Thursday, 11 September 2025

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यास प्राधान्य

 नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना

सुखरुप परत आणण्यास प्राधान्य

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबई दि. १० :- नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नयेअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

              राज्यातील ठाणेपुणेमुंबईलातूरकोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खासगी वाहनाने परत येण्यासाठी निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेतअशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi