विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. विद्यार्थ्यांनी ‘कसे शिकायचे’ हे शिकण्यावर भर द्यावा. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक, समावेशक आणि आनंददायी होईल. यामुळे विज्ञानाबरोबरच कला, क्रीडा, संस्कृती आणि मूल्यशिक्षणाचा समावेश होऊन सर्वांगीण विद्यार्थी तयार होतील.
शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शिक्षकांना सक्षम करणे आणि शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्तींना आकर्षित करणे ही काळाची गरज आहे. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षण धोरणामुळे आत्मज्ञान, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारी असलेला विद्यार्थी घडेल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment