🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*२/२*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद*
*जन्मदिनाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*आज 'राष्ट्रीय युवा दिन'*
🌸🥀🔆🌺🚩🌺🔆🥀🌸
*"अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो".. शिकागोतील जागतिक सर्वधर्म परिषदेच्या व्याख्यानातील भगवाधारीच्या पहिल्याच वाक्याने जग जिंकले. आज भाषणात हे वाक्य म्हणजे प्रथा झालीय. पण तेव्हा या वाक्यातील हिंदू संस्कृतीचा उदात्त भाव लक्षात येताच बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट होत राहीला.. कारणही तसेच होते. जगात प्रथमच कुणीतरी जगाशी भावाबहिणीचे पवित्र नाते जोडले होते.*
*आज १२ जानेवारी. याच दिवशी जगाला प्रत्येक 'जीव हा शिव आहे' हे हिंदू धर्म सहिष्णूतेचे अव्दैत वैदिक तत्त्वज्ञान.. भारतीय योगदर्शन जगाला सांगणाऱ्या एका तेजस्वी संन्यासाचा जन्म झाला.. नरेंद्रनाथ दत्त. १८६३ साली जन्म कलकत्ता. ओळख स्वामी विवेकानंद.*
*जनतेच्या उद्धारासाठी त्यांना गुरुमंत्र देणारे दैवी पुरुष जगविख्यात गुरू लाभले रामकृष्ण परमहंस. त्यांचे कार्य पूढे नेण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. सर्वप्रथम भारतभ्रमण करुन जनतेची दुःख बघितली. माणसातील सुप्त मनुष्यत्व जागविण्यासाठी.. वेदान्त विचार जगाला पटविण्यासाठी सर्वधर्म परिषदेत मातृभूमीचा सेवक म्हणून भाग घेतला.*
*अमेरिका.. इंग्लंड.. युरोप दौऱ्यात त्यांच्या मानवतावादी तेजस्वी व्यक्तीमत्वाचा.. वाणीचा.. मानवतावादी विचारांचा एवढा प्रभाव पडला की जगाला उर्जा देणारे युगपुरुष ख्याती झाली. स्वामी विवेकानंदामुळे जगाची भारताकडे बघण्याची दृष्टीच बदलली. जगात भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्त्व पटले. स्वामी विवेकानंद म्हणजे जीवनात उर्जा देणारे.. गीता सांगणारे आधुनिक श्रीकृष्णच.*
*विवेकानंदांची अचाट बुद्धिमत्ता.. स्मरणशक्ती.. ज्ञानार्जनाची क्षमता सारेच विस्मयकारी.. अविश्वसनीय पण सत्य आहे. प्रत्येक विचार जीवनात प्रेरणादायी.. विवेकानंद म्हणतात.. उठा, जागे व्हा, आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. धैर्य हेच जीवन आहे आणि भ्याडपणा हे मृत्यूचं लक्षण आहे. प्रेम म्हणजे जीवन, द्वेष म्हणजे मृत्यू. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंर्तमनात प्रचंड शक्ति आहे. या शक्तिच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता. तुम्ही जसा विचार कराल तसे व्हाल. दुर्बल समजलात तर दुर्बल, उठा जागृत व्हा. तुमच्या ध्येय प्राप्ती पर्यंत थांबू नका. तुम्ही जसा विचार करता तसे बनता. स्वतःला घडविण्याकडे एवढे व्यस्त रहा की इतरांचे दोष काढण्यासाठी वेळच मिळणार नाही.*
*स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा भारतात 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून संपन्न होतो. या प्रेरणादायी दिनाच्या शुभेच्छा !!*
*स्वामी विवेकानंदांनी आम्हांला धीरता.. शूरता.. वीरता आणि विद्येसह नम्रता.. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शासन हा गुरु मंत्र दिलाय. हा गुरुंचा वारसा आपण चालवू या. विवेकानंद म्हणजे भारताचे आध्यात्मिक पिता असे सुभाषचंद्र बोस गौरवितात. अशा या युगपुरुषाला जन्मदिनी विनम्र अभिवादन.*
🌹⚜️🌸🥀🚩🥀🌸⚜️🌹
*गुरूने दिला ज्ञानरूपी वसा*
*आम्ही चालवू हा पुढे वारसा*
*पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली*
*तुम्ही कल्पवृक्षातळी सावली*
*तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा !*
*जिथे काल अंकुर बीजातले*
*तिथे आज वेलीवरी ही फुले*
*फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !*
*शिकू धीरता, शूरता, वीरता*
*धरू थोर विद्येसवे नम्रता*
*मनी ध्यास हा एक लागो असा !*
*जरी दुष्ट कोणी करू शासन*
*गुणी सज्जनांचे करू पालन*
*मनी-मानसी हाच आहे ठसा !*
*तुझी त्याग-सेवा फळा ये अशी*
*तुझी कीर्ती राहील दाही दिशी*
*अगा पुण्यवंता भल्या माणसा !*
🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹
*गीत : जगदीश खेबूडकर* ✍
*संगीत : प्रभाकर जोग*
*स्वर : अनुराधा पौडवाल*
*आणि सुरेश वाडकर*
*चित्रपट : कैवारी (१९८१)*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-१२.०१.२०२५-*
🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻
No comments:
Post a Comment