Wednesday, 18 September 2024

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा

 अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Ø  ६३५ चौ.फूटापेक्षा जास्त क्षेत्रफळाची सदनिका

Ø  सदनिकाधारकाला वाहन पार्किंगची सुविधा

मुंबई, अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा


निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा


दि. १८ : अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिले. यामुळे आता अभ्युदय नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेतली होती. त्यावेळी हे निर्देश दिले. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (दूरदृष्यप्रालीद्वारे)विधानपरिषद सदस्य प्रसाद लाडगृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंहम्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वालमुख्याधिकारी मिलींद बोरीकरउपसचिव अजित कवडेअवर सचिव अरविंद शेटेअभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार काटकरउपाध्यक्ष विलास सावंत यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

बैठकीत उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्रकल्पातील रहिवाशांच्या मागण्या जाणून घेतल्या. अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढतांना त्यामध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ हे ६३५ चौरस फूट पेक्षा जास्त असावेभविष्याच्यादृष्टीने सदनिकाधारकाला चारचाकी वाहन पार्किंग असावीसदनिकेची किंमत खुल्या बाजारभावानुसार असावी अशा अटी समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता घेवून पुनर्विकास प्रकल्पाची निविदा लवकरात लवकर काढाअसे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

विधानपरिषदेचे सदस्य प्रविण दरेकर यांनी अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी राज्य शासन घेत असलेल्या निर्णयाबाबत शासनाचे विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या निर्णयामुळे सुमारे अभ्युदय नगर वसाहतीतील १५ हजार रहिवाशांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील मराठी माणूसकामगार आनंदी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी स्ट्रक्चरलचे पैसे भरले आहेत. हा पुनर्विकास प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून ओळखला जावा. काँक्रीटचे जंगल न होता चांगले काम व्हावे अशी मागणी करुन शासनाच्या क्रांतीकारक निर्णयांचे कौतुक महासंघाच्या प्रतिनिधींनी यावेळी केले.

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण करुन प्रकल्पाविषयी माहिती दिली.

०००

पेंनगु गाई palla आणि निरोगी सत्वशील रहा

 


रीश्तो मे नफा नुकसान नही देखते.. Too good..👌🏼 मी कधीच नफा नुकसानचा विचार नाही केला.. पण माझं नुकसानच झालं. असो.. आपल्यातल्या काहींचे तरी डोळे आणि मन उघडावे.. बास्स्स..👍🏼😄


 

नेत्रदान ही लोक चळवळ बनावी नेत्रदानाचा संकल्प करण्याचे राज्यपाल सी.पी.

 नेत्रदान ही लोक चळवळ बनावी

नेत्रदानाचा संकल्प करण्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

 मुंबईदि. 17:– नेत्रदान हे महान कार्य असून या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यानंतर इतरांच्या माध्यमातून जगू शकतो. यासाठी नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावाअसे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत नेत्रदान संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा आज राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला. राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडेसह सचिव श्वेता सिंघलजे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेनेत्र शल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ.सुजाता चहांदे आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणालेकोणत्याही व्यक्तीचा मृत्यू हा वेदनादायी असतोतथापि त्यांच्या अवयवांच्या माध्यमातून इतर गरजूंना नवीन आयुष्य मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त राजभवन येथे आयोजित नेत्रदान संकल्प अभियानात 740 जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होतेप्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले. याबाबत समाधान व्यक्त करून हा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 7500 संकल्पाचे उद्दिष्ट ठेवू याअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 पंतप्रधान श्री.मोदी यांनी कोविडच्या दुर्दैवी काळात लस तयार करण्यास प्रोत्साहन देऊन केवळ देशातीलच नाही तर इतर देशांमधील गरजू रुग्णांचे प्राण वाचविले होते. त्यांच्या या कार्यामुळे इतरांना प्रेरणा मिळत असल्याचा उल्लेख राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी केला. मी स्वतः यापूर्वीच नेत्रदानाचा संकल्प केला आहे असे सांगून माझ्या कुटुंबातील मृत्यू झालेल्यांचे देखील नेत्रदान करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वांनी असा संकल्प केल्यास नेत्रहीन गरजूंची यादी संपण्यास फार वेळ लागणार नाही असे सांगून अधिकाधिक लोक नेत्रदानाचा संकल्प करतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या अभियानात सहभागी झालेल्या अधिकारीकर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे तसेच डॉक्टर्सचे राज्यपालांनी यावेळी आभार मानले. नेत्रदानाचा संकल्प केलेल्यांचे फॉर्म राज्यपालांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.सापळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

डॉ.सापळे यांनी यावेळी नेत्रदानाचे महत्व सांगून राज्यपालांनी या अभियानास पाठबळ दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तरराज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी आय कॅन सी क्लियरली नाऊ’ ही या वर्षी नेत्रदान संकल्प अभियानाची थीम असल्याचे सांगून राजभवन येथे राबविण्यात आलेल्या अभियानाबाबत माहिती दिली.

00000

Governor presides over Eye Donation Awareness Camp

Mumbai, 17:- Maharashtra Governor C. P. Radhakrishnan presided over an Eye Donation Awareness Camp on the occasion of the 74th birth anniversary of Prime Minister Narendra Modi at Raj Bhavan, Mumbai, on Tuesday, 17th September.

Principal Secretary to the Governor Pravin Darade, Joint Secretary Shweta Singhal, Comptroller Jitendra Wagh, Dean of JJ Group of Hospitals Dr. Pallavi Sapale, Head of the Department of Ophthalmology Dr. Sujata Chahande, Superintendent Dr. Sanjay Surase, and officers and employees of Raj Bhavan, Mumbai, were present.

000


मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित

 मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या कडून पुष्पवृष्टी

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात गणरायाला निरोप

 

मुंबई दि. 17 – मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेगेले दहा दिवस राज्यात उत्सवाचे वातावरण आहे. हा राज्यातील एक महत्वाचा आणि मोठा उत्सव आहे. बळीराजावरील अरिष्ट टळू देराज्यातील शेतकरी सुखी होऊदेराज्यातील जनता सुखी आणि समृद्ध होऊदे अशी प्रार्थना गणरायाला केली आहे. जनतेला सुखी करण्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. जनतेचे कल्याण हेच शासनाचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 

अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवलेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी गणपती बाप्पा मोरयापुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीबेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकरमुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री आणि मान्यवरांचे ओवाळून औक्षण केले. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

गिरगाव चौपाटीवर आज सायंकाळपासून भाविकांचा जनसागर जमला होता. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईत विविध ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून गिरगाव चौपाटी येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णनमुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. मान्यवरांनी यावेळी उपस्थित असलेल्या विविध देशांच्या दूतावासाच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

देश विदेशातील पर्यटकांना गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन घडविण्यासाठी पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवअंतर्गत उभारलेल्या विशेष गणेश दर्शन गॅलरीसही  राज्यपाल                    श्री. राधाकृष्णनमुख्यमंत्री श्री. शिंदेकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवलेउपमुख्यमंत्री          श्री. फडणवीस यांनी भेट देऊन गणेशाची आरती केली.

त्याचप्रमाणे हा सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या विदेशी पर्यटकांशी संवाद साधला. पोलीस नियंत्रण कक्षबृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या मंडपालाही भेट दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी राज्यपाल श्री. राधाकृष्णनमुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यासोबतच इथे जमलेल्या श्री साधकांशी संवाद साधला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प अत्यंत स्तुत्य असून त्यात 10 हजार श्रीसाधक सहभागी झाले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाचे रक्षण होत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी त्यांनी या श्री साधकांसोबत आणि इतर नागरिकांसोबत मनसोक्त सेल्फी घेतले.

0000

वृत्त क्र

पूर्वजांविषयी कृतज्ञतेची* *महालयारंभ*

 🌹⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


         *पूर्वजांविषयी कृतज्ञतेची*

                 *महालयारंभ*


🚩⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🚩


        *भारतीय संस्कृतीचा कृतज्ञता हा स्थायीभाव आहे. या कृतज्ञता भावनेत विशाल दृष्टिकोन आहे. ही कृतज्ञता जशी जिवंत व्यक्तींविषयी असते.. निसर्गाविषयी असते तशीच आमच्या पितरांविषयीही. हा कृतज्ञता संस्कृती संस्कार वेगवेगळ्या सणावारातून व्यक्त होतो.* 

        *आज हा कृतज्ञता भाव व्यक्त करणारा पितृपक्ष पंधरवडा प्रारंभ होतोय. या जगतात आज असलेले आमचे अस्तित्व आहे ते या थोर पितरांमुळेच.*

        *आम्हांला जगाचा इतिहास ठाऊक असतो. पण ज्यांच्या कृपेने हे अस्तित्व आहे त्यापैकी आमच्या खापर पणजोबांचे नावही आम्हांला ठाऊक नसते. पण ते होते म्हणूनच आम्ही आहोत हे मात्र सत्य आहे.*

        *भारतीयांच्या वंश  उगमाचे मुळपुरुष हे विश्वामित्र, जमदग्नी, भारव्दाज, गौतम, अत्री, वशिष्ठ, कश्यप आणि अगस्ती हे आठ ऋषी समजले जातात. त्यांच्यापासून जवळपास ५० प्रमुख गोत्रांचा विशाल परिवार देशभरात निर्माण झालाय.* 

        *या आमच्या पूर्वजांचे किती किती म्हणून उपकार सांगावेत ? आज जगात विज्ञान.. तंत्रज्ञानक्षेत्रात प्रगती झालीय. माहितीचे स्रोत घरबसल्या उपलब्ध आहेत. तरीही या प्रगतीनंतरही घर कुठे घ्यावे हा प्रश्न पडतो. पण हजारो वर्षे सुविधांचा अभाव असतानाही आमच्या पूर्वजांनी जिवापाड संघर्ष करुन आमच्या घराण्याची वंशवेल.. धर्म.. संस्कृती.. स्वातंत्र्य अबाधित राखलेय.*

        *आमच्या पूर्वजांनी अतिवृष्टी.. महापूर.. अवर्षण.. भूकंप अशा घटनांचा.. अचानक उदभवणाऱ्या अनाकलनीय साथीच्या रोगांचा.. लहरी जुलमी परकीय आक्रमकांचा सामना केलाय. जीव वाचवत प्रसंगी रानोमाळ भटकत डोंगर दऱ्यात ते आश्रय घ्यायचे. या सर्वच संकटातून वाट काढून कुटुंबाचे पालनपोषण केलेय.. ही वंशवेल वाढवलीय. आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणाऱ्या परंपरा.. रीतीरिवाज.. श्रद्धास्थाने यांचे रक्षण केलेय. या त्यांच्या कार्यामुळेच आज आम्ही हे आनंदी जीवन जगतोय. येत्या पंधरा दिवसात पितरांविषयी हाच कृतज्ञता भाव श्रद्धापूर्वक श्राद्धातून व्यक्त केल्या जाणार.*

        *आजपासून या पंधरा दिवसात एकदिवस आपल्या मातृ पितृ गोत्रातील सर्वच पितरांचे तसेच गुरुवर्य, सहकारी.. आप्तेष्ट पितरांचे स्मरण करुन श्राद्धविधी.. तर्पण केले जाते. तर्पण अर्थात तृप्त करणे. ते जिथेकुठे असतील त्यांना आवडणारे सारे पदार्थ अर्पण करणे. त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करणे. त्यांच्यासोबतच आम्ही चराचराची.. पंचमहाभूताचीही काळजी घेतो.* 

        *कावळा हे निसर्गाच्या जीवसाखळीचा महत्त्वाचा पक्षी. ते निसर्गात स्वच्छता दूताचे काम करतात. त्यांना जगवणे मानवी हिताचे आहे. वड असो वा पिंपळ या प्राणवायूच्या वृक्षाच्या संवर्धनासाठी एकाक्ष कावळ्यांची मदत होते. म्हणूनच या पंधरवाड्यात त्यांना भात अर्पण केला जातो. या पंधरवाड्यात आमच्या पूर्वजांच्या आठवणीत आम्ही रमतो.*    

        *जन्म-मृत्यू हे अटळच. पण घराण्यातील संस्कृती संस्कारच जीवनाला खरा अर्थ देतात. आमची श्रद्धा आहे ती संत वचनांवर.*

    *देह जावो अथवा राहो,*

    *पांडुरंगी दृढ भावो..*

        *संत आम्हांला भक्ती मार्ग दाखवतात. संत नामदेव म्हणतात की हा देह जावो किंवा राहो, याची पर्वा नाही. पण परमेश्वरावरील विश्वास अढळ आहे. त्या पांडुरंगावर त्यांचाच नाही तर आमचा.. आमच्या घराण्याचा हजारो वर्ष दृढ विश्वास आहे, आणि म्हणूनच या भवसागरात आम्ही आनंदी जीवन जगतोय.*


🌺🌿🌸🍃🌸🍃🌸🌿🌺


  *हे आदिमा, हे अंतिमा*

  *जे वांछिले ते तू दिले*

  *कल्पद्रुमा*


  *या मातीचे आकाश तू*

  *शिशीरात या मधुमास तू*

  *देशी मृता तू अमृता*

  *पुरोषोत्तमा*


  *देणे तुझे इतुके शिरी*

  *झालो ऋणी जन्मांतरी*

  *अपकार मी, अपराध मी*

  *परी तू क्षमा*

                    

🌺🌿🌸🔆🙏🔆🌸🌿🌺


  *गीत : वसंत निनावे*  ✍

  *संगीत : यशवंत देव*

  *स्वर : रामदास कामत*


  🎼🎶🎼🎶🎼  🎧       


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१८.०९.२०२४-*


🌻🌿🥀☘🌺☘🥀🌿🌻

Amqzing magicians


 

Featured post

Lakshvedhi