Monday, 13 January 2025

-li.आनंदी°पहाट.il-

 🚩⚜️🚩🔆🕉️🔆🚩⚜️🚩

        

     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

        

        *उत्तरायणाच्या स्वागताची*

                 *आज भोगी*         


🌹⚜️🚩🔆🌞🔆🚩⚜️🌹

       

        *भारतीय ऋषींनी आकाश निरीक्षण करुन आमच्यासाठी खगोलशास्त्र सांगणारे पंचांग निर्माण केलेय. त्याप्रमाणे आमचे सणवार साजरे होतात.*

        *आंग्ल नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. देशातील विविध प्रदेशात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. आणि प्रांतपद्धती.. परंपरेने उत्साहानं याचे स्वागत होते.*

        *धनुर्मास संपल्याने उद्या सूर्य मकर राशीत प्रवेश करणार. उद्यापासून शुभकाळ समजल्या जाणाऱ्या उत्तरायणाचा प्रारंभ होणार. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस उद्या सुरु होणार. पृथ्वी तिच्या अक्षापासून सूर्यापासून सर्वात दूर झुकणार. सूर्य उत्तर गोलार्धाकडे जाणार. यामुळे उद्यापासून दिवस मोठा तर रात्र लहान होणार. हा अत्यंत शुभकाळ समजला जातो. म्हणूनच आज सगळे त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. आज त्रिदिवसीय संक्रांतीचा पहिला दिवस अर्थात भोगी.*

        *भारतीय संस्कृतीने जीवनावश्यक योग्य आहाराला धर्मभावनेची जोड दिली आहे. बदलत्या ऋतूमानाचा सकारात्मक परिमाणकारक आहार सणावेळी सांगितला आहे.*

        *भोग अर्थातच उपभोग घेणे हे पण जीवनातील अत्यावश्यक कर्मच. हा भोग निरामय आरोग्यासाठी उत्तम  गोष्टींचा, आहाराचा घेणे म्हणजे यज्ञकर्मच.*        

        *शरीरास थंडीच्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी राजाने पिकविलेल्या आयुर्वेदीय महत्त्व लाभलेल्या सर्वच शेंगावर्गीय भाज्या (भोगीची भाजी ) आज केली जाणार.  तृणधान्याचेही महत्त्व आज जगाला पटलेय. पण आम्ही हजारो वर्षे याचाच वापर करतोय. मग आज तिळ लावलेली बाजरीची भाकरी.. खिचडी.. लोणी असा घरोघरीचा सकस आहार लाभणार.*              

        *इंद्रदेवाने वरुण देवाकडे "आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात उदंड पिके येवू दे.. मानव तसेच प्राणीमात्रांची तहानभूक भागू दे" अशी प्रार्थना केली होती. तसेच दरवर्षी घडते. भरपूर पिके येतात. देश अन्नधान्यांच्या.. पाण्याचा बाबतीत स्वयंपूर्ण आहे. म्हणूनच हा शेतकरी बांधवांचा तर आवडता सण. लोक त्यामुळे आज आनंदाचे प्रतिक असलेल्या इंद्रदेवाचे पूजन करुन कृतज्ञता व्यक्त करतात.*

        *भोगी असल्यामुळे आज महिलावर्गाचे पहाटेच अभ्यंगस्नान झालेय. संक्रांत स्वागतासाठी दारासमोर गोमयाचा सडा घालून सुंदर रंगीबेरंगी रांगोळी रेखाटलेल्या आहेत. आज जगात अनेकांना जमिनीवर बसताही येत नाही, तिथे खाली बसून रांगोळी रेखाटन हा एकाग्रतेचाही परंपरेचा घरगुती व्यायामच. महिला वर्ग नवनवीन पारंपारिक वस्त्रे परिधान करून उत्साहाने.. आनंदाने पूजेसाठी सज्ज आहेत.*

       *या संक्रांत सणाचे नाव भलेही प्रत्येक प्रांतात वेगवेगळे असले तरीही देशभर लोकांना निसर्गकृपेचा रुचकर पौष्टिक आहार मिळणार.*

        *मग भक्त मन आपल्या आराध्याला या उत्तरायणाच्या स्वागतासाठी उठा.. सिद्ध व्हा म्हणून साद घालत आहे.*

        

⚜️🌸🎶🔆🌺🔆🎶🌸⚜️


  *उठ झाला प्रातःकाल,*

  *तुझे गोपाल आले, वननिळा*

  *पूर्व दिशे उदेला भानू,*

  *आला उदयाचळा*


  *प्राणीमात्र पशू पक्षी,*

  *विश्रांत वृक्षी, अपुल्या स्थळी*

  *निद्रा सारून जागृत होती*

  *पंचउषःकाळी*


  *रावे मयुरे, हंस साळ्या,*

  *सुस्वर मुख कमळी*

  *सद्भावे तुज ध्याती गाती*

  *स्वमुखे नामावळी*


  *कनकाचे घट शिरी,*

  *यमुना तिरी, जाती जळा*

  *पूर्व दिशे उदेला भानू,*

  *आला उदयाचळा*


🌺🎶🌸🎼🚩🎼🌸🎶🌺


  *गीत : शाहीर परशराम*  ✍

  *संगीत : वसंत पवार*

  *स्वर : पं. वसंतराव देशपांडे*

  *चित्रपट : शाहीर परशुराम*

  *(१९६१)*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१३.०१.२०२५-*


🌻🌸☘🎼🌻🎼☘🌸🌻

Sunday, 12 January 2025

खो-खो विश्वचषक-२०२५ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर

 खो-खो विश्वचषक-२०२५ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर

 

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयामुळे 'खो-खोला पाठबळ

 

मुंबई,दि. 12 :- खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित "खो-खो विश्वचषक-2025" या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी विशेष बाब म्हणून दहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्देशानुसार याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे दि. 13 ते 19 जानेवारी, 2025 या कालावधीत आयोजित    "खो-खो विश्वचषक-2025" या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी हा निधी मंजूर केला आहे. यामुळे खो-खो खेळाला पाठबळ मिळाले आहे. खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष बाब म्हणून तातडीने शासन निर्णय निर्गमित केला असल्याने खो-खो खेळाला पाठबळ मिळाले आहे.


विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राज्याच्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक

 विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राज्याच्या कामाचे                             केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक

 

दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांनी  राज्यातील अधिकाऱ्यांचे घेतले मार्गदर्शन

 

मुंबई,दि.11 : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे कौतुक केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिथल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आमंत्रण दिले होते. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी 9 जानेवारी रोजी नवी दिल्लीत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुंबईचे महापालिका आयुक्त आणि मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी मतदान केंद्र व्यवस्थापनतेथील पायाभूत सुविधा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. राज्याचे अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी समाज माध्यमांचा उपयोग आणि माध्यम देखरेख आणि नियंत्रण समितीच्या कामकाजाविषयी राज्याच्या कामकाजाची माहिती दिल्लीतील अधिकाऱ्यांना दिली. या कार्यशाळेला दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. एलिस वाझविविध जिल्हा निवडणूक अधिकारीरिटर्निंग ऑफिसर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पीआयबीच्या मुंबई च्या उपसंचालक जयदेव पुजारीआकाशवाणीचे वृत्त संपादक जीवन भावसार,मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाज माध्यम तज्ञ पल्लवी जाधव यावेळी उपस्थित होते.


मकर संक्रांत काळ विशेष दिन

 ***********   *श्री*  ***********

    *****   *मकर संक्रांत*  *****

        *मकर संक्रांत काळ विशेष दिन माहिती* !

*दिनांक  - १३/०१/२०२५ वार- सोमवार रोजी भोगी आहे*

*दिनांक  -  १४/०१ /२०२५*

*वार  -  मंगळवार*

     *यावर्षी  संक्रांत  मिती पौष कृष्ण प्रतिपदा शके १९४६ दिनांक १४/०१/२५  मंगळवार रोजी आहे*.

*मकरसंक्रातीचा पुण्यकाल  मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:५५ ते दुपारी ०४:५५ पर्यंत आहे* .

 *मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:५५ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे *बालव करणार* संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार खालील प्रमाणे 

वाहन - *वाघ* व उपवाहन - *घोडा* आहे.

*पिवळे वस्र* परिधान केलेले आहे

*हातात गदा* घेतलेली आहे.

*कपाळी केशराचा टिळा* लावलेला आहे.

*वयाने कुमारी* असून बसलेली आहे.

*वासाकरिता जाईचे फूल* घेतलेले आहे.

*पायस* भक्षण करीत आहे.

*सर्प जाती असुन भूषणार्थ मोती* धारण केलेले आहे.

वारनाव व नाक्षत्रनाव- *महोदरी* आहे

*सामुदाय मुहूर्त ४५ आहेत*.

*पूर्वेकडुन पश्चिमेकडे  जात आहे*.व

*वायव्य* दिशेस पहात आहे

   *संक्रांतीच्या पर्वकाळात खालील गोष्टी करू नयेत* 

*दात घासणे*, *कठोर बोलणे*, *वृक्ष - गवत तोडणे*, *गाई - म्हशींची धार काढणे* व *कामविषय   सेवन* ही कामे करु नयेत .

*या दिवसाचे कर्तव्य* 

*तिलमिस्रीत उदकाने स्नान करणे*

*तिळाचे उटणे अंगास लावणे*.

*तिलहोम करणे*

*तिलतर्पण करणे*

*तिलभक्षण करणे*

*तिलदान करणे*.

*असा  सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा* 

         *संक्रांतीपर्वकालात स्त्रियांनी  करावयाची दाने*

*नवेभांडे,गाईला घास* , *अन्नदान,तिळपात्र,गूळ,तीळ,सोने*,*भूमी,गाय,वस्र,घोडा ईत्यादी  यथाशक्ति दाने करावी* .

*दिनांक १५/०१/२०२५ रोजी करिदिन म्हणजेच संक्रांतीची कर आहे यालाच *किंक्रांत* असेही म्हणतात. 

   *तिळ गुळ घ्या गोड गोड बोला*

               🙏🙏🙏

युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद* *जन्मदिनाची* ⚜️⚜️⚜️

 🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                       *२/२*

                

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

     *युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद*    

                  *जन्मदिनाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


         *आज 'राष्ट्रीय युवा दिन'*

                                                                                                                              

🌸🥀🔆🌺🚩🌺🔆🥀🌸


        *"अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो".. शिकागोतील जागतिक सर्वधर्म परिषदेच्या व्याख्यानातील भगवाधारीच्या पहिल्याच वाक्याने जग जिंकले. आज भाषणात हे वाक्य म्हणजे प्रथा झालीय. पण तेव्हा या वाक्यातील हिंदू संस्कृतीचा उदात्त भाव लक्षात येताच बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट होत राहीला.. कारणही तसेच होते. जगात प्रथमच कुणीतरी जगाशी भावाबहिणीचे पवित्र नाते जोडले होते.*  

        *आज १२ जानेवारी. याच दिवशी जगाला प्रत्येक 'जीव हा शिव आहे' हे हिंदू धर्म सहिष्णूतेचे अव्दैत वैदिक तत्त्वज्ञान.. भारतीय योगदर्शन जगाला सांगणाऱ्या एका तेजस्वी संन्यासाचा जन्म झाला.. नरेंद्रनाथ दत्त. १८६३ साली जन्म कलकत्ता. ओळख स्वामी विवेकानंद.*

        *जनतेच्या उद्धारासाठी त्यांना गुरुमंत्र देणारे दैवी पुरुष जगविख्यात गुरू लाभले रामकृष्ण परमहंस. त्यांचे कार्य पूढे नेण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. सर्वप्रथम भारतभ्रमण करुन जनतेची दुःख बघितली. माणसातील सुप्त मनुष्यत्व जागविण्यासाठी.. वेदान्त विचार जगाला पटविण्यासाठी सर्वधर्म परिषदेत मातृभूमीचा सेवक म्हणून भाग घेतला.*

        *अमेरिका.. इंग्लंड.. युरोप दौऱ्यात त्यांच्या मानवतावादी तेजस्वी व्यक्तीमत्वाचा.. वाणीचा.. मानवतावादी विचारांचा एवढा प्रभाव पडला की जगाला उर्जा देणारे युगपुरुष ख्याती झाली. स्वामी विवेकानंदामुळे जगाची भारताकडे बघण्याची दृष्टीच बदलली. जगात भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्त्व पटले. स्वामी विवेकानंद म्हणजे जीवनात उर्जा देणारे.. गीता सांगणारे आधुनिक श्रीकृष्णच.* 

        *विवेकानंदांची अचाट बुद्धिमत्ता.. स्मरणशक्ती.. ज्ञानार्जनाची क्षमता सारेच विस्मयकारी.. अविश्वसनीय पण सत्य आहे. प्रत्येक विचार जीवनात प्रेरणादायी.. विवेकानंद म्हणतात.. उठा, जागे व्हा, आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. धैर्य हेच जीवन आहे आणि भ्याडपणा हे मृत्यूचं लक्षण आहे. प्रेम म्हणजे जीवन, द्वेष म्हणजे मृत्यू. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंर्तमनात प्रचंड शक्ति आहे. या शक्तिच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता. तुम्ही जसा विचार कराल तसे व्हाल. दुर्बल समजलात तर दुर्बल, उठा जागृत व्हा. तुमच्या ध्येय प्राप्ती पर्यंत थांबू नका. तुम्ही जसा विचार करता तसे बनता. स्वतःला घडविण्याकडे एवढे व्यस्त रहा की इतरांचे दोष काढण्यासाठी वेळच  मिळणार नाही.* 

        *स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा भारतात 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून संपन्न होतो. या प्रेरणादायी दिनाच्या शुभेच्छा !!*

        *स्वामी विवेकानंदांनी आम्हांला धीरता.. शूरता.. वीरता आणि विद्येसह नम्रता.. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शासन हा गुरु मंत्र दिलाय. हा गुरुंचा वारसा आपण चालवू या. विवेकानंद म्हणजे भारताचे आध्यात्मिक पिता असे सुभाषचंद्र बोस गौरवितात. अशा या युगपुरुषाला जन्मदिनी विनम्र अभिवादन.*


🌹⚜️🌸🥀🚩🥀🌸⚜️🌹


  *गुरूने दिला ज्ञानरूपी वसा*

  *आम्ही चालवू हा पुढे वारसा*


  *पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माउली*

  *तुम्ही कल्पवृक्षातळी सावली*

  *तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा !*


  *जिथे काल अंकुर बीजातले*

  *तिथे आज वेलीवरी ही फुले*

  *फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !*


  *शिकू धीरता, शूरता, वीरता*

  *धरू थोर विद्येसवे नम्रता*

  *मनी ध्यास हा एक लागो असा !*


  *जरी दुष्ट कोणी करू शासन*

  *गुणी सज्जनांचे करू पालन*

  *मनी-मानसी हाच आहे ठसा !*


  *तुझी त्याग-सेवा फळा ये अशी*

  *तुझी कीर्ती राहील दाही दिशी*

  *अगा पुण्यवंता भल्या माणसा !*


🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹 

  

  *गीत : जगदीश खेबूडकर*  ✍  

  *संगीत : प्रभाकर जोग*

  *स्वर : अनुराधा पौडवाल*

  *आणि सुरेश वाडकर*

  *चित्रपट : कैवारी (१९८१)*

  

  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१२.०१.२०२५-*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

आपल्या स्वतंत्र भारतात या गावातील लोकांसाठी शाळा पोहोचण्याची गरज आहे...!

 बघून मन सुन्न झाले... आपल्या कल्याण पासून काही तासावर असलेले शहापूर आणि तानसा धरण तलावतील खोल पाण्यातून तरफ्याने नदी ओलांडून रोज फक्त शिक्षणासाठी शाळेत जातात... अशा परिस्थितीत राहणारे आदिवासी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गावातच २०० पेक्षा जास्त कुटुंबाला शाळेची गरज आहे.

आपल्या स्वतंत्र भारतात या गावातील लोकांसाठी शाळा पोहोचण्याची गरज आहे...!


११/०१/२०२५- लालबहादूर शास्त्री पूण्यदिन..

 🍃🌾😊


🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

            *🔸श्री. लाल बहादूर शास्त्री.🔸*


*🟣११/०१/२०२५- लालबहादूर शास्त्री पूण्यदिन...🙏* *--------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*

*--------------------------------------*

*श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला... लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्या तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.....*


*लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले... मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले. उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे.....*


*वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली... भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.....*


*गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते... गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता.....*


*त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.....*


*ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले... येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव “शास्त्री” होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.....*


*१९२७ मध्ये त्यांचा विवाह झाला... त्यांची पत्नी ललिता देवी हया त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते. १९३० मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.....*


*स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते... १९४६ मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या “छोटया डायनॅमो”ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. १९५१ मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.....*


*त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती... एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनाम मी स्वीकारत आहे कारण यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत.....*


*रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले “कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही... जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.....”*


*आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान, काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले... १९५२, १९५७ आणि १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते.....*


*तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले... नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.....*

*स्रोत: आंतरजाल, PM INDIA...*

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹


     *🌺🦚 राधे राधे 🦚🌺*

Featured post

Lakshvedhi