सुधारित
जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी घेतली
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट
मुंबई,दि. १४ : राज्यातील कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येत्या तीन महिन्यात याबाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी मंत्रालयात कौशल्य विकास मंत्री लोढा यांची शिष्टमंडळासह भेट घेतली.
यावेळी कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची जपानमध्ये मोठी मागणी असल्याच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या संधीबाबत चर्चा करण्यात आली. कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा,कौशल्य विकास विभागाचे आयुक्त डॉ.अमित सैनी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, जपानच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे वरिष्ठ संचालक तोशिनोरी नाईतो, परदेशी मनुष्यबळ विभागाचे संचालक ईजी यामामोटो तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे संचालक माकोतो ताकाहाशी, आंतरराष्ट्रीय व्यवसाय विनिमय विभागाच्या प्रमुख हिरोए मिकामी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाषांतराची जबाबदारी दुभाषी युका इगाराशी यांनी पार पाडली.
No comments:
Post a Comment