राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
· मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ
· विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान
मुंबई, दि. १७ :- मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान विभूतींनी येथे शिक्षण घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवस्नातकांनी देशाच्या प्रगतीत आपले मोलाचे योगदान द्यावे.राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचे भक्कम पायाभूत धोरण आहे. या धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची प्रेरणा मिळून देशाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सक्रीय सहभाग राहील, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment