Saturday, 24 January 2026

भारतीय वायू दलाचा एरोबॅटिक शो पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने

 भारतीय वायू दलाचा एरोबॅटिक शो पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने




गर्दी केली होती. धरणाच्या सभोवतालच्या भागात नागरिक उपस्थित होते. हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमने थरारक प्रात्यक्षिके सादर करीत नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर तेजेश्वर सिंहललित वर्माराहुल सिंहएडवर्ड प्रिन्सश्री. विष्णूअंकित वशिष्टसंजय सिंहविंग कमांडर जसबीर सिंहअभिमन्यू त्यागी यांनी वायू दलातील हॉक 132 या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या टीमने आकाशात रंगांची उधळण करताना इंग्रजीतील वायमिग विमानबाणप्रेमाचे प्रतिक साकारत नाशिककरांना समर्पित केले. तत्पूर्वी देशभक्तीपर विविध गीतांमुळे परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध देशभक्तीपर गीते सादर केली. या प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन फ्लाइट लेफ्ट. कवल संधू यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शोसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणीनाश्तास्वच्छताआरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपदा मित्रस्वयंसेवकलाइफ जॅकेटथ्रो बॅग्जसह आवश्यक साधनेउपकरणांनी सज्ज होता. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक गंगापूर धरणात गस्त घालत होते. तर कार्यक्रमापूर्वी ऑलम्पिक नौकानयनपटू दत्तू भोकनळ यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी गंगापूर धरणात नौकानयनची प्रात्यक्षिके सादर केली.

नाशिक एरोबॅटिक शो 2026 नाशिकच्या अवकाशात सूर्यकिरण टीमने साकारले बलशाली भारताचे प्रतिबिंब · हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनी भारावले नाशिककर, · ‘भारत माता की जय’ घोषाने दुमदुमला धरण परिसर






 नाशिक एरोबॅटिक शो 2026

नाशिकच्या अवकाशात सूर्यकिरण टीमने साकारले बलशाली भारताचे प्रतिबिंब

·         हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनी भारावले नाशिककर,

·         भारत माता की जय घोषाने दुमदुमला धरण परिसर

 

        नाशिकदि. 23 (जिमाका वृत्तसेवा): नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाशात शुक्रवारी भरदुपारी सूर्यकिरण एरो शो मुळे जणूकाही इंद्रधनु साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त होतेभारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण टीमने साकारलेल्या एरोबॅटीक शोचे. या प्रात्यक्षिकावेळी अवकाशात केशरीपांढरा आणि हिरवा रंग भरत बलशाली भारताचे प्रतिबिंब साकारले होते. याबरोबरच भारत माता की जय वंदे मातरम् च्या जयघोषाने गंगापूर धरण परिसर दुमदुमला. तसेच सूर्यकिरण टीमने शेवटचे प्रात्यक्षिक सादर करीत नाशिककरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले.

            भारतीय वायू दल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत दोन दिवसीय एरोबॅटिक शो गंगापूर धरण परिसरात पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेअन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळआमदार दिलीप बनकरजिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवलेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामकुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंहमहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीजिल्हाधिकारी आयुष प्रसादआशिमा मित्तल (जालना)जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवारपोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलअपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाणहेमांगी पाटीलसहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबेकश्मिरा संख्येजिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदेजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे (निवृत्त)ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळनिवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह सैन्य दलासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांची विशेष मुलाखत

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहिमेवर आधारित विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

 ‘जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित होणार असून पहिला भाग मंगळवार, 27 जानेवारी 2026 रोजी तर दुसरा भाग मंगळवार3 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध राहणार आहे. मुलाखत निवेदिका उन्नती जगदाळे यांनी घेतली आहे.

 

आरोग्य विभागामार्फत अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहीम 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सिकलसेल ॲनिमियाचा प्रतिबंधलवकर तपासणी व प्रभावी उपचार याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. सिकलसेल ॲनिमिया हा अनुवांशिक रक्तविकार असून त्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो.जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांनी विवाहपूर्व सिकलसेल तपासणीचे महत्त्वरुग्ण व वाहकांची ओळखगर्भावस्थेतील तपासणी तसेच शासनामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व उपचार सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

 

जनजागृतीच्या माध्यमातून सिकलसेल ॲनिमियाचा प्रसार रोखणे शक्य असूनया उद्दिष्टपूर्तीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने अरुणोदय’ मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत पाहता येणार आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे राष्ट्रीय मिलेट क्षेत्रातील

 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे राष्ट्रीय मिलेट क्षेत्रातील अनुभव आयआयएमआरहैदराबादच्या संचालक डॉ. तारा सत्यवतीबाजरी ब्रीडर डॉ. पी. संजना रेड्डी यांनी बाजरी संशोधनसुधारित वाण आणि धोरणात्मक हस्तक्षेपांवर प्रकाश टाकला. आयसीआरआयएसएटीहैदराबाद येथील जीन बँकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वेत्रिवेंद्रन मणी यांनी जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. ओडिशा मिलेट मिशनचे माजी अधिकारी दिनेश बालम यांनी ओडिशातील मिलेट चळवळीचा अनुभव उपस्थितांशी शेअर केला.या चर्चासत्रामुळे महाराष्ट्रात भरड धान्य पिकांवर आधारित उपाययोजना प्रणाली उभारण्यासाठी ठोस दिशा मिळेलअशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

                                                ००००

संध्या गरवारे/विसंअ

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे राष्ट्रीय मिलेट क्षेत्रातील

 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे राष्ट्रीय मिलेट क्षेत्रातील अनुभव आयआयएमआरहैदराबादच्या संचालक डॉ. तारा सत्यवतीबाजरी ब्रीडर डॉ. पी. संजना रेड्डी यांनी बाजरी संशोधनसुधारित वाण आणि धोरणात्मक हस्तक्षेपांवर प्रकाश टाकला. आयसीआरआयएसएटीहैदराबाद येथील जीन बँकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वेत्रिवेंद्रन मणी यांनी जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. ओडिशा मिलेट मिशनचे माजी अधिकारी दिनेश बालम यांनी ओडिशातील मिलेट चळवळीचा अनुभव उपस्थितांशी शेअर केला.या चर्चासत्रामुळे महाराष्ट्रात भरड धान्य पिकांवर आधारित उपाययोजना प्रणाली उभारण्यासाठी ठोस दिशा मिळेलअशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

                                                ००००

संध्या गरवारे/विसंअ

भरड धान्य पिक संवर्धन, आव्हाने, गरजा आणि भविष्यातील संधीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 भरड धान्य पिक संवर्धन, आव्हाने,

 गरजा आणि भविष्यातील संधीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन


     एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे जैवविविधता संचालक डॉ. ई. डी. इस्रायल ऑलिव्हर किंग यांनी भरड धान्य पिकांपुढील प्रमुख आव्हाने, गरजा आणि भविष्यातील संधी यावर सादरीकरण केले. यानंतर महिला शेतकऱ्यांचे थेट अनुभव ऐकून घेण्यात आले, ज्यामध्ये शेतीतील वास्तव अडचणी, ओळख, बाजारपेठ आणि संसाधनांपर्यंत पोहोच याबाबत त्यांनी आपले मत मांडले.


         ओडिशा मिलेट मिशनकडून मिळालेल्या अनुभवांचे सादरीकरण करण्यात आले, ज्यातून राज्यस्तरीय मिलेट उपक्रम यशस्वीपणे कसे राबवता येतात, याबाबत माहिती देण्यात आली. या सादरीकरणात राज्यातील विस्तार यंत्रणेची भूमिका आणि संधी स्पष्ट केल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत एनएआरपी, कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड, तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील एनएआरपीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. जी. पवार, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर. एस. इंगोले यांनी संशोधन, बियाणे विकास आणि क्षेत्रीय अंमलबजावणीवरील अनुभव मांडले.

“महिला शेतकऱ्यांची भूमिका बळकट करण्याच्या प्रयत्नांना

 महिला शेतकऱ्यांची भूमिका बळकट करण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सकारात्मक आणि पाठिंबा देणारे आहेत, असे डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. हवामान बदलामुळे शेतीपुढील अडचणी संरचनात्मक अडथळ्यांचा सामना याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.

         बीड येथील द्वारकाताई वाघमारे,धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील वैशाली घुगेपुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शांताबाई वारवे या महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या महिला शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. दैनंदिन शेतीमधील अडचणी शासनाने करावयाच्या उपाययोजना याबाबत मते मांडली.

         विदी लीगल सेंटर आणि एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी  यांची स्थानिक पातळीवरील आव्हाने आणि संभाव्य धोरणात्मक व कार्यक्रमात्मक उपाययोजनांवर चर्चा झाली. महिला शेतकऱ्यांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याबाबतही चर्चा झाली..gvgvvkq

Featured post

Lakshvedhi