सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 1 May 2024
1मे
1 *मे* कांना सांभाळून घ्या.
1 *मे* कांची काळजी घ्या.
1 *मे* कांच्या संपर्कात राहा.
1 *मे* कांना मदत करा.
1 *मे* काशी विवाद टाळा
1 *मे* कांना गोड बोला.
1 *मे* कांना उपदेश देने बन्द करा.
1 *मे* कांचे विचार समजून घ्या.
1 *मे* कांशी चांगले संवांद करा.
1 *मे* कांत संघर्ष होणारी वक्तव्य टाळा.
1 *मे* कांशी गोडी गुलाबीने वागुया.
1 *मे* कांची आपुलकी ठेवुया.
1 *मे* महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
🍀🌸🙏🔽🙏🌸🍀
नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर
नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर
मुंबई उपनगर, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 करीता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या निवडणूक निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
26- मुंबई उत्तर मतदासंघासाठी दीपेंद्रकुमार आणि नेहा चौधरी निवडणूक निरीक्षक
26- मुंबई उत्तर मतदासंघाकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार आणि नेहा चौधरी यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे.
श्री. दीपेंद्रकुमार यांचा मोबाईल क्रमांक 8928567686 असा आहे. ते 160-कांदिवली पूर्व, 161 चारकोप आणि 162- मालाड पश्चिम या विधानसभा मतदासंघांचे खर्च निरीक्षक असतील. तर, श्रीमती चौधरी यांच्याकडे विधानसभा मतदारसंघ 152 बोरिवली, 153 दहिसर आणि 154 मागाठाणे) साठी खर्च निरीक्षक असतील. श्रीमती चौधरी यांचा संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक 9372791082 असा आहे.
27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती निवडणूक निरीक्षक
27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. नागरिकांसाठी खर्च निरीक्षकांनी त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.
त्यांचा संपर्क क्रमांक असा : श्री. राजकुमार चंदन (मोबाईल क्रमांक – 9321405417) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, तर श्री. किरण के. छत्रपती (मोबाईल क्रमांक - 8928571922) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 164- वर्सोवा, 165-अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्वच्या खर्च निरीक्षणाशी संबंधित समस्यांबाबत तक्रारींसाठी संपर्क साधावा, असे आवाहन खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी केले आहे.
28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी डॉ.सुनील यादव निवडणूक निरीक्षक
28 - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी डॉ. सुनील यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. खर्चविषयक बाबी आणि आचारसंहितेच्या अनुषंगाने तक्रारी असल्यास 8130122499 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. यादव यांनी केले आहे
29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी सूरजकुमार गुप्ता निवडणूक खर्च निरीक्षक
29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुरजकुमार गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. गुप्ता यांचे कार्यालय हे 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व, मुंबई 400051 येथे असून त्यांचा संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक 8591369100 असा आहे.
000
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहभेट उपक्रम
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी
मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहभेट उपक्रम
मुंबई उपनगर, दि. 30 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्यात आता ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत गृहभेट उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यास मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई उपनगर जिल्हा जनगणनेनुसार देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या 93.56 लाख असून जिल्ह्यात 87 गावांचा समावेश आहे. हीच बाब विचारात घेवून लोकशाही शासनव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपले एक मत किती बहुमोल आहे, हे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या माध्यमातून सांगण्यासाठी 'गृहभेट' हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदारांमधील मतदानाबाबतची उदासीनता दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत मतदारांच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. गृहभेटीमध्ये मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यामुळे देशाचा आणि ओघाने आपला (मतदारांचा) कसा फायदा होणार आहे, हे सांगणे मतदान केंद्र पातळीवर तयार करण्यात आलेल्या पथकाचे मुख्य काम आहे.
या उपक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्य सेविका व आशा सेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, महानगरपालिकेच्या नियोजन विभागाचे कम्युनिटी ऑर्गनायझर (CO), कर निर्धारण आणि संकलन विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता उपक्रमांमध्ये क्षेत्रीय स्तरावर काम करणारे कनिष्ठ अवेक्षक व महानगरपालिका मुकादम, 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान' योजनेचे संस्थाचालक, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांसह नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांचा समावेश आहे. एका मतदान केंद्रावर अंदाजे १२०० मतदार आहेत, हे गृहीत धरून कमीत-कमी तीन ते चार जणांचे पथक तयार करण्यात आले आहेत. एका पथकाने किमान ३०० कुटुंबियांना भेट देवून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या गृहभेटीत प्रामुख्याने ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
००००
लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय
‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय
- एस.चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
मुंबई, दि. 30 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा लोकराज्यचा निवडणू्क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मत, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.
राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होत असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत असलेली तयारी, मतदारांच्या सोयीसाठीच्या विविध ॲपची माहिती, त्याचसोबत आचारसंहिता बाबतची सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली आहे. यासोबतच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची विश्वासार्हता, स्वीप उपक्रम, यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अभ्यासक,पत्रकार वाचकांच्या सुलभ संदर्भासाठी या अंकात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तसेच वाचकांसाठी हा विशेषांक dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच महासंचालनालयाच्या महासंवाद या ब्लॉग समाजमाध्यमावर ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम
मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात बुधवारी (दि. 1 मे) सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करणार आहेत.
मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून 8 वाजता तसेच आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन सकाळी 9 वाजता प्रसारित केल्या जाणार आहे.
Programmes of Governor on Maharashtra Day
The Governor of Maharashtra Ramesh Bais will unfurl the National Flag on the occasion of the 65th Foundation day of Maharashtra at Chhatrapati Shivaji Maharaj Park, Dadar, Mumbai at 8 am on Wednesday, 1st May.
The Governor will thereafter participate in the Maharashtra Day Celebrations organized by the Brihan Mumbai Municipal Corporation at Krida Bhavan near Shivaji Park in Mumbai at 8.40 am.
Doordarshan Sahyadri will broadcast the Governor’s Maharshtra Day Message at 8 am and Asmita Vahini of Akashvani will broadcast the Governor’s Maharashtra Day Message at 9 am on 1st May. The Message will also be broadcast by all Akashvani Kendras in the State.
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...