भारतीय वायू दलाचा एरोबॅटिक शो पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने
गर्दी केली होती. धरणाच्या सभोवतालच्या भागात नागरिक उपस्थित होते. हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमने थरारक प्रात्यक्षिके सादर करीत नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर तेजेश्वर सिंह, ललित वर्मा, राहुल सिंह, एडवर्ड प्रिन्स, श्री. विष्णू, अंकित वशिष्ट, संजय सिंह, विंग कमांडर जसबीर सिंह, अभिमन्यू त्यागी यांनी वायू दलातील हॉक 132 या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या टीमने आकाशात रंगांची उधळण करताना इंग्रजीतील वाय, मिग विमान, बाण, प्रेमाचे प्रतिक साकारत नाशिककरांना समर्पित केले. तत्पूर्वी देशभक्तीपर विविध गीतांमुळे परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध देशभक्तीपर गीते सादर केली. या प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन फ्लाइट लेफ्ट. कवल संधू यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शोसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणी, नाश्ता, स्वच्छता, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपदा मित्र, स्वयंसेवक, लाइफ जॅकेट, थ्रो बॅग्जसह आवश्यक साधने, उपकरणांनी सज्ज होता. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक गंगापूर धरणात गस्त घालत होते. तर कार्यक्रमापूर्वी ऑलम्पिक नौकानयनपटू दत्तू भोकनळ यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी गंगापूर धरणात नौकानयनची प्रात्यक्षिके सादर केली.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment