‘हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमांची
जिल्ह्यात व्यापक स्वरुपात जनजागृती करावी
-जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते
धुळे, दि. 11 फेब्रुवारी 2026 (जिमाका वृत्तसेवा) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे होत आहे. यानिमित्त धुळे जिल्ह्यात या कार्यक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले.
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीद समागमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अरुण शेवाळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मोहनलाल वाडीले, समिती सदस्य जयवंत पवार, डॉ.साईदास चव्हाण, सुरेश कुंदनाणी, नवलसिंग पवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment