Wednesday, 8 October 2025

स्वस्थ नारी सशक्त परिवार तीन महत्त्वाचे निर्णय pl शेअर

 या बैठकीत घेतलेले तीन महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :


नांदोश गढीचे उत्खनन : मालवण तालुक्यातील २८ गुंठे क्षेत्रफळ असलेल्या नांदोश गढीचे शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून त्यातील ऐतिहासिक वारसा जगासमोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्खननासाठी लागणारा निधी मंजूर करून कामाला तत्काळ सुरुवात होणार आहे.


भगवंतगडची पाहणी : सिद्धेश्वर मंदिर परिसरासह सुमारे २.५ एकर क्षेत्रफळातील भगवंतगडवरील संवर्धन आणि जतनासाठी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


रामगड ‘राज्य संरक्षित वास्तू’: मालवण तालुक्यातील पाच एकर क्षेत्रफळ असलेला रामगड किल्ला त्याच्या वास्तुशास्त्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया तत्काळ सुरू होईल.


या तिन्ही उपक्रमांसाठी स्थानिक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद सदस्य आणि खासगी जमिनींचे मालक यांच्या संमतीने काम राबवले जाणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.


यावेळी मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, नांदोश गढी, भगवंतगड आणि रामगड हे इतिहासाचे सजीव प्रतीक आहेत. या ठेव्याचे संवर्धन करणे हे आपले सामूहिक कर्तव्य असून शासन या दिशेने ठोस पावले उचलत आहे.

सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती

 सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. ७ : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेलाधार्मिक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी येथील नांदोश गढीचे शास्त्रीय उत्खननभगवंतगडची पुरातत्त्वीय पाहणी आणि रामगडला राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईलअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

मालवण तालुक्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मत्सव्यवसायबंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेपुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गेउपसचिव नंदा राऊत तसेच चिंदरचे उपसरपंच महेंद्र मांजरेकरनांदोशी उपसरपंच विजय निकमसंतोष गावकरहेमंत दळवीधोंडू चिंदरकरशुभम मटकरग्रामसेवक सरिता धामापूरकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

            मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणाच्या विकासासाठी ठोस कार्यक्रम सुरू आहे. कोकणाच्या या वारशात सिंधुदुर्गलाही आपला हक्काचा वाटा मिळावाहे आमचे ध्येय आहे.

Tuesday, 7 October 2025

समुपदेशन सत्रे (SNSPA गुगल शीट)

 समुपदेशन सत्रे (SNSPA गुगल शीट)

•           लाभार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले: १७,०८,४४५ पुरुष४७,९९,५७१ महिला

•           शाळांमध्ये देखील सत्रे आयोजित करण्यात आली

पीएमजेएवाय/वय वंदना कार्ड (आयुष्मान भारत पोर्टल)

•           ,०२,१७३ कार्ड जारी

आभा कार्ड

•           १५,०१,५०० कार्ड जारी

रक्तदान (ई-रक्तकोश पोर्टल)

•           ,९६९ शिबिरे आयोजित

•           ५१,३३९ रक्त युनिट गोळा

अवयवदान (एसएनएसपीए पोर्टल)

•           ४७६५ लाभार्थ्यांनी अवयवदानासाठी प्रतिज्ञा घेतली. 

अभियानाच्या शुभारंभाच्या दिवशीच १,४६,७९८ नागरिकांना २० प्रकारच्या विविध आरोग्य सेवा,pl share

 अभियानाच्या शुभारंभाच्या दिवशीच १,४६,७९८ नागरिकांना

२० प्रकारच्या विविध आरोग्य सेवा

            राज्यात ‘स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबर २०२५ रोजी विविध विभागात मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या दिवशी एकूण १,४६,७९८ नागरिकांना विविध आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. ठाणे विभागात सर्वाधिक ३२,२९९ लाभार्थीकोल्हापूर जिल्ह्यात २४,९५० लाभार्थीतर नागपूर विभागात - २४,६०४ लाभार्थी होते.

            शुभारंभ दिनी या अभियानांतर्गत ११७ विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. एनसीडी तपासणी शिबिरांत १७,७७९ लाभार्थीनेत्र तपासणीत ३,१०४दंत तपासणीत ३,३५८तर मातृ आणि बाल आरोग्य शिबिरांत ७,३२२ महिलांची तपासणी करण्यात आली. महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी घेतलेल्या पोषण जनजागृती सत्रात १०,०९१ महिला व बालकांनी सहभाग घेतला. याशिवायमोफत औषध वितरण शिबिरांद्वारे २७,३४४ लाभार्थ्यांना औषधे पुरविण्यात आली११,३४५ नागरिकांच्या डायग्नॉस्टिक तपासण्या पार पडल्यातर कर्करोग तपासणी व जनजागृती सत्रांमध्ये ९,८४२ नागरिकांचा सहभाग नोंदविण्यात आला. मानसिक आरोग्य समुपदेशन शिबिरांद्वारे ४,२९६ नागरिकांना मार्गदर्शन मिळालेतसेच व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमांत ३,३५७ नागरिकांनी सहभाग घेतला. स्वच्छता आणि आरोग्य जनजागृती - ७,७५५ लाभार्थीआरोग्य मेळावे - ८,०३२शाळांमधील तपासण्या - ६,५९१ आणि रक्तदान शिबिरांमध्ये ७१५ रक्तदाते यामुळे अभियानाला सर्वांगीण प्रतिसाद मिळाला.

            या व्यापक प्रयत्नांतून राज्यभरात आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागली असूनमहिलांचे आरोग्य सशक्त करण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

अभियानाची वैशिष्ट्ये

शिबिरांचे आयोजन (एसएनएसपीए पोर्टल)

•           एकूण : २,३०,६५३ शिबिरे (३४१३ विशेष शिबिरांसह)

•           एकूण लाभार्थी : १,०८,५९,३३२ (३२,७१,७७१ पुरुष आणि ७५,८७,५६१ महिला)

 

इतर संस्था (केंद्रीय सरकारी संस्थावैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी संस्था)

• एकूण शिबिरे : १८६०

• एकूण लाभार्थी : ४,६३,१३३

असंसर्गजन्य रोग (एनसीडी) तपासणी (एनसीडी पोर्टल)

•           उच्च रक्तदाब तपासणी: १४,४१,६४८ लाभार्थी

•           मधुमेह तपासणी: १४,९८,२१९ लाभार्थी

•           कर्करोग तपासणी: ६,१८,३९३ (तोंडी कर्करोग),२०,१६४ (स्तन कर्करोग) २,४१,१४८ (गर्भाशयाचा कर्करोग) लाभार्थी

प्रजनन आणि बाल आरोग्य (आरसीएच पोर्टल)

•           एएनसी क्लिनिकमध्ये (आरसीएच पोर्टल) ४,३८,३४५ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली.

U-WIN पोर्टल

•           अॅनिमिया तपासणी: १०,१६,१९८ लाभार्थी

•           लसीकरण करण्यात आले: १,८८,२६१ मुले

नि-क्षय (टीबी) कार्यक्रम (नि-क्षय पोर्टल)

•           १३,१३,६३५ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली (६,५९,९९५ पुरुष आणि ६,५२,६२१ महिला)

•           १५,०२७ नि-क्षय मित्रांची नोंदणी

सिकलसेल तपासणी (SNSPA गुगल शीट)

•           तपासणी करण्यात आली: १,०३,८६२ पुरुष,७३,५०० महिला

•           सिकल सल कार्ड वितरित केले: ५६,०२५ पुरुष,२६,७३७ महिला

लोकप्रतिनिधींचा आणि प्रसार माध्यमांचा सक्रिय सहभाग

 लोकप्रतिनिधींचा आणि प्रसार माध्यमांचा सक्रिय सहभाग

            जिल्हा आणि महापालिका क्षेत्रामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवून या अभियानाला प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीही या अभियानाला आपला पाठिंबा देत अभियानांतर्गत शिबिरांची माहिती देऊन जनजागृती केली.

            या अभियानात राबविण्यात आलेल्या व पुरविण्यात आलेल्या सेवा-सुविधांचातपासणी व निदानातून आढळलेल्या आजारांचा पाठपुरावा संबंधित जिल्ह्यातील आरोग्य संस्था करणार असून यामुळे सामान्य नागरिकांना व विशेषतः महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

            या अभियानामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १०,७६६ उपकेंद्रे१९३९ प्राथमिक आरोग्य केंद्रे७९७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे,०४० शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रे३७२ ग्रामीण रुग्‍णालये१०२ उपजिल्‍हा रुग्‍णालयेआठ सामान्‍य रुग्‍णालये२२ स्‍त्री रुग्‍णालयेदोन संदर्भ सेवा रुग्‍णालये व १९ जिल्‍हा रुग्‍णालये तसेच विभागातील डॉक्टर्सनर्सेसअधिकारीकर्मचारीआशा स्वयंसेविकाअंगणवाडी सेविका यांनी हिरीरीने सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी केले.

            या अभियानाचे उद्दिष्ट केवळ तपासणी नव्हेतर आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि महिलांना आरोग्यदृष्ट्या सक्षम करणे हे होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आरोग्य जनआंदोलनाच्या दिशेने एक सकारात्मक टप्पा आहे.

महिला सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्य संवर्धनासाठी

 महिला सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्य संवर्धनासाठी एकूण ६५ लाखांहून अधिक नागरिकांना समुपदेशनद्वारे मार्गदर्शन देण्यात आले. ही सत्रे शाळांमध्येही आयोजित करण्यात आलीज्यातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जागरूकता निर्माण झाली.

•           याशिवायआयुष्मान भारत (पीएमजेएवाय/ वय वंदना) अंतर्गत ७.२ लाख लाभार्थ्यांना आरोग्य कार्ड तर १५.१ लाख नागरिकांना आभा कार्डांचे वितरण करण्यात आले.

•           रक्तदानासाठी १,९६९ शिबिरांमध्ये ५१,३३९ रक्त युनिट्स संकलित करण्यात आले. तसेच ४,७६५ नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेतली. आरोग्य जनजागृतीतील हे एक मोठे पाऊल ठरले असून महाराष्ट्र हे याबाबतील प्रथम स्थानी आहे.

अभियानादरम्यान विविध आरोग्य घटकांवर लक्ष

 अभियानादरम्यान विविध आरोग्य घटकांवर लक्ष

•           असंसर्गजन्य आजारांवरील तपासण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. १४ लाख ४१ हजार ६४८ नागरिकांची रक्तदाबासाठी तर १४ लाख ९८ हजार २१९ नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली. कर्करोग तपासणी अंतर्गत ६ लाख १८ हजार ३९३ मुख कर्करोग३ लाख २० हजार १६४ स्तनाच्या आणि २ लाख ४१ हजार १४८ गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासण्या करण्यात आल्या.

•           केंद्रीय सरकारी संस्थावैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी संस्था अशा इतर संस्थांनी एकूण १८६० शिबिरांचे आयोजन केले. त्यामध्ये ४,६३,१३३ नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

•           महिला आणि बाल आरोग्य उपक्रमांतर्गतआरसीएच पोर्टलद्वारे ४ लाख ३८ हजार ३४५ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. यू-विन पोर्टलअंतर्गत १ लाख ८८ हजार २६१ बालकांचे लसीकरण करण्यात आले. १० लाख १६ हजार १९८ लाभार्थ्यांची अॅनिमिया तपासणी करण्यात आली.

•           क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत एकूण १३ लाख १३ हजार ६३५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून १५,०२७ नि-क्षय मित्रांनी नोंदणी केली. त्याचबरोबर सिकलसेल तपासणीत ३ लाख ७७ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. १.८३ लाख महिला व पुरुषांना सिकलसेल कार्ड्स वितरित करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi