Saturday, 17 January 2026

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जांसाठीचे पोर्टल २२ जानेवारीपर्यंत सुरू

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत

अर्जांसाठीचे पोर्टल २२ जानेवारीपर्यंत सुरू

 

मुंबईदि. १४ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएसएस) अंतर्गत २०२५-२६ साठी नुतनीकरणासाठी पात्र असलेले तसेच २०२४-२५ मधील डी-डुप्लिकेशन प्रक्रियेत समाविष्ट असलेले तथापि विहित कालावधीत अर्ज करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी एनएसपी २.० पोर्टल २२ जानेवारी २०२६ पर्यंत पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व संबंधित शाळांनी पात्र विद्यार्थ्यांचे नूतनीकरण अर्ज एनएसपी २.० पोर्टलवर २२ जानेवारीपूर्वी ऑनलाईन सादर करून घ्यावेत. त्याचप्रमाणे सर्व अर्जांची प्रथम स्तर आणि द्वितीय स्तर पडताळणी २२ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याने सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत मिळेलयाची दक्षता घ्यावीअसे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi