कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, युरिया आणि डीएपी ही खते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी आहेत. पेरणीच्या तसेच उभ्या पिकांना दुसरा हप्ता देण्याच्या काळात मागणी वाढते. रेल्वे वाहतूक, आवंटन, आयात किंवा उत्पादनातील तांत्रिक कारणांमुळे पुरवठा विस्कळीत झाला तर शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुटवडा जाणवू नये, यासाठी आधीच संरक्षित साठा ठेवणे गरजेचे असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 11 February 2026
खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा आवश्यक
खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा आवश्यक
-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. 11 : खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा ठेवण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. खरीप हंगाम 2026 मध्ये युरिया आणि डीएपी खतांचा संरक्षित साठा मंजूर करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक पार झाली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संभाव्य मागणी, पुरवठा साखळीतील अडचणी आणि शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होण्याची गरज यासंदर्भात सविस्तर आढावा घेतला.
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामाजिक उत्तरदायित्व आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य मोलाचे
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामाजिक उत्तरदायित्व आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरते. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत 'एआयएफ' सोबत काम केल्यास तळागाळातील घटकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल असा विश्वासही निवासी गुंतवणूक आयुक्त गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतातील विविध राज्यांमध्ये कार्य करण्याचा अनुभव 'एआयएफ'कडे
गेल्या अडीच दशकांपासून भारतातील विविध राज्यांमध्ये कार्य करण्याचा अनुभव 'एआयएफ'कडे आहे. या अनुभवाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करण्याबाबत गुंतवणूक आयुक्त गायकवाड यांनी यावेळी चर्चा केली.
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामाजिक उत्तरदायित्व आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरते. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत 'एआयएफ' सोबत काम केल्यास तळागाळातील घटकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल असा विश्वासही निवासी गुंतवणूक आयुक्त गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.
अमेरिकन इंडिया फाऊंडेशनचे संचालक संघी यांनी यावेळी संस्थेच्या गेल्या 25 वर्षांतील कार्याचा आढावा सादर केला आणि महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक ते सर्व तांत्रिक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात 'एआयएफ' संस्था महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात 'एआयएफ' संस्था
महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक
नवी दिल्ली दि. 11 : महाराष्ट्रातील आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत परिवर्तनासह कौशल्य विकासासाठी 'अमेरिकन इंडिया फाऊंडेशन' (एआयएफ) आणि महाराष्ट्र शासन संयुक्तपणे काम करणार आहे. 'एआयएफ'चे संचालक कामेश संघी यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे नवी दिल्लीतील निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली अमेरिकन इंडिया फाऊंडेशन' संस्था शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार महाराष्ट्रात विविध प्रकल्प राबवण्यास उत्सुक आहे. या भागीदारीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य सुविधेला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच कौशल्य विकासासाठीही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. 'एआयएफ'ने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक प्राधान्यक्रमांनुसार संयुक्तपणे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्रातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करणे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कौशल्य विकास प्रकल्प राबवणे यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
शताब्दी महोत्सव मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या 350 व्या शहीदी
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर सहिब जी यांच्या 350 वी शहिदी समागम शताब्दी महोत्सव मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिर्मित्त श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचा गौरवशाली इतिहास सर्वाना माहित व्हावा, तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान यांचे स्मरण होण्याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या जीवन कार्यावर आधारित गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्याने, प्रभात फेरीचे आयोजन करावे.
‘हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमांची जिल्ह्यात व्यापक स्वरुपात जनजागृती करावी
‘हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमांची
जिल्ह्यात व्यापक स्वरुपात जनजागृती करावी
-जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते
धुळे, दि. 11 फेब्रुवारी 2026 (जिमाका वृत्तसेवा) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे होत आहे. यानिमित्त धुळे जिल्ह्यात या कार्यक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले.
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीद समागमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अरुण शेवाळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मोहनलाल वाडीले, समिती सदस्य जयवंत पवार, डॉ.साईदास चव्हाण, सुरेश कुंदनाणी, नवलसिंग पवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...