान बदल ही  भविष्यातील किंवा केवळ वैज्ञानिक चर्चेची गोष्ट राहिलेली नाही. पूरउष्णतेच्या लाटाअनियमित पाऊसअन्नसुरक्षेची आव्हाने या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईत १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणारा मुंबई क्लायमेट वीक (MCW) हा भारतासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथ देशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

 

हा केवळ परिषदांचा कार्यक्रम नाहीतर संवादातून प्रत्यक्ष कृतीकडे जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शासनउद्योगतज्ज्ञयुवक आणि सामान्य नागरिक यांना एकाच मंचावर आणणे हे आहे

मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचा जागतिक मंच

 मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचा जागतिक मंच

 

मुंबईत होणारा भारतातील पहिला क्लायमेट वीक हा हवामान बदलावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीकडे नेणारा मंच ठरणार आहे. शासनउद्योगतज्ज्ञयुवक आणि नागरिक यांना एकत्र आणत हा उपक्रम ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा नमुना मांडणार आहे.

अन्नसुरक्षास्वच्छ ऊर्जा आणि शहरी शाश्वतता या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देत नवकल्पनायुवक सहभाग आणि लोकाभिमुख कार्यक्रमांद्वारे हवामान कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हवामान बदलावर उपाय म्हणजे सामूहिक जबाबदारी आणि तातडीची कृती हा यानिमित्ताने मुंबईतून दिला जाणारा संदेश स्पष्ट आहे....

मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचा जागतिक मंच

 मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचा जागतिक मंच

 

मुंबईत होणारा भारतातील पहिला क्लायमेट वीक हा हवामान बदलावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीकडे नेणारा मंच ठरणार आहे. शासनउद्योगतज्ज्ञयुवक आणि नागरिक यांना एकत्र आणत हा उपक्रम ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा नमुना मांडणार आहे.

अन्नसुरक्षास्वच्छ ऊर्जा आणि शहरी शाश्वतता या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देत नवकल्पनायुवक सहभाग आणि लोकाभिमुख कार्यक्रमांद्वारे हवामान कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हवामान बदलावर उपाय म्हणजे सामूहिक जबाबदारी आणि तातडीची कृती हा यानिमित्ताने मुंबईतून दिला जाणारा संदेश स्पष्ट आहे....

Featured post

Lakshvedhi