Tuesday, 14 May 2024

राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

 राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात

अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

 

            मुंबईदि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

        चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

नंदुरबार -  ६७.१२ टक्के

जळगाव -  ५३.६५ टक्के

रावेर – ६१.३६ टक्के

जालना – ६८.३० टक्के

औरंगाबाद  - ६०.७३ टक्के

मावळ – ५२.९० टक्के

पुणे – ५१.२५ टक्के

शिरूर -  ५१.४६ टक्के

अहमदनगर -  ६२.७६ टक्के

शिर्डी – ६१.१३ टक्के

बीड -  ६९.७४ टक्के

Monday, 13 May 2024

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 35 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क २३०९ मतदारांचे टपाली पद्धतीने मतदान -

 मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात

35 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

२३०९ मतदारांचे टपाली पद्धतीने मतदान

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

            मुंबईदि. 13 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत २३०९ मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केले आहे. तसेचज्येष्ठ ३३ तर दिव्यांग २ मतदारांनी असे एकूण ३५ मतदारांनी गृहमतदान पद्धतीने मतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली.

            २८- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. १९० पैकी ३३ ज्येष्ठ नागरिक आणि दोन दिव्यांग अशा ३५ मतदारांनी मतदान केले आहेतर२८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २३०९ मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केले आहे. धुळे मतदारसंघासाठी २२ मतदारांनी टपाल पद्धतीने मतदान केले. दिंडोरीसाठी १० मतदारांनीनाशिकसाठी ३१पालघरसाठी ३९भिवंडीसाठी २४२कल्याणसाठी २३७ठाणेसाठी २१०मुंबई उत्तरसाठी – ७३मुंबई उत्तर पश्चिमसाठी – ७५मुंबई उत्तर पूर्वसाठी – ८१६मुंबई उत्तर मध्यसाठी – १५२मुंबई दक्षिण मध्यसाठी – ३०६मुंबई दक्षिणसाठी ९६ असे एकूण २३०९ मतदारांनी मतदान केले आहे.

०००

खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

 खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे

दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

           

            मुंबईदि. 13 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च)  सुनील यादव (आयआरएसहे तीन वेळेस 28 - मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदींची तपासणी करणार आहेत. मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी 9 मे 2024 रोजी करण्यात आली. या तपासणीत नॅशनल पीपल्स पार्टीचे संजय बंडू पाटील आणि अपक्ष उमेदवार संजय निवृत्ती पाटील हे उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांना सूचना देऊनही ते दुसऱ्या वेळेस उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 171 (आय) मधील तरतुदीनुसार या दोन्ही उमेदवारांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

            28 - मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून सुनील यादव (आयआरएसयांची नियुक्ती केली आहे.  केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. यादव  यांनी दि. ९ मे२०२४ रोजी उमेदवारांच्या निवडणूक खर्च नोंदवह्यांची प्रथम तपासणी केली. त्यावेळी २८ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक खर्च प्रतिनिधी यांनी निवडणूक खर्च लेखा तपासणीस खर्च नोंदवहीसह उपस्थित राहणे अपेक्षित होते.

            तथापिसदर तपासणीस नॅशनल पीपल्स पार्टीचे  संजय बंडू पाटील  आणि  संजय निवृत्ती पाटीलअपक्ष हे उमेदवार उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांच्या प्रतिनिधीनेही निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर केली नाही.

              तपासणीसाठी उपस्थित राहण्यास सर्व उमेदवारांना लेखी कळविण्यात आले होते. मात्र हे दोन उमेदवार  9 मे रोजी उपस्थित न राहिल्याने,  दि. ११ मे२०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पुनश्च उपस्थित राहण्याची एक संधी देण्यात आली होती. तथापिनॅशनल पीपल्स पार्टीचे संजय बंडू पाटील,  आणि अपक्ष उमेदवार संजय निवृत्ती पाटील यांनी  स्वतः किंवा आपल्या खर्च प्रतिनिधीमार्फत निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर केली नाही.

            लोकप्रतिनिधीत्व अधिनियम१९५१ मधील कलम ७७ (१) अन्वये निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने स्वतः किंवा त्याच्या खर्च प्रतिनिधीनेनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याच्या दिनांकापासून ते निकाल जाहीर झाल्याचा दिनांक हे दोन्ही दिवस धरूनहोणाऱ्या कालावधीच्या दरम्यान उमेदवाराने किंवा त्याच्या खर्च प्रतिनिधीने स्वतः केलेल्या किंवा त्यांनी प्राधिकृत केल्यानुसार झालेल्या निवडणूक खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा विहित नमुन्यात ठेवणे बंधनकारक आहे.

            तरी या दोन्ही उमेदवारांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम१९५१ मधील कलम ७७ (१) मधील तरतूदीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे भारतीय दंड संहिता१८६० च्या कलम १७१ (आय) मधील तरतुदीनुसार या दोन्ही उमेदवारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी कळविले आहे.

