Wednesday, 8 October 2025

प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा

 प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित

टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. ७ :  ॲप आधारित टॅक्सीरिक्षा व ई-बाईक टॅक्सीसाठी समुच्चयक धोरण नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होत असून त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सीरिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना  प्रवासी व चालकांना  केंद्रस्थानी ठेवावे. नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून व्यवसाय वृद्धी करु नयेशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या.

  मंत्रालयात इंडियन फेडरेशन ऑफ ॲप -बेस ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळपरिवहन आयुक्त विवेक भीमनवारसह सचिव (परिवहन) किरण होळकर यांच्यासह आयएफएटी चे अध्यक्ष प्रशांत सावर्डेक


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi