Thursday, 6 November 2025

सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर करावा

 सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा

 सविस्तर अहवाल सादर करावा

-         आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

मुंबईदि. 4 : राज्यातील कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गठीत सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

 

कातकरी जमातीच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने श्रमजीवी  संघटनेने विविध मागण्याबाबत निवेदन सादर केले होते. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी मंत्रालयात आढावा बैठक  घेतली. यावेळी आमदार स्नेहा पंडित व संबंधित अधिकारी व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच दुरदृश्य प्रणालीद्वारे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त,  ठाणे पालघर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

 

            मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणालेया समितीमार्फत कातकरी समाजाच्या शिक्षणआरोग्यनिवासरोजगारउद्योग प्रशिक्षणजमीन हक्क व सामाजिक सक्षमीकरण या सातही घटकांवर विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देऊन पुढील कालावधीसाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम करावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

ठाणे पालघर जिल्ह्यात कातकरी जमातीच्या लहान मुलांची खरेदी विक्रीबाल विवाहाच्या घटना ह्या गंभीर असून यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. या मुलांना बालमजुरीवेठबिगारी यातून मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

 

कोलामकातकरी व माडिया जमातीसाठी असणाऱ्या केंद्राच्या योजनांच्या अंतर्गत घरकुलाचा लाभ तात्काळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. कातकरी जमातीला आधार कार्ड मिळवून देण्यासाठी ठाणे पालघर प्रशासनाने कॅम्पचे आयोजन करावे. तसेच कातकरी जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची सूचना ही मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली

शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये महत्वाची

 शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये महत्वाची

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. ४ : शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्य महत्वाची असून त्यासाठी कार्यक्रम तयार करावा अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मंत्रालयात आज शासकीय शाळांमध्ये योग आणि जीवनकौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत बैठक झाली त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते.

 

,,यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीत सिंह देओल यांच्यासह संबंधित अधिकारी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

मुलांमध्ये चांगले विचार तयार होणे आणि चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले कीयोगा हा जीवन कौशल्यचा एक भाग आहे. तसेच स्व संरक्षण आणि कलागुणांनाही वाव मिळाला पाहिजे. मुलांमध्ये या सर्व गोष्टींचा विकास करण्यासाठी कर्यक्रम तयार करावा. प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्यातील काही शाळांमध्ये हा उपक्रम रबावण्यात यावा. तसेच येत्या आठ दिवसात या उपक्रमांचा आराखडा तयार करावाअशा सूचनाही मंत्री भुसे यांनी दिल्या.


नाशिक कुंभमेळ्याच्या कामांना गती द्या

 नाशिक कुंभमेळ्याच्या कामांना गती द्या

- सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह राजे भोसले

मुंबईदि. 4 - नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा घेतला. कुंभमेळ्याशी संबंधित कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नाशिक येथील कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबधित विविध कामांचा मंत्री भोसले यांनी आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) संजय दशपुतेसचिव बांधकामे आबासाहेब नागरगोजेनाशिकचे मुख्य अभियंता प्रशांत औटी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी शेखर सिंग दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी मंत्री भोसले यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या नाशिक विमानतळ विस्तारीकरणनाशिक येथील विश्रामगृहाचे दुरुस्ती व विस्तारीकरणत्र्यंबकेश्वर येथे नवीन विश्रामगृहाचे बांधकामसटाणा येथील विश्रामगृहाचे दुरुस्ती आदी कामांचा आढावा घेतला. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाची विविध कामे सुरू झाले आहेत. या कामांना गती देऊन वेळेत कामे पूर्ण करावेअसे मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील मुनावळे प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने राबवावी

 सातारा जिल्ह्यातील मुनावळे प्रकल्पासाठी

आवश्यक मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने राबवावी

- मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले

मुंबईदि. 4 : सातारा जिल्ह्यातील मुनावळे जल पर्यटन प्रकल्पास आवश्यक वन्यजीव व इतर विभागांची मंजुरी घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच या प्रकल्पासाठी लागणाऱ्या बोटीहाऊसबोट आदी साहित्य खरेदी लवकर करावीअशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केल्या.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरातील मुनावळे जल पर्यटन प्रकल्पाच्या कामाचा आज मंत्री भोसले यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय अधिकारी निलेश गटणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटीलएमटीडीसीचे विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांच्यासह इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने मुनावळे प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले वन्यजीव व इतर विभाग परवाने लवकरात लवकर घ्यावेत. तोपर्यंत प्रकल्पासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करावे. हाऊस बोटीबोटी दर्जेदार असावेयाची दक्षता घ्यावीअशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी केल्या.


