हवामान बदल ही भविष्यातील किंवा केवळ वैज्ञानिक चर्चेची गोष्ट राहिलेली नाही. पूर, उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, अन्नसुरक्षेची आव्हाने या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईत १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणारा मुंबई क्लायमेट वीक (MCW) हा भारतासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथ देशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
हा केवळ परिषदांचा कार्यक्रम नाही, तर संवादातून प्रत्यक्ष कृतीकडे जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शासन, उद्योग, तज्ज्ञ, युवक आणि सामान्य नागरिक यांना एकाच मंचावर आणणे हे आहे
No comments:
Post a Comment