Saturday, 17 January 2026

कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया

 कुतूहलसर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया -   डॉ. अजय कुमार सूद

मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद म्हणाले कीभारतीय युवक हा जागतिक स्तरावर परिवर्तनाचा वाहक ठरत असूनकुतूहलसर्जनशीलता व नवोपक्रम यांचा संगम असलेले शिक्षण हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरणार आहे.

शिक्षण पद्धतीत कुतूहल-केंद्रित अध्यापनसंकल्पनात्मक समज आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण या तीन बदलांची गरज आहे. दर्जेदार शिक्षणरोजगारक्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगती यामुळे भारताला जागतिक नेतृत्व प्राप्त होत असल्याचे डॉ. सूद यांनी सांगितले.

डॉ. सूद यांनी एस-लाइफ फ्रेमवर्कची संकल्पना मांडत विज्ञानाचे दैनंदिन जीवनाशी नातेप्रयोगशाळांचा पुनरुज्जीवनसंशोधनाचे अभ्यासक्रमात एकत्रीकरणविज्ञान महोत्सवांचे आयोजन आणि तरुणांचा डिजिटल सहभाग यावर भर दिला.भारत सरकारचा वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रम संशोधन क्षेत्रात लोकशाहीकरण करत असूनदेशातील लाखो विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत पोहोचू असल्याचेही ते म्हणाले. तसेचकृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित DPI 2.0 च्या माध्यमातून आरोग्यशेती आणि शाश्वत विकास क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.

महात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकरसरदार पटेल यांसारख्या दिग्गजांच्या पाऊलखुणांवर चालतआजचा युवक धैर्यसर्जनशीलता आणि वचनबद्धतेच्या बळावर सक्षम भारत घडवेलअशा शब्दांत डॉ. सूद यांनी नवस्नातकांना प्रेरित केले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) रविंद्र कुलकर्णी यांनी अहवालाचे वाचन केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन

 विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. विद्यार्थ्यांनी ‘कसे शिकायचे’ हे शिकण्यावर भर द्यावा. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक, समावेशक आणि आनंददायी होईल. यामुळे विज्ञानाबरोबरच कला, क्रीडा, संस्कृती आणि मूल्यशिक्षणाचा समावेश होऊन सर्वांगीण विद्यार्थी तयार होतील.


शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शिक्षकांना सक्षम करणे आणि शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्तींना आकर्षित करणे ही काळाची गरज आहे. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षण धोरणामुळे आत्मज्ञान, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारी असलेला विद्यार्थी घडेल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी नमूद केले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल

 राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

·         मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ

·         विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान

मुंबईदि. १७ :- मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडेलोकमान्य टिळकमहात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान विभूतींनी येथे शिक्षण घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवस्नातकांनी देशाच्या प्रगतीत आपले मोलाचे योगदान द्यावे.राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षमसृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचे भक्कम पायाभूत धोरण आहे. या धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना नवोपक्रमसंशोधन आणि उद्योजकतेची प्रेरणा मिळून देशाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सक्रीय सहभाग राहीलअसे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची श्रीमती वल्सा नायर - सिंग यांनी घेतली शपथ

 महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची

श्रीमती वल्सा नायर - सिंग यांनी घेतली शपथ

 

मुंबईदि. १७ : भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी श्रीमती वल्सा नायर- सिंग यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची व गोपनीयतेची शपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

 

कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेअपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेमुख्य सचिव राजेश अग्रवालऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आदींसह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

--------000

महिला लोकशाही दिनाचे १९ जानेवारी रोजी आयोजन

 महिला लोकशाही दिनाचे १९ जानेवारी रोजी आयोजन

 

मुंबईदि. १४ : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहर यांच्या वतीने महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार  महिला लोकशाही दिन सोमवार,  १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर येथे आयोजित करण्यात येणार आहेअसे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

या उपक्रमांतर्गत पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी व अर्ज सादर करण्यासाठी जिल्हा पातळीवर सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय२१५ बी.बी.डी. चाळपहिला मजलावरळीमुंबई – ४०००२५ येथे तक्रार अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.

तक्रार दाखल करताना अर्ज निर्धारित नमुन्यात भरावा. तक्रारी वैयक्तिक स्वरूपाच्या असाव्यात. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणेअपूर्ण अर्जधर्म व राजकारण विषयक बाबी अथवा वैयक्तिक स्वरूप नसलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीतअसेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर भारतीय मनुष्यबळ क्रियाशील ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कौशल्य विकासावर

 

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीजागतिक स्तरावर भारतीय मनुष्यबळ क्रियाशील ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कौशल्य विकासावर अधिक भर आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कौशल्य विभाग कार्यरत असून विविध देशांमध्ये राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधनीद्वारे कौशल्य प्रशिक्षण आणि जपानी भाषेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचेही कौशल्य विकास  मंत्री लोढा यांनी सागितले.

जपानमध्ये कृषीवैद्यकीयविविध तंत्रज्ञबांधकाम आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे. भारतीय युवक अधिक कार्यक्षमतेने काम करत असून भारतीय कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जगभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी सांगितले.

0000

सुधारित जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी घेतली कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट

 सुधारित

जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी घेतली

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट

 

मुंबई,दि. १४ :  राज्यातील कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येत्या तीन महिन्यात याबाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी मंत्रालयात कौशल्य विकास मंत्री लोढा यांची शिष्टमंडळासह भेट घेतली.

यावेळी कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची जपानमध्ये मोठी मागणी असल्याच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या संधीबाबत चर्चा करण्यात आली. कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा,कौशल्य विकास विभागाचे आयुक्त डॉ.अमित सैनीरतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकरव्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुखजपानच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे वरिष्ठ संचालक तोशिनोरी नाईतोपरदेशी मनुष्यबळ विभागाचे संचालक ईजी यामामोटो तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे संचालक माकोतो ताकाहाशीआंतरराष्ट्रीय व्यवसाय विनिमय विभागाच्या प्रमुख हिरोए मिकामी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाषांतराची जबाबदारी दुभाषी युका इगाराशी यांनी पार पाडली.

Featured post

Lakshvedhi