CCTV कैमरे में कैद हुई वीडियो।
कृपया फ्रिज साफ करते समय प्लग निकाल दें।
(सिर्फ स्विच बंद करना पर्याप्त नहीं है।)
😳
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
CCTV कैमरे में कैद हुई वीडियो।
कृपया फ्रिज साफ करते समय प्लग निकाल दें।
(सिर्फ स्विच बंद करना पर्याप्त नहीं है।)
😳
चला..
आळस झटका..
टीव्ही बंद करा..
सोमवार पासुन लागा कामाला
जे निवड निवडून येणार होते ते आले..
.
ज्याला बिनकामाचे नाचायचे होते ते नाचले .
.
कांहीही संबंध नसताना उगीचच ज्याला वाईट वाटायचे होते त्याला वाटले..
.
.
आता बस झाले ..
.
.
.
आता कामाला लागा..
.
.
आपल्याला पैसे कमवून टॅक्स भरायचा आहे..
.
.
म्हणजे,
.
जे 23 तारखेला निवडून आले..
.
त्यांचे पगार...
.
.
त्यांचा भ्रष्टाचार..
.
.
अन्
.
.
जे माजी होणार..
.
त्यांच्या पेन्शन ची व्यवस्था करावी लागेल..
.
.
चला.. लागा कामाला..
पुढील 5 वर्षे..
आपले अन् त्यांचे पोट भरण्यासाठी.!
😂
राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर
मुंबई, दि. २४ : भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना - निवडून आलेल्या सदस्यांची यादी - व राजपत्राची प्रत सादर केली.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचे निकाल दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहिर करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार, या निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर, २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली.
सदर राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज राज्यपालांना सादर केल्या.
यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा हे देखील उपस्थित होते.
0 0 0
ECI Dy Commissioner, State CEO present Assembly Election Gazette to Maha Governor
Mumbai, 24 : The Deputy Election Commissioner of Election Commission of India Hirdesh Kumar and Chief Electoral Officer, Maharashtra State S. Chockalingam called on Maharashtra Governor C P Radhakrishnan and presented the copies of the Gazette containing names of members elected to the Legislative Assembly of Maharashtra and ECI's Notification at Raj Bhavan Mumbai on Sunday (24 Nov).
The results of General Elections to Maharashtra Legislative Assembly were declared on 23rd November. The names of elected candidates of the election were published in Maharashtra Government State Gazette vide Election Commission of India’s Notification dated 24th November, 2024. This was done as per the provisions contained in Section 73 of the Representation of People Act, 1951.
The Deputy Election Commissioner, ECI and the State Chief Electoral Officer, Maharashtra presented copies of the said Gazette containing ECI’s Notification to the Governor.
Additional Chief Electoral Officer from the office of Chief Electoral Officer, Maharashtra State Kiran Kulkarni, Joint Chief Electoral Officer Manohar Parkar and Secretary, ECI Suman Kumar Das and Section Officer Niranjan Kumar Sharma from Election Commission of India were also present.
मतदानानंतरही ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती 99% दिसणे तांत्रिकदृष्ट्या वस्तूस्थितीजन्य
निवडणूक निर्णय अधिकारी - विधानसभा मतदारसंघ 172-अणुशक्ती नगर
मुंबई दि 23:- मतदानानंतरही ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती 99% दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तूस्थितीजन्य असल्याचे 172-अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी 172- अणुशक्तीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रात मतदानादिवशी ईव्हीएम मशीन पूर्ण दिवस वापरल्यानंतरही काही CUs मध्ये EVM पॉवर पॅक स्थिती 99% दर्शविली गेली याबाबत एक उमेदवार यांनी आक्षेप नोंदविला होता.
भारत निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीन संदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार याबाबत वस्तूस्थितीदर्शक खुलासा करताना 172- अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे की EVM पॉवर पॅक 2000 मतांसह 1 CU सह 4 BU ला जोडणी देण्यासाठीची रचना आहे. जेंव्हा क्षमता जास्त असते तेव्हा व्होल्टेज खूप हळूहळू कमी होते परंतु जेंव्हा बॅटरीची क्षमता 'थ्रेशोल्ड'च्या खाली कमी होते तेव्हा ते वेगाने घसरते. एकच BU आणि 1000 पेक्षा कमी मते नोंदविली असताना हलके विद्युत प्रवाह असल्यास, बॅटरीचा प्रवाह कमी असतो आणि आउटपुट व्होल्टेज 7.4V च्या खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे 99% क्षमता दर्शविली जाऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत ही एक सर्वसामान्य स्थिती असून याबाबतचा आक्षेप अयोग्य असून अशाप्रकारे गैरसमज पसरविणे अयोग्य असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
0 0 0
कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
‘विधी विधान इंटर्नशिप’
मुंबई, दि. 23 : कायदेशीर प्रस्तावांची तपासणी करण्याची प्रक्रिया, विधेयक व अध्यादेशाचा मसुदा तयार करणे तसेच दुय्यम विधी विधान तयार करणे याबाबतची माहिती राज्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी विधी विधान इंटर्नशिप उपक्रम 20 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे शासनाच्या कामकाजाची माहिती, विधेयके, अध्यादेश, नियम, अधिसूचनांचे प्रारूप तयार करण्याबाबतची कार्यपद्धती, विधान मंडळात विधेयके पारित करण्याची कार्यपद्धती, विधी व न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद, संविधानातील कायदेविषयक तरतुदी व त्यांचा प्रत्यक्ष वापर, विविध कायदे व तरतुदींची माहिती, विधी व न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामाचा प्रत्यक्ष अनुभव, विविध विषयांवर व्याख्याने तसेच संबंधित कार्यालयाना भेटी देण्याची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विधी महाविद्यालये व विद्यापीठे यामधील 5 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाचे चौथ्या किंवा पाचव्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी, 3 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी तसेच विधी पदव्युत्तर पदवीचे पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी या विधी विधान इंटर्नशिपसाठी पात्र आहेत. तथापि, या उपक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठीचे ऑनलाईन अर्ज व संबंधित कागदपत्रे एआयसीटीइ (AICTE) च्या http://internship.aicte-india.
या इंटर्नशिप बॅच 3 करिता 12 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यात 5 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाचे 3 विद्यार्थी व 3 विद्यार्थिनी, 3 वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाचे 2 विद्यार्थी व 2 विद्यार्थिनी तसेच विधी पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमाचा 1 विद्यार्थी व 1 विद्यार्थिनीची निवड करण्यात येईल. या इंटर्नशिपचे ठिकाणी विधी विधान शाखा, विधी व न्याय विभाग, पाचवा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई हे असेल.
हे विधी विधान इंटर्नशिप यशस्विरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रूपये 10 हजार इतके विद्यावेतन देण्यात येणार असून कार्यअहवाल सादर केल्यानंतर त्यांना इंटर्नशिप प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
000
आत्तापर्यंत तुम्ही नेहमी महागड्या गाड्यांमध्ये कुत्रे पाहिले असतील, बघा तुमचा भारत बदलतोय!! तुम्हाला आत्मसमाधान मिळेल 🙏🙏❤️