000

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

 

            मुंबईदि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

        चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

नंदुरबार -  ६०.६० टक्के

जळगाव -  ५१.९८ टक्के

रावेर - ५५.३६ टक्के

जालना - ५८.८५ टक्के

औरंगाबाद  - ५४.०२  टक्के

मावळ - ४६.०३ टक्के

पुणे - ४४.९० टक्के

शिरूर -  ४३.८९ टक्के

अहमदनगर -  ५३.२७ टक्के

शिर्डी - ५२.२७ टक्के

बीड -  ५८.२१ टक्के

निवडक बिघडलेली, वेडी माणस..

 🙏खालील लेख सर्व वाचला तर खरोखरच मानव जन्माला येऊन आपण काय करत आहोत हे कळेल .👏


*भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणस..!!!* 


रायगड १००० वेळा चढून जायचा प्रण कोणी करेल का....???

पण *श्री सुरेश वाडकरांनी* तो केला, आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. 

सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात. 


*ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते.* 


ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात. 


*एक  जेधे नावाच्या तरुण आहे.* 

हा तरुण *२७ जानेवारी* आणि *१६ ऑगस्टला* एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. *हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून...!!!* कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.                                      


*डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत.* 

रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की रूळ ओलांडू नका, पुलावरून जा. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर. तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार...? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील. 


*मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच "वेडा" सिंधी दिसतो.*

 दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात *"जलसेवा"* असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने  ह्या सिंध्याला बोलत केलं होतं. त्याने सांगितलं, 

"आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो." आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण साहब, अब वक्त बदल गया..., आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.


*ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात.*


खरंच हे जग चालवतो कोण..??? 


स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री म्हणत; खंडाळा घाटात आडवा आलेला डोंगर फोडून त्यात बोगदा बनवण्याचं वेड काहींना लागलं होतं. म्हणून मुंबईची रेल्वे घाटातून वर चढून सगळीकडे गेली.  *ज्यांना वेड लागतं तेच हे जग घडवत आहेत, सुंदर बनवत आहेत.*


वरवर पाहता ही माणसे वेडी वाटतात. कारण जे चारचौघे करत नाहीत ते हे करत असतात. पण त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे. 


*एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही..!!!*


किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची. 

आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका...!!! आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले आहे. प्रत्येकाने वरील माणसासारखा *"वेडा"* विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल. 


एक छोटी प्रतिज्ञा देशाच्या अर्थकारणात बदल घडवेल.


अमेरिका, युरोप सुंदर आहेत हे आपण खूप ऐकलं. आता आपला देशही सुंदर घडवू. थोडा वेडेपणा करू. 


*अजून एक उदाहरण. शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो.* 

जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसील, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या असे उपाय सुचवतो.


सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो. 

म्हणून ह्या माणसाला *"ऍसिडिटी मॅन"* नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्या शिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो...??? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो. 


*असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी.*

 पती-पत्नी दोघेही *सायकिऍट्रिस्ट* आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. *म्हणून त्यांना  Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.* 


*अशी ही बिघडलेली माणसे आहेत.* आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. *अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं.* 

*आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.*


एक अभंग आहे....;

*"आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना"*

नीट वाचलं की समजतं;  आम्ही *"बी घडलो,"*

तुम्ही *"बी घडाना..! आवडलं म्हणून कॉपी पेस्ट केलं तुम्ही पण पुढे पाठवा आणि काही तरी प्रतिज्ञा करा*

मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात

 दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

 

            मुंबईदि. १३ :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.

 

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 

नंदुरबार - ३७.३३ टक्के

जळगाव -  ३१.७० टक्के

रावेर - ३२.०२ टक्के

जालना - ३४.४२ टक्के

औरंगाबाद  -  ३२.३७ टक्के

मावळ - २७.१४ टक्के

पुणे - २६.४८ टक्के

शिरूर - २६.६२ टक्के

अहमदनगर - २९.४५ टक्के

शिर्डी - ३०.४९  टक्के

बीड - ३३.६५ टक्के

सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान

 राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात

सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान

 

            मुंबईदि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.

 

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे...

नंदुरबार  - ८.४३ टक्के

जळगाव  - ६.१४ टक्के

रावेर    - ७.१४ टक्के

जालना   - ६.८८ टक्के

औरंगाबाद  -७.५२ टक्के

मावळ  - ५.३८ टक्के

पुणे  - ६.६१ टक्के

शिरूर - ४.९७ टक्के

अहमदनगर -५.१३ टक्के

शिर्डी  - ६.८३  टक्के

बीड  - ६.७२ टक्के

 

Featured post

Lakshvedhi