प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीम
मुंबई, दि. 24 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली. राजशिष्टाचार विभागाच्या उप सचिव क्रांती पाटील यांनी ध्वजवंदन केले. यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांच्या वतीने या रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल; गोवा पोलीस; राज्य राखीव पोलीस बल; बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल; बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक; बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल; मुंबई लोहमार्ग पोलीस दल; गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-60 पथक; गृह रक्षक दल (पुरुष); बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल; गृहरक्षक दल (महिला); राज्य उत्पादन शुल्क विभाग; वन विभाग: मुंबई अग्निशमन दल; बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल; सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा; राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली); सी.कॅडेट कोअर (मुली); सी.कॅडेट कोअर (मुले); रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई; रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) सेंट पॉल हायस्कूल, दादर, मुंबई; रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल, दादर, मुंबई; रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) डॉ.अँटोनिओ डा सिल्वा हायस्कूल दादर, मुंबई; रोड सेफ्टी पेट्रोल, मनपा (मुली) वामनराव महाडिक उर्दू आणि पंतनगर मनपा इंग्रजी शाळा, घाटकोपर (पूर्व), मुंबई; रोड सेफ्टी पेट्रोल मनपा (मुले) जी.व्ही. स्कीम मुलुंड आणि क.दा. गायकवाड हिंदी शाळा, सायन भोईवाडा, मुंबई; भारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुली); भारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुले); स्टुडंट पोलीस कॅडेट (मुले/मुली) पुणे विद्याभवन पंतनगर आणि शिवाजी टेक्निकल स्कूल पंतनगर, मुंबई यांच्यासह पाईप बँड, महिला पाईप बँड, ब्रास बँड पथक, अश्वदल पोलीस पथक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे भारतीय नौदल, बृहन्मुंबई पोलीस दल, महिला निर्भया पथक आणि बृहन्मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनांनी संचलनात सहभाग घेतला. नौदलाचे कमांडर पंकज बघेल हे संचलन प्रमुख होते.
No comments:
Post a Comment