नाशिक कुंभमेळ्याच्या कामांना गती द्या
- सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह राजे भोसले
मुंबई, दि. 4 - नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा घेतला. कुंभमेळ्याशी संबंधित कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
नाशिक येथील कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबधित विविध कामांचा मंत्री भोसले यांनी आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) संजय दशपुते, सचिव बांधकामे आबासाहेब नागरगोजे, नाशिकचे मुख्य अभियंता प्रशांत औटी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी शेखर सिंग दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी मंत्री भोसले यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या नाशिक विमानतळ विस्तारीकरण, नाशिक येथील विश्रामगृहाचे दुरुस्ती व विस्तारीकरण, त्र्यंबकेश्वर येथे नवीन विश्रामगृहाचे बांधकाम, सटाणा येथील विश्रामगृहाचे दुरुस्ती आदी कामांचा आढावा घेतला. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाची विविध कामे सुरू झाले आहेत. या कामांना गती देऊन वेळेत कामे पूर्ण करावे, असे मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment