Thursday, 11 September 2025

तृतीयपंथीनाही समान वागणूक मिळावी यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी -

 तृतीयपंथीनाही समान वागणूक मिळावी यासाठी

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

 

मुंबई, दि. 10 : समाजातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणआरोग्य आणि रोजगारात समान संधी देत योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच त्यांना मोफत  व उच्च शिक्षण मिळावे यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. आतापर्यंत 4783 तृतीयपंथीयांना ओळखपत्र जारी करण्यात आले आहेत. उर्वरित ओळखपत्र लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

तृतीयपंथीयांच्या सर्वांगिण विकासासाठी नवीन योजना तयार करणेधोरणांचा आढावास्वतंत्र कक्षओळखपत्रस्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण देण्याबाबत तसेच विभागीय व जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले. यावेळी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांसह तृतीयपंथी संरक्षण व कल्याण महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यास प्राधान्य

 नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना

सुखरुप परत आणण्यास प्राधान्य

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबई दि. १० :- नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नयेअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

              राज्यातील ठाणेपुणेमुंबईलातूरकोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खासगी वाहनाने परत येण्यासाठी निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेतअशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाकडून जाहीर

 राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाकडून  जाहीर

 

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल घोषित केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  राज्य सेवा मुख्य परीक्षा- २०२४ दि. २७ ते २९ मे,२०२५ या  कालावधीत घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र ठरलेल्या १५१६ उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम टप्प्याटप्प्याने लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या निकालाकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले होते. निकाल वेळेवर जाहीर झाल्यामुळे उमेदवारांच्या भावी नियोजनाला गती मिळणार आहे. मुलाखतीचे वेळापत्रक व पुढील सर्व माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://mpsc.gov.in उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोगाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

००००

स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणार –

 स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणार – कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेनव्या धोरणांतर्गत मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड उभारण्यात येईल. शासनाकडे नोंद असलेल्या ३० लाख तंत्रशिक्षित युवक-युवतींना ईमेलद्वारे एआय परीक्षेत सहभागी केले जाईल. त्यातून पाच लाख उमेदवारांची निवड होईल. पुढील चाळणीनंतर १ लाख उमेदवारांना स्पर्धाहॅकेथॉन व चाचण्यांतून संधी दिली जाईल. अंतिम टप्प्यात २५ हजार निवडक उमेदवारांना तांत्रिक सहाय्यआर्थिक मदत व प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक व स्टार्टअप्स घडविण्याचे उद्दिष्ट आहे.

महिला सक्षमीकरणासाठी महिला-केंद्रित इनक्यूबेटरविशेष आर्थिक मदततसेच लेदर इन्स्टिट्यूटवांद्रे येथे मिशन इनोव्हेशन २०४७ या नावाने जागतिक दर्जाचे केंद्र स्थापन होणार आहे. तसेच ग्लोबल महाराष्ट्र इनोव्हेशन समिट आयोजित करून प्रमुख २० जागतिक प्रवर्गांसोबत भागीदारी करीत ₹५०,००० कोटींच्या थेट परदेशी गुंतवणुकीचे (FDI) उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणार –

 स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणार – कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेनव्या धोरणांतर्गत मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड उभारण्यात येईल. शासनाकडे नोंद असलेल्या ३० लाख तंत्रशिक्षित युवक-युवतींना ईमेलद्वारे एआय परीक्षेत सहभागी केले जाईल. त्यातून पाच लाख उमेदवारांची निवड होईल. पुढील चाळणीनंतर १ लाख उमेदवारांना स्पर्धाहॅकेथॉन व चाचण्यांतून संधी दिली जाईल. अंतिम टप्प्यात २५ हजार निवडक उमेदवारांना तांत्रिक सहाय्यआर्थिक मदत व प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक व स्टार्टअप्स घडविण्याचे उद्दिष्ट आहे.

महिला सक्षमीकरणासाठी महिला-केंद्रित इनक्यूबेटरविशेष आर्थिक मदततसेच लेदर इन्स्टिट्यूटवांद्रे येथे मिशन इनोव्हेशन २०४७ या नावाने जागतिक दर्जाचे केंद्र स्थापन होणार आहे. तसेच ग्लोबल महाराष्ट्र इनोव्हेशन समिट आयोजित करून प्रमुख २० जागतिक प्रवर्गांसोबत भागीदारी करीत ₹५०,००० कोटींच्या थेट परदेशी गुंतवणुकीचे (FDI) उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Wednesday, 10 September 2025

राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणा तातडीने अमलात आणाव्यात

 राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणा तातडीने अमलात आणाव्यात

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र इनोव्हेशन सिटीच्या पायाभरणीसाठी कार्यवाहीचे निर्देश

 

मुंबईदि. १० : राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणांसाठी आलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करावीतसेच स्टार्टअप्सच्या मार्गदर्शनासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. इतर राज्यांमध्ये स्टार्टअप वाढीसाठी प्रयत्न होत असताना महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी कायम राखली पाहिजे. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारणीसाठी गतीने कार्यवाही करून पायाभरणी लवकरच करण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या राज्य नाविन्यता सोसायटीच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढाअपर मुख्य सचिव मनीषा वर्मामुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेरतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकरसचिव डॉ.श्रीकर परदेशीआयुक्त लहूराज माळीज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकरमित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशीमाहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ताउच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. बी. वेणुगोपाल रेड्डीसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्य नाविन्यता सोसायटी अधिक सक्षम करण्यासाठी आलेल्या सूचनांचा विचार करून यासाठी प्रभावी कार्यपद्धती राबवावी. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी प्रकल्प कालबद्ध नियोजनानुसार पूर्ण व्हावा. महाराष्ट्र स्टार्टअपउद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ हे समाजात वैविध्यपूर्ण बदल घडविणारे असून उद्योजकतेला व स्टार्टअप्सना नवसंजीवनी देणारे ठरेल.

दिलखुलास’मध्ये कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा ‘शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ निमित्त विशेष संवाद

 दिलखुलासमध्ये कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा

शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ निमित्त विशेष संवाद

 

मुंबईदि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत ते शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ या महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहेत.

'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 15 ते गुरुवार दि. 18 सप्टेंबर 2025 दरम्यान सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर ऐकता येईल. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक तापमानवाढीला प्रतिसाद देण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित केली असूनया संदर्भात भारताने आणि त्यानंतर महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. वातावरणीय बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पावले उचलली असून यासाठी हरित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी लाखो हेक्टरवर बांबू लागवड करण्याचा संकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्यउद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा,पर्यावरणाला शाश्वत दिशा मिळणार आहे. याच अनुषंगाने 18 सप्टेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात 'बांबू परिषदेचेआयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसंदर्भात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांविषयी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

०००

Featured post

Lakshvedhi