हवामान चर्चेपासून प्रत्यक्ष उपायांकडे
मुंबई क्लायमेट वीकचा उद्देश केवळ हवामान बदलावर चर्चा करणे नसून, प्रत्यक्ष अंमलात आणता येतील असे उपाय शोधणे आणि त्यांना गती देणे हा आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे तीन दिवस मुख्य कार्यक्रम होतील, तर मुंबई शहरभर महाविद्यालये, समुदाय केंद्रे आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले जातील. त्यामध्ये नेतृत्व संवाद, विविध विषयांवरील ट्रॅक्स, MCW इनोव्हेशन चॅलेंज, यूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज तसेच उपाययोजनांचे प्रदर्शन क्षेत्र आदींचा समावेश असणार आहे.
“हब-अँड-स्पोक” रचना म्हणजे एकाच वेळी धोरणात्मक चर्चा आणि लोकसहभाग दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होणार आहे. हवामान कृती ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे, हा संदेश यातून दिला जाणार आहे.
No comments:
Post a Comment