नीलम गोऱ्हे यांनी राज्यातल्या अन्यायग्रस्त आणि वंचित, गोरगरीब महिलांसाठी अविरतपणे

 नीलम गोऱ्हे यांनी राज्यातल्या अन्यायग्रस्त आणि वंचितगोरगरीब महिलांसाठी अविरतपणे काम केले आहे. 'दाही दिशाहे त्यांचे पुस्तक म्हणजे या संघर्षाची कहाणीच आहे. हे पुस्तक फक्त आत्मचरित्र नाही तर एका संवेदनशील कार्यकर्त्याची अनुभवगाथाच असल्याचे असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या पुस्तकात नीलमताईंनी त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला आलेले अनुभव अशा रीतीने मांडले आहेत की ते आपल्या हृदयाला भिडतात. नीलमताईंचा प्रवास हा केवळ राजकीय नाहीतर सामाजिक जागृतीचा प्रवास आहे. महिलांसाठी फिरते मदत केंद्र सुरू करण्यापासून ते राज्यासाठी महिला धोरण ठरवण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांचे मोठे योगदान आहे. महिला अत्याचाराच्या घटना असोमुलींना मुरळी बनवण्याची प्रथा बंद करणे असोमहिला सरपंचांना अधिक बळ देणे असो अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी महिलांच्या हक्कासाठी त्यांनी ठामपणे भूमिका घेतली आहे.

नीलमताईंच्या लहानपणीच्या आठवणीही या पुस्तकात आहेत. त्यांच्यावर पंढरपूरचे त्यांचे आजोबा-आजी आणि आई-वडिलांनी दिलेले संस्कारशिक्षणाचे महत्त्व आणि सर्व जग विरोधात गेले तरी जिंकता येते ही शिकवण यात दिसते.

महाविद्यालयीन जीवनातत्यांनी युवकांच्या चळवळींमध्ये सहभाग घेतला आहेमराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आणि मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या भूमिका त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतात असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले

दाही दिशा' पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक

 दाही दिशा' पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित 'दाही दिशापुस्तकाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबई, दि. ४ :  दाही दिशाहे पुस्तक सामाजिकराजकीयशैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करते. हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हेतर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहेआणि महिलांच्या प्रश्नांवर सर्व बाजूंनी विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहेअसे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथील यशोदर्शन सभागृहात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित 'दाही दिशाया पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलउद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंतअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशीअभिनेत्री निवेदिता सराफसकाळ मुंबई आवृत्तीचे संपादक राहूल गडपालेसकाळ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगिर,  अंकित काणे (संपादक मल्टीमीडिया) आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही भूमिका घेतली आणि राज्यामध्ये रखडलेले प्रकल्प पुढे नेले. विकासप्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मार्गी लावला. कितीही काटकसर असलीतरीसुद्धा जे वचन दिले आहेजे शब्द आम्ही दिलेले आहेतते पाळणार आहे. महिला सक्षमीकरण अभियान, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', लेक लाडकीलखपती योजनामहिलांना एसटीमधून प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत योजना, मुलींना उच्च शिक्षणासाठी १०० टक्के सवलत योजना, पिंक रिक्षा आणि सारथीमहाज्योती यांच्या माध्यमातून मुलींना शिष्यवृत्ती योजना अशा लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकाची 5 पदे मंजूर

 बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी

सहयोगी प्राध्यापकाची 5 पदे मंजूर

बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापक गट-अ संवर्गाची पाच पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषांप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यपकांची पाच पदे मंजूर करण्यात आली असून यासाठी येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील पदे तसेच विद्यार्थी पदे अशा एकूण 510 पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे.


Featured post

Lakshvedhi