Wednesday, 8 October 2025

सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती

 सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. ७ : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेलाधार्मिक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी येथील नांदोश गढीचे शास्त्रीय उत्खननभगवंतगडची पुरातत्त्वीय पाहणी आणि रामगडला राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईलअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

मालवण तालुक्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मत्सव्यवसायबंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेपुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गेउपसचिव नंदा राऊत तसेच चिंदरचे उपसरपंच महेंद्र मांजरेकरनांदोशी उपसरपंच विजय निकमसंतोष गावकरहेमंत दळवीधोंडू चिंदरकरशुभम मटकरग्रामसेवक सरिता धामापूरकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

            मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणाच्या विकासासाठी ठोस कार्यक्रम सुरू आहे. कोकणाच्या या वारशात सिंधुदुर्गलाही आपला हक्काचा वाटा मिळावाहे आमचे ध्येय आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi