डिजिटल वॉरफेअर" मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर क्राईमच्या रूपाने आव्हान उभे राहत आहेत. शासन अशा गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी यंत्रणांच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवत आहे. गैरप्रकार नियंत्रित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत. चित्रपट हे उत्कृष्ट समाजमाध्यम आहे, या बदलाचा साक्षीदार होऊन अशा विषयांवर आधारित कथा, सिनेमे निर्माण केले जावेत, यामधून या प्रयत्नांना बळ मिळेल. सायबर क्राईम, सेक्सटॉर्शन, सायबर फ्रॉड याबाबत जनसामान्यांना जागृत करणाऱ्या चित्रपटांतून हे घडू शकेल. यासाठी सायबर क्राईम विरोधात "डिजिटल वॉरफेअर" मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले.
यावेळी त्यांनी मुंबई शहरातील रस्ते विकास कामे, पोलीस दल, पायाभूत सुविधांची कामे, भुयारी मार्ग, मेट्रो, शहरातील वाहतूक व्यवस्था या अनुषंगाने प्रश्नांची उत्तरे देत, मुंबई शहरातील विकास कामे पूर्ण झाल्यानंतर 59 मिनिटात शहरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणावर जाता येईल, मुंबईकरांच्या प्रवास वेळेत बचत होईल, असे सांगितले.
या प्रकट मुलाखत प्रसंगी ' फिक्की' चे अनंत गोयंका,' मेटा' च्या संध्या देवनाथन, आशिष कुलकर्णी, अर्जुन लोहार , दीपेंद्र सिंह कुशवाह उपस्थित होते. तसेच चित्रपट, प्रसार आणि समाज माध्यम क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment