नाशिक एरोबॅटिक शो 2026
नाशिकच्या अवकाशात सूर्यकिरण टीमने साकारले बलशाली भारताचे प्रतिबिंब
· हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनी भारावले नाशिककर,
· ‘भारत माता की जय’ घोषाने दुमदुमला धरण परिसर
नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा): नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाशात शुक्रवारी भरदुपारी सूर्यकिरण एरो शो मुळे जणूकाही इंद्रधनु साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते, भारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण टीमने साकारलेल्या एरोबॅटीक शोचे. या प्रात्यक्षिकावेळी अवकाशात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग भरत बलशाली भारताचे प्रतिबिंब साकारले होते. याबरोबरच ‘भारत माता की जय’ वंदे मातरम् च्या जयघोषाने गंगापूर धरण परिसर दुमदुमला. तसेच सूर्यकिरण टीमने शेवटचे प्रात्यक्षिक सादर करीत नाशिककरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले.
भारतीय वायू दल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत दोन दिवसीय एरोबॅटिक शो गंगापूर धरण परिसरात पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आशिमा मित्तल (जालना), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, कश्मिरा संख्ये, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे (निवृत्त), ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह सैन्य दलासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment