Wednesday, 8 October 2025

शेतकरी व उद्योजकांना मिळणारे आर्थिक साहाय्य, तांत्रिक मार्गदर्शन, पायाभूत सुविधा उभारणी

  प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी व उद्योजकांना मिळणारे आर्थिक साहाय्यतांत्रिक मार्गदर्शनपायाभूत सुविधा उभारणी आणि बाजारपेठेतील प्रवेश याबाबत सविस्तर चर्चा झाली. आशियाई विकास बँकेच्या शिष्टमंडळाने महिला सक्षमीकरणासाठी मॅग्नेट प्रकल्पाचे योगदान विशेष अधोरेखित करत समाधान व्यक्त केले. दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाने नवी मुंबईतील मे. एस.आर.पी. ओव्हरसीज या एकात्मिक मूल्य साखळी प्रकल्पाला भेट दिली. पॅकहाऊस व निर्यातसुविधांची पाहणी करून त्यांनी मिरची व चिकू निर्यातीतील प्रगतीची माहिती घेतली. नवी मुंबई येथे झालेल्या चर्चासत्रात राज्यातील विविध भागांतील १२ संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. संचालक मंडळाने त्यांच्याशी संवाद साधून प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत समाधान व्यक्त केले आणि भविष्यातील योजनांबाबत सूचना मागविल्या.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi