ग्लोबल साऊथचा आवाज
हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम विकसनशील देशांवर होतो, परंतु उपाययोजनांच्या चर्चेत त्यांना कमी महत्त्व मिळते. मुंबई क्लायमेट वीक ग्लोबल साऊथ देशांसाठी एक नेतृत्व मंच उपलब्ध करून देणार आहे. मुंबई क्लायमेट वीक व्यापक भागीदारीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक हा मुख्य भागीदार आहे. डेलॉईट ही धोरणात्मक ज्ञान भागीदार संस्था आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) आणि आयआयटी बॉम्बे हे शैक्षणिक भागीदार आहेत.
एव्हरसोर्स कॅपिटल, इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह, शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशन, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडिया, क्लायमेट ग्रुप, सी 40, महिंद्रा ग्रुप, इंडियन मर्चंट्स चेंबर यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग असणार आहे. युनिसेफच्या युवाह (YuWaah!) या उपक्रमाद्वारे युवक सहभाग भागीदार असणार आहे.
No comments:
Post a Comment