Friday, 9 February 2024

पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना विद्यार्थी उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील

 

पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग

सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना

विद्यार्थी उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

            मुंबई, दि. 8 - राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. विभागामार्फत अभ्यास करुन तज्ज्ञांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल आणि ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

            राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर मंत्री श्री. केसरकर यांच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.

            शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी, असेही या परिपत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

            या अनुषंगाने केलेल्या अभ्यासामध्ये पुढील बाबी समोर आल्या आहेत. काही शाळा विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून येते. विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने ते शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात आणि रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊन ते बहुदा आजारी पडतात.  सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

            यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असून शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

            या परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळेत बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत या सूचना निर्गमित करण्यात आल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

सायबर सुरक्षित राज्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पाची आखणी

 सायबर सुरक्षित राज्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पाची आखणी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

            नाशिक, दि. ८ : आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षित राज्य बनविण्याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ व संसाधनानी परिपूर्ण अशा प्रकल्प निर्मितीची आखणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 च्या उद्घाटन समारंभा प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर पोलीस महासंचालक निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. आरती सिंग, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक दत्ता कराळे, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्‍हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात सायबर सुरक्षेसाठी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्वेस्ट‍िगेशन, सेंटर ऑफ एक्सलन्स, क्लाऊड आधारित डेटा सेंटर, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर यांचा समावेश असलेला 837 कोटींचा सायबर सुरक्षा प्रकल्प निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या प्रकल्पाला राज्यातील सर्व सायबर पोलीस ठाणे जोडण्यात येणार असून 24/7 कार्यरत असणाऱ्या कॉल सेंटरवर दूरध्वनी, मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्यांविषयक तक्रार नोंदवून या गुन्ह्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात येणार आहे. तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच पोलीस दलातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरण्याकरीता साधारण १७ हजार पदांची भरती प्रक्रियाही सुरु करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना घरबांधणीसाठी पूर्वीप्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मोटार परिवहन विभागासाठी आस्थापना मंडळे गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            जगातही महाराष्ट्र पोलिसांचा जसा लौकीक आहे, तसाच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही दबदबा आहे. यावेळी भारतासाठी पहिलं ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. खेळ, खिळाडुवृत्ती आणि पोलीस दलाचे मनोबल यांचा परस्पर संबंध असल्याने राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात येतो आहे. खेळातूनच उत्तम पोलीस मनुष्यबळ मिळणार असल्याने क्रीडा सुविधांवरही भर देण्यात येतो. याचअनुषंगाने बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारयाचे नियोजित असून छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठास ५०  कोटी रुपये व ४८ हेक्टर जागाही उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी विभागीय ५० कोटी, जिल्ह्यासाठी २५ आणि तालुक्यासाठी ५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी रोख पारितोषिकांत पाच पटींनी भरीव वाढ करण्यात आली आहे. खेलो इंडिया, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यातील खेळाडूंना २८ कोटी रुपयांची पारितोषिके वितरीत केली आहेत. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण देण्यात येत आहे. क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरु केली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

            राज्याच्या पोलीस दलातील खेळाडुंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शारिरीक तंदुरूस्तीतून कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची क्षमता, ताकद अंगी येते. पोलीस दलातील प्रत्येकामध्ये एक क्रीडापटू, खेळाडू असतो. या खेळाडूंना पोलीस क्रीडा स्पर्धाच्या निमित्तानं चांगले मैदान मिळत असून हे मैदान जितके गाजवाल, तितकीच चांगली प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देशासाठी उत्तम असे क्रीडापटू मिळातील या अपेक्षेसह सर्वांनी देशाचे आणि पर्यायाने आपल्या राज्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचवाण्यासाठी योगदान द्यावे, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

            सांघिक क्रीडा प्रकारात हॉकी, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो यांचा तर कुस्ती, ॲथलेटिक, बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, स्वीमिंग, ज्युदो, क्रॉस कंट्री, त्वायक्वांदो, वु-शू, शुटिंग (स्पोर्ट वेपन), शुटिंग (सर्व्हिस वेपन), पावर लिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, वरिष्ठ अधिकारी शुटींग, 05 कि.मी. चालणे इत्यादी वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे. यास्पर्धेत दोन हजार 444 पुरुष, तर 888 महिला सहभागी झाल्या आहेत.

            यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला यांनी केले तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक श्री. कराळे यांनी मानले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

क्रीडा स्पर्धेत सहभागी संघ….

            अमरावती परिक्षेत्र, औरंगाबाद आणि नांदेड परिक्षेत्र, कोल्हापुर परिक्षेत्र, नवी मुंबई / मीरा भाईंदर (कोकण परिक्षेत्र), मुंबई शहर, नागपूर शहर, नागपूर परिक्षेत्र, नाशिक परिक्षेत्र, पुणे शहर / पिंपरी चिंचवड आयुक्तालय, रेल्वे परिक्षेत्र, एस.आर.पी.एफ. परिक्षेत्र, ठाणे शहर, प्रशिक्षण संचालनालय.

राज्य पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा वाढदिवस राज्य पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी, कर्मचारी कुटुंबीयांसमवेत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे, पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला, पोलीस आयुक्त श्री. कर्णिक यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू


पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू 

ओटीएममध्ये एमटीडीसीच्या दालनाला प्रतिसाद 

मुंबई, ९ फेब्रुवारी,  : कोकण, मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, नागपूर, ताडोबा, शिर्डी, छत्रपती संभाजी नगर तसेच महाराष्ट्रातील गड किल्ले अशा महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळ आणि समृद्ध वारासंघाची ओळख जगभरात पोहचविणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दालन सध्या जगभरातील आकर्षण बनले आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ओटीएम प्रदर्शनी मध्ये असलेल्या या दालनाला भारतासह जगभरातील पर्यटक आणि पर्यटन संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्यांनाचा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे, पर्यटन  डॉ. बी.आर. पाटील, संचालक, पर्यटन संचालनालय यांनी महाराष्ट्रातील कंपन्यांचे प्रमुख प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय पाहुणे आणि पर्यटन भागधारकांच्या उपस्थितीत प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन केले.

  यावेळी जयस्वाल म्हणाले की, या प्रदर्शनीमध्ये देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटन क्षेत्रातील ट्रॅव्हल एजन्सी, रिसॉर्ट, विविध पर्यटन संस्थांची माहिती असलेले माहितीपूर्ण स्टॉल आहेत. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इतर राज्यातील पर्यटन क्षेत्रातील विविध उद्योजकांशी  चर्चा करता येईल. पर्यटन क्षेत्रात इतर राज्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संवादातून समजतील, इतर राज्यांच्या पर्यटन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन राज्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा नक्कीच लाभ होईल. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना ‘ओटीएम’ प्रदर्शनीच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाची माहिती देशपातळीवर नेता येईल. "कोकण, मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, नागपूर, ताडोबा, शिर्डी, छत्रपती संभाजी नगर आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या कंपन्यांसह राज्यातील प्रादेशिक वैविध्य उत्कृष्टपणे पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केले जाईल." असे जयश्री भोज, आयएएस मानद प्रधान सचिव, पर्यटन यांनी यावेळी सांगितले. कॉन्क्लेव्ह, रोड शो आणि ट्रेड मेळावे अशा कार्यक्रमांची मालिका करण्यावर महाराष्ट्र टुरिझमचा भर आहे. या प्रक्रियेत, दूरसंचार विभाग देशभरातील विविध प्रमुख पर्यटन व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होत आहे”, अशी माहिती दिली.


दुनिया के लिए महाराष्ट्र, अब एक विश्वव्यापी आकर्षण 

ओटीएम में एमटीडीसी की गैलरी पर प्रतिक्रिया

मुंबई, 9 फरवरी: महाराष्ट्र पर्यटन विकास निगम का हॉल, जो कोंकण, मुंबई, लोनावाला, महाबलेश्वर, नागपुर, ताडोबा, शिरडी, छत्रपति संभाजी नगर के साथ-साथ महाराष्ट्र के गढ़ किलों जैसे विभिन्न पर्यटन स्थलों और समृद्ध वारसा  का ज्ञान लाता है। दुनिया के लिए महाराष्ट्र, अब एक विश्वव्यापी आकर्षण बन गया है। जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स में ओटीएम प्रदर्शनी में स्थित इस प्रदर्शनी को पूरे भारत के साथ-साथ दुनिया भर से पर्यटकों और पर्यटन से संबंधित सेवा कंपनियों से प्रतिक्रिया मिल रही है। महाराष्ट्र पर्यटन विकास निगम के महाप्रबंधक चंद्रशेखर जयसवाल, पर्यटन निदेशालय कोंकण संभागीय पर्यटन उपनिदेशक हनुमंत हेडे, पर्यटन डॉ. बी.आर. पर्यटन निदेशालय के निदेशक पाटिल ने महाराष्ट्र की कंपनियों के प्रमुख प्रतिनिधियों, अंतरराष्ट्रीय मेहमानों और पर्यटन हितधारकों की उपस्थिति में प्रदर्शनी स्टाल का उद्घाटन किया। इस अवसर पर जयसवाल ने कहा कि इस प्रदर्शनी में देश के हर राज्य के पर्यटन क्षेत्र की ट्रैवल एजेंसियों, रिसॉर्ट्स, विभिन्न पर्यटन संगठनों की जानकारी वाले ज्ञानवर्धक स्टॉल लगे हैं. घरेलू पर्यटन को बढ़ावा देने के लिए अन्य राज्यों के पर्यटन क्षेत्र के विभिन्न उद्यमियों से चर्चा की जा सकती है। संवाद के माध्यम से अन्य राज्यों द्वारा पर्यटन के क्षेत्र में की जा रही नवीन गतिविधियों को समझा जाएगा, इससे निश्चित रूप से अन्य राज्यों की पर्यटन क्षेत्र में की जा रही नवीन गतिविधियों को जानने से राज्य में पर्यटन के विकास में लाभ होगा। 'ओटीएम' प्रदर्शनी के माध्यम से राज्य के पर्यटन क्षेत्र के उद्यमी स्थानीय पर्यटन की जानकारी राष्ट्रीय स्तर तक पहुंचा सकेंगे। "कोंकण, मुंबई, लोनावाला, महाबलेश्वर, नागपुर, ताडोबा, शिरडी, छत्रपति संभाजीनगर और अन्य जगहों से आने वाली कंपनियों के साथ राज्य की क्षेत्रीय विविधता को मंडप में अच्छी तरह से प्रदर्शित किया जाएगा।" जयश्री भोज, आईएएस मानद प्रमुख सचिव, पर्यटन ने इस अवसर पर कहा। महाराष्ट्र पर्यटन कॉन्क्लेव, रोड शो और व्यापार मेलों जैसे कार्यक्रमों की एक श्रृंखला आयोजित करने पर ध्यान केंद्रित करता है। इस प्रक्रिया में, दूरसंचार विभाग देश भर के विभिन्न प्रमुख पर्यटन व्यापार मेलों में भाग ले रहा है", बताया गया।

पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू ओटीएममध्ये एमटीडीसीच्या दालनाला प्रतिसाद

 पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू 

ओटीएममध्ये एमटीडीसीच्या दालनाला प्रतिसाद 

मुंबई, ९ फेब्रुवारी,  : कोकण, मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, नागपूर, ताडोबा, शिर्डी, छत्रपती संभाजी नगर तसेच महाराष्ट्रातील गड किल्ले अशा महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळ आणि समृद्ध वारासंघाची ओळख जगभरात पोहचविणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दालन सध्या जगभरातील आकर्षण बनले आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ओटीएम प्रदर्शनी मध्ये असलेल्या या दालनाला भारतासह जगभरातील पर्यटक आणि पर्यटन संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्यांनाचा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे, पर्यटन  डॉ. बी.आर. पाटील, संचालक, पर्यटन संचालनालय यांनी महाराष्ट्रातील कंपन्यांचे प्रमुख प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय पाहुणे आणि पर्यटन भागधारकांच्या उपस्थितीत प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन केले.

  यावेळी जयस्वाल म्हणाले की, या प्रदर्शनीमध्ये देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटन क्षेत्रातील ट्रॅव्हल एजन्सी, रिसॉर्ट, विविध पर्यटन संस्थांची माहिती असलेले माहितीपूर्ण स्टॉल आहेत. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इतर राज्यातील पर्यटन क्षेत्रातील विविध उद्योजकांशी  चर्चा करता येईल. पर्यटन क्षेत्रात इतर राज्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संवादातून समजतील, इतर राज्यांच्या पर्यटन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन राज्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा नक्कीच लाभ होईल. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना ‘ओटीएम’ प्रदर्शनीच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाची माहिती देशपातळीवर नेता येईल. "कोकण, मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, नागपूर, ताडोबा, शिर्डी, छत्रपती संभाजी नगर आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या कंपन्यांसह राज्यातील प्रादेशिक वैविध्य उत्कृष्टपणे पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केले जाईल." असे जयश्री भोज, आयएएस मानद प्रधान सचिव, पर्यटन यांनी यावेळी सांगितले. कॉन्क्लेव्ह, रोड शो आणि ट्रेड मेळावे अशा कार्यक्रमांची मालिका करण्यावर महाराष्ट्र टुरिझमचा भर आहे. या प्रक्रियेत, दूरसंचार विभाग देशभरातील विविध प्रमुख पर्यटन व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होत आहे”, अशी माहिती दिली.


दुनिया के लिए महाराष्ट्र, अब एक विश्वव्यापी आकर्षण 

ओटीएम में एमटीडीसी की गैलरी पर प्रतिक्रिया

मुंबई, 9 फरवरी: महाराष्ट्र पर्यटन विकास निगम का हॉल, जो कोंकण, मुंबई, लोनावाला, महाबलेश्वर, नागपुर, ताडोबा, शिरडी, छत्रपति संभाजी नगर के साथ-साथ महाराष्ट्र के गढ़ किलों जैसे विभिन्न पर्यटन स्थलों और समृद्ध वारसा  का ज्ञान लाता है। दुनिया के लिए महाराष्ट्र, अब एक विश्वव्यापी आकर्षण बन गया है। जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स में ओटीएम प्रदर्शनी में स्थित इस प्रदर्शनी को पूरे भारत के साथ-साथ दुनिया भर से पर्यटकों और पर्यटन से संबंधित सेवा कंपनियों से प्रतिक्रिया मिल रही है। महाराष्ट्र पर्यटन विकास निगम के महाप्रबंधक चंद्रशेखर जयसवाल, पर्यटन निदेशालय कोंकण संभागीय पर्यटन उपनिदेशक हनुमंत हेडे, पर्यटन डॉ. बी.आर. पर्यटन निदेशालय के निदेशक पाटिल ने महाराष्ट्र की कंपनियों के प्रमुख प्रतिनिधियों, अंतरराष्ट्रीय मेहमानों और पर्यटन हितधारकों की उपस्थिति में प्रदर्शनी स्टाल का उद्घाटन किया। इस अवसर पर जयसवाल ने कहा कि इस प्रदर्शनी में देश के हर राज्य के पर्यटन क्षेत्र की ट्रैवल एजेंसियों, रिसॉर्ट्स, विभिन्न पर्यटन संगठनों की जानकारी वाले ज्ञानवर्धक स्टॉल लगे हैं. घरेलू पर्यटन को बढ़ावा देने के लिए अन्य राज्यों के पर्यटन क्षेत्र के विभिन्न उद्यमियों से चर्चा की जा सकती है। संवाद के माध्यम से अन्य राज्यों द्वारा पर्यटन के क्षेत्र में की जा रही नवीन गतिविधियों को समझा जाएगा, इससे निश्चित रूप से अन्य राज्यों की पर्यटन क्षेत्र में की जा रही नवीन गतिविधियों को जानने से राज्य में पर्यटन के विकास में लाभ होगा। 'ओटीएम' प्रदर्शनी के माध्यम से राज्य के पर्यटन क्षेत्र के उद्यमी स्थानीय पर्यटन की जानकारी राष्ट्रीय स्तर तक पहुंचा सकेंगे। "कोंकण, मुंबई, लोनावाला, महाबलेश्वर, नागपुर, ताडोबा, शिरडी, छत्रपति संभाजीनगर और अन्य जगहों से आने वाली कंपनियों के साथ राज्य की क्षेत्रीय विविधता को मंडप में अच्छी तरह से प्रदर्शित किया जाएगा।" जयश्री भोज, आईएएस मानद प्रमुख सचिव, पर्यटन ने इस अवसर पर कहा। महाराष्ट्र पर्यटन कॉन्क्लेव, रोड शो और व्यापार मेलों जैसे कार्यक्रमों की एक श्रृंखला आयोजित करने पर ध्यान केंद्रित करता है। इस प्रक्रिया में, दूरसंचार विभाग देश भर के विभिन्न प्रमुख पर्यटन व्यापार मेलों में भाग ले रहा है", बताया गया।

