दर्जेदार मराठी चित्रपट आणि नाटके अभिनव निर्मितीमुळे सक्षम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आशयघन व दर्जेदार मराठी चित्रपट आणि मराठी नाटके दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून त्यातील प्रयोगशिलता आणि अभिनव निर्मितीमुळे सक्षम ठरत आहे. मराठी चित्रपटाला सिनेमागृह न मिळण्याचा काळ मागे पडला असून आता एकाच वेळी दोन-दोन मराठी सिनेमे प्रदर्शित होतात आणि हाउसफुल होतात असे सांगून नटरंग, सखाराम बाईंडर यासह आताच्या दशावतार या चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला.
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी मुंबईत चित्रपट मुहूर्तमेढ रोवली. आज पर्यंत असंख्य हिंदी व मराठी चित्रपटांनी भावनाप्रधान कथानकातून प्रेक्षकांच्या मनामध्ये विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्य दर्शकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आत्ताच्या पिढीस ( gen - z) भावणारे व आवडणारे चित्रपट देण्यासाठी प्रयत्न केले जावेत. यातून ते चित्रपटांशी जोडले जातील.
No comments:
Post a Comment