राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे राष्ट्रीय मिलेट क्षेत्रातील अनुभव आयआयएमआर, हैदराबादच्या संचालक डॉ. तारा सत्यवती, बाजरी ब्रीडर डॉ. पी. संजना रेड्डी यांनी बाजरी संशोधन, सुधारित वाण आणि धोरणात्मक हस्तक्षेपांवर प्रकाश टाकला. आयसीआरआयएसएटी, हैदराबाद येथील जीन बँकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वेत्रिवेंद्रन मणी यांनी जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. ओडिशा मिलेट मिशनचे माजी अधिकारी दिनेश बालम यांनी ओडिशातील मिलेट चळवळीचा अनुभव उपस्थितांशी शेअर केला.या चर्चासत्रामुळे महाराष्ट्रात भरड धान्य पिकांवर आधारित उपाययोजना प्रणाली उभारण्यासाठी ठोस दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
संध्या गरवारे/विसंअ
No comments:
Post a Comment