कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, जागतिक स्तरावर भारतीय मनुष्यबळ क्रियाशील ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कौशल्य विकासावर अधिक भर आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कौशल्य विभाग कार्यरत असून विविध देशांमध्ये राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधनीद्वारे कौशल्य प्रशिक्षण आणि जपानी भाषेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचेही कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी सागितले.
जपानमध्ये कृषी, वैद्यकीय, विविध तंत्रज्ञ, बांधकाम आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे. भारतीय युवक अधिक कार्यक्षमतेने काम करत असून भारतीय कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जगभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment