Wednesday, 8 October 2025

स्वस्थ नारी सशक्त परिवार तीन महत्त्वाचे निर्णय pl शेअर

 या बैठकीत घेतलेले तीन महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :


नांदोश गढीचे उत्खनन : मालवण तालुक्यातील २८ गुंठे क्षेत्रफळ असलेल्या नांदोश गढीचे शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून त्यातील ऐतिहासिक वारसा जगासमोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्खननासाठी लागणारा निधी मंजूर करून कामाला तत्काळ सुरुवात होणार आहे.


भगवंतगडची पाहणी : सिद्धेश्वर मंदिर परिसरासह सुमारे २.५ एकर क्षेत्रफळातील भगवंतगडवरील संवर्धन आणि जतनासाठी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


रामगड ‘राज्य संरक्षित वास्तू’: मालवण तालुक्यातील पाच एकर क्षेत्रफळ असलेला रामगड किल्ला त्याच्या वास्तुशास्त्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया तत्काळ सुरू होईल.


या तिन्ही उपक्रमांसाठी स्थानिक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद सदस्य आणि खासगी जमिनींचे मालक यांच्या संमतीने काम राबवले जाणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.


यावेळी मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, नांदोश गढी, भगवंतगड आणि रामगड हे इतिहासाचे सजीव प्रतीक आहेत. या ठेव्याचे संवर्धन करणे हे आपले सामूहिक कर्तव्य असून शासन या दिशेने ठोस पावले उचलत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi