Wednesday, 8 October 2025

नुकसानग्रस्त किसानों के लिए 31,628 करोड़ रुपये का राहत पैकेज –

 नुकसानग्रस्त किसानों के लिए 31,628 करोड़ रुपये का राहत पैकेज

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

किसानों के लिए अब तक की सबसे बड़ी आर्थिक सहायता

 

मुंबईदिनांक 7 अक्टूबर : इस वर्ष राज्य में हुई भीषण अतिवृष्टि के कारण व्यापक स्तर पर फसलों का नुकसान हुआ है। इस आपदा से 29 जिले प्रभावित हुए हैंजिनमें 253 तालुके और 2,059 मंडल प्रभावित क्षेत्रों में शामिल हैं। किसानों को त्वरित राहत देने के लिए सरकार ने 65 मिमी वर्षा की शर्त हटाते हुए सभी प्रभावित किसानों को सामूहिक रूप से मुआवजा देने का निर्णय लिया हैऐसी जानकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दी।

मुख्यमंत्री ने घोषणा की कि राज्य के नुकसानग्रस्त किसानों के लिए 31,628 करोड़ रुपये का राहत पैकेज तैयार किया गया है। इस पैकेज के अंतर्गत सिंचित खेती के लिए प्रति हेक्टेयर 18,500 रुपयेमौसमी सिंचित फसलों के लिए 27,000 रुपयेतथा सिंचित फसलों के लिए 32,500 रुपये प्रति हेक्टेयर सहायता दी जाएगी। मुख्यमंत्री ने कहा कि यह किसानों के लिए सहायता दीवाली से पहले वितरित करने का प्रयास रहेगाऔर यह अब तक की सबसे बड़ी आर्थिक मदद है।

मंत्रिमंडल की बैठक के बाद मंत्रालय में आयोजित पत्रकार परिषद में मुख्यमंत्री फडणवीस ने किसानों के लिए की गई सहायता की सविस्तर जानकारी दी। इस अवसर पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारराजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळेकृषि मंत्री दत्तात्रय भरणेजलसंपदा मंत्री गिरीश महाजनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेमदद एवं पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकलोकनिर्माण मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेमुख्य सचिव राजेशकुमारतथा वित्तकृषि और पुनर्वसन विभाग के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि अतिवृष्टि के कारण फसलेंपशुधनघरदुकानें और खेती को भारी नुकसान हुआ है तथा कई लोगों की मृत्यु भी हुई है। मंत्रिमंडल के सदस्यों ने स्वयं प्रभावित क्षेत्रों का दौरा कर 10,000 रुपये की तात्कालिक मदद और खाद्यान्न सामग्री (गेहूंचावल आदि) उपलब्ध कराई। इसके लिए 2,200 करोड़ रुपये का पहला हप्ता तत्काल मंजूर किया गया है।

बीमित किसानों को शीघ्र सहायता दिलाने के लिए केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान स्वयं प्रयासरत हैं। साथ ही अबीमित किसानों को भी प्रति हेक्टेयर 17,000 रुपये की सहायता दी जाएगी। इस मुआवजे के लिए 18,000 करोड़ रुपये से अधिक का प्रावधान किया जाएगा।

मुख्यमंत्री ने बताया कि इस वर्ष 1.43 करोड़ हेक्टेयर क्षेत्र में खेती की गईजिसमें से 68.67 लाख हेक्टेयर क्षेत्र अतिवृष्टि से प्रभावित हुआ है।

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण

 पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. 7 : मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत महिलांच्या आरोग्याच्या गरजांचा विचार करून पूरग्रस्त महिलांसाठी वैयक्तिक स्तरावर पाच लाख सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले आहे. तसेच सक्षम फाउंडेशनतर्फे आणखी दहा हजार सॅनिटरी पॅड पूरबाधित महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात माध्यमांशी बोलताना दिली.

मंत्री तटकरे म्हणाल्यापूरामुळे अनेक कुटुंबांचे जगणे विस्कळीत झाले आहे. शासनामार्फत अन्नवस्त्र व आर्थिक साहाय्य दिले जात असले तरी महिलांच्या आरोग्याशी निगडित सॅनिटरी नॅपकीनसारख्या मूलभूत गरजाही पूर्ण करण्यात येत आहेत. राज्यातील पूरग्रस्तभागातील आठ ते नऊ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनाच्या राखीव निधीतून सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

त्याचबरोबर सामाजिक संस्थांना आवाहन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या कीमहिला व मुलींच्या आरोग्यसुरक्षेसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन पूरग्रस्त भागात मदतीचा हात द्यावा. पूरग्रस्त महिलांच्या सन्मान आणि आरोग्याच्या संरक्षणासाठी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच या महिलांसाठी आधारदायी ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0000

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या

 आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील

आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या

- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

            मुंबईदि. ७ : आरे परिसर व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांना आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईलअसे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले. तसेच आरे परिसरातील कुटुंबांना बजावण्यात आलेल्या निष्कासनाच्या नोटीसबाबतचा आढावाही त्यांनी घेतला.

मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीला जोगेश्वरी (पूर्व) येथील आमदार अनंत (बाळा) नरआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले कीआदिवासी पाड्यांवरील कोणत्याही कुटुंबाचे हक्क बाधित न होता कायद्यानुसार प्रक्रिया पार पाडावी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकूण ४३ आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांवर नवीन नागरी सुविधा देण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्रअतिक्रमित क्षेत्रातील विद्यमान नागरी सुविधांच्या दुरुस्तीस शासनाने परवानगी दिली आहे. पाड्यांवरील आदिवासी बांधवांना नागरी सुविधा मिळाव्यातयासाठी संबंधित विभागाने उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर करावाअशा सूचना मंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवरील प्रश्नांचा सखोल आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येईलअसेही मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

शेतकरी व उद्योजकांना मिळणारे आर्थिक साहाय्य, तांत्रिक मार्गदर्शन, पायाभूत सुविधा उभारणी

  प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी व उद्योजकांना मिळणारे आर्थिक साहाय्यतांत्रिक मार्गदर्शनपायाभूत सुविधा उभारणी आणि बाजारपेठेतील प्रवेश याबाबत सविस्तर चर्चा झाली. आशियाई विकास बँकेच्या शिष्टमंडळाने महिला सक्षमीकरणासाठी मॅग्नेट प्रकल्पाचे योगदान विशेष अधोरेखित करत समाधान व्यक्त केले. दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाने नवी मुंबईतील मे. एस.आर.पी. ओव्हरसीज या एकात्मिक मूल्य साखळी प्रकल्पाला भेट दिली. पॅकहाऊस व निर्यातसुविधांची पाहणी करून त्यांनी मिरची व चिकू निर्यातीतील प्रगतीची माहिती घेतली. नवी मुंबई येथे झालेल्या चर्चासत्रात राज्यातील विविध भागांतील १२ संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. संचालक मंडळाने त्यांच्याशी संवाद साधून प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत समाधान व्यक्त केले आणि भविष्यातील योजनांबाबत सूचना मागविल्या.

०००००

फलोत्पादन क्षेत्रातील विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि कृषी मूल्य साखळी बळकट करण्याच्या उद्देशाने मॅग्नेट

 पणन मंत्री रावल म्हणाले कीराज्यातील फलोत्पादन क्षेत्रातील विकासशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि कृषी मूल्य साखळी बळकट करण्याच्या उद्देशाने मॅग्नेट प्रकल्पाची अंमलबजावणी सहकारपणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. आशियाई विकास बँक आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने हा प्रकल्प २०२१-२२ ते २०२७-२८ या कालावधीत राबविण्यात येत असून त्याचा वित्तीय आराखडा १४२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका आहे.

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख १४ फळपिके आणि सर्व प्रकारच्या फुलांसाठी उत्पादन ते ग्राहकांपर्यंत एकात्मिक मूल्य साखळी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये शेतकरी उत्पादक संस्थानिर्यातदारप्रक्रिया उद्योगलघु व मध्यम उद्योजकस्वयंसहाय्यता गट आणि वित्तीय संस्था यांचा सक्रिय सहभाग आहे. मॅग्नेट प्रकल्पामुळे राज्यात गुंतवणूकमूल्यवर्धन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे. मॅग्नेट २.० या विस्तारित टप्प्यांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारपेठआधुनिक तंत्रज्ञानपॅकेजिंग-ब्रॅंडिंगकार्बन क्रेडिट्ससमृद्धी महामार्गावरील कृषी कॉरिडॉर आणि संस्था बळकटीकरण या घटकांचा समावेश असलेला आराखडा आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. त्याचबरोबर आशियाई विकास बँकेने महाराष्ट्रासाठी सातत्याने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत भविष्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला.

मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेल

 मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेल

- पणनमंत्री जयकुमार रावल

            मुंबईदि. ७ : महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या (मॅग्नेट) अंमलबजावणीला आशियाई विकास बँकेचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेलअसा विश्वास पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा मॅग्नेट सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

आशियाई विकास बँकेच्या संचालक मंडळाच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या १३ सदस्यीय शिष्टमंडळाबरोबर नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यावेळी मंत्री रावल बोलत होते. एडीबीच्या निम दोरजीवेहुआ ल्यूश्रीमती सुपाक चायवावानश्रीमती माझा सुवेर्ड्रुपश्रीमती हारुका सेकीयापोन्नुराज वेल्लुसामीश्रीमती लोईस नाकारीयोश्रीमती मियो ओकाकायवी योके.मुरुगाराजक्रिशन रौटेलाके.बालाजी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या दौऱ्यात फलोत्पादन क्षेत्रातील उपक्रमांचा आणि मॅग्नेट प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या मूल्यसाखळी विकासाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या वित्त व्यवहार विभागाचे अवर सचिव योमेश पंतमुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगीसहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेराजगोपाल देवरा आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम उपस्थित होते.

डिजिटल वॉरफेअर" मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन

 डिजिटल वॉरफेअर" मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन

          माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर क्राईमच्या रूपाने आव्हान उभे राहत आहेत. शासन अशा गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी यंत्रणांच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवत आहे. गैरप्रकार नियंत्रित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत. चित्रपट हे उत्कृष्ट समाजमाध्यम आहेया बदलाचा साक्षीदार होऊन अशा विषयांवर आधारित कथा, सिनेमे निर्माण केले जावेतयामधून या प्रयत्नांना बळ मिळेल. सायबर क्राईमसेक्सटॉर्शनसायबर फ्रॉड याबाबत जनसामान्यांना जागृत करणाऱ्या चित्रपटांतून हे घडू शकेल. यासाठी सायबर क्राईम विरोधात "डिजिटल वॉरफेअर" मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले.

यावेळी त्यांनी मुंबई शहरातील रस्ते विकास कामेपोलीस दलपायाभूत सुविधांची कामेभुयारी मार्गमेट्रोशहरातील वाहतूक व्यवस्था या अनुषंगाने प्रश्नांची उत्तरे देतमुंबई शहरातील विकास कामे पूर्ण झाल्यानंतर 59 मिनिटात शहरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणावर जाता येईलमुंबईकरांच्या प्रवास वेळेत बचत होईलअसे सांगितले.

या प्रकट मुलाखत प्रसंगी फिक्कीचे अनंत गोयंका,' मेटाच्या संध्या देवनाथनआशिष कुलकर्णीअर्जुन लोहार दीपेंद्र सिंह कुशवाह उपस्थित होते. तसेच चित्रपटप्रसार आणि समाज माध्यम क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.

00000

Featured post

Lakshvedhi