लोकप्रतिनिधींचा आणि प्रसार माध्यमांचा सक्रिय सहभाग
जिल्हा आणि महापालिका क्षेत्रामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवून या अभियानाला प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीही या अभियानाला आपला पाठिंबा देत अभियानांतर्गत शिबिरांची माहिती देऊन जनजागृती केली.
या अभियानात राबविण्यात आलेल्या व पुरविण्यात आलेल्या सेवा-सुविधांचा, तपासणी व निदानातून आढळलेल्या आजारांचा पाठपुरावा संबंधित जिल्ह्यातील आरोग्य संस्था करणार असून यामुळे सामान्य नागरिकांना व विशेषतः महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या अभियानामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १०,७६६ उपकेंद्रे, १९३९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ७९७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, १,०४० शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रे, ३७२ ग्रामीण रुग्णालये, १०२ उपजिल्हा रुग्णालये, आठ सामान्य रुग्णालये, २२ स्त्री रुग्णालये, दोन संदर्भ सेवा रुग्णालये व १९ जिल्हा रुग्णालये तसेच विभागातील डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी हिरीरीने सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी केले.
या अभियानाचे उद्दिष्ट केवळ तपासणी नव्हे, तर आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि महिलांना आरोग्यदृष्ट्या सक्षम करणे हे होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आरोग्य जनआंदोलनाच्या दिशेने एक सकारात्मक टप्पा आहे.
No comments:
Post a Comment