*********** *श्री* ***********
***** *मकर संक्रांत* *****
*मकर संक्रांत काळ विशेष दिन माहिती* !
*दिनांक - १३/०१/२०२५ वार- सोमवार रोजी भोगी आहे*
*दिनांक - १४/०१ /२०२५*
*वार - मंगळवार*
*यावर्षी संक्रांत मिती पौष कृष्ण प्रतिपदा शके १९४६ दिनांक १४/०१/२५ मंगळवार रोजी आहे*.
*मकरसंक्रातीचा पुण्यकाल मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:५५ ते दुपारी ०४:५५ पर्यंत आहे* .
*मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:५५ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे *बालव करणार* संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार खालील प्रमाणे
वाहन - *वाघ* व उपवाहन - *घोडा* आहे.
*पिवळे वस्र* परिधान केलेले आहे
*हातात गदा* घेतलेली आहे.
*कपाळी केशराचा टिळा* लावलेला आहे.
*वयाने कुमारी* असून बसलेली आहे.
*वासाकरिता जाईचे फूल* घेतलेले आहे.
*पायस* भक्षण करीत आहे.
*सर्प जाती असुन भूषणार्थ मोती* धारण केलेले आहे.
वारनाव व नाक्षत्रनाव- *महोदरी* आहे
*सामुदाय मुहूर्त ४५ आहेत*.
*पूर्वेकडुन पश्चिमेकडे जात आहे*.व
*वायव्य* दिशेस पहात आहे
*संक्रांतीच्या पर्वकाळात खालील गोष्टी करू नयेत*
*दात घासणे*, *कठोर बोलणे*, *वृक्ष - गवत तोडणे*, *गाई - म्हशींची धार काढणे* व *कामविषय सेवन* ही कामे करु नयेत .
*या दिवसाचे कर्तव्य*
*तिलमिस्रीत उदकाने स्नान करणे*
*तिळाचे उटणे अंगास लावणे*.
*तिलहोम करणे*
*तिलतर्पण करणे*
*तिलभक्षण करणे*
*तिलदान करणे*.
*असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा*
*संक्रांतीपर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने*
*नवेभांडे,गाईला घास* , *अन्नदान,तिळपात्र,गूळ,तीळ,सोने*,*भूमी,गाय,वस्र,घोडा ईत्यादी यथाशक्ति दाने करावी* .
*दिनांक १५/०१/२०२५ रोजी करिदिन म्हणजेच संक्रांतीची कर आहे यालाच *किंक्रांत* असेही म्हणतात.
*तिळ गुळ घ्या गोड गोड बोला*
🙏🙏🙏
No comments:
Post a Comment