Thursday, 8 February 2024

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची

 


मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ

विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि.७ : विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची भूमिका महत्वाची असून विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांना योगदान देता यावे, त्यांचा सक्रिय सहभाग वाढवा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत@२०४७: Voice of Youth’ हा उपक्रम जाहीर केला आहे.असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

            मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ सोहळा   राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली आणि  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रदान जगदीश कुमार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी,प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव  डॉ. बळीराम गायकवाड, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ  डॉ. प्रसाद करांडे उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, सर्व यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना  खूप आनंद होत आहे. आजचा क्षण हा केवळ या गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच नाही तर प्राध्यापक, पालक आणि ज्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.त्यांच्यासाठी देखील महत्वाचा क्षण आहे.असे सांगून राज्यपालांनी सर्वांचे अभिनंदन केले.

            राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या सुवर्ण युगाच्या काळात आजची  युवा पिढी महत्वाची भूमिका बजावणार, आज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणार आहे.  विद्यापीठातून पदवी घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.

            नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे बनवले गेले आहे. या शैक्षणिक धोरणाने आकांक्षी उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि पुनर्रचना करण्यात आली आहे. विकसित भारतासाठी पुढील दहा वर्षांत विद्यापीठाला भारतातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान प्राप्त होईल यासाठी लक्ष्य निश्चित करावे, विद्यापीठ प्रशासकीय कामकाजात सुधारणा करून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे प्रामाणिकपणे निराकरण करण्यासाठी प्रणाली विकसित करावी. गाव दत्तक प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे, कौशल्य आधारित उद्योजकता आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी केल्या.

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक ओळख निर्माण केली : मंत्री श्री.पाटील

            मुंबई विद्यापीठाने १६७ वर्षाचा गौरवशाली प्रवास केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना अनुभवला आहे आणि  तीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. सामाजिक व औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या ज्ञानशाखेला उत्कृष्ट मापदंड निश्चित करता आला आणि उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. जगभरात मुंबई विद्यापीठाने आपली ओळख निर्माण केली आहे.

             मुंबई शहर सांस्कृतिक एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेचे  प्रतिबिंब आहे. येथील अथ:क कार्यसंस्कृती या शहराची वैशिष्ट्ये आहे. या संस्कृतीला आत्मसात केल्यानंतर जगाच्या पाठीवर कुठेही गेला आणि कितीही  आव्हाने आली तरी ती आव्हाने यशस्वीपणे पूर्ण करण्याची ताकत या विद्यार्थ्यांकडे असेल.

            नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय संशोधन अनिवार्य करून  समाजाच्या आणि मानवतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे.यात कौशल्य विकास व रोजगार क्षमता आणि उद्योजकता वाढीला प्रोत्साहन दिले आहे. एका बाजूस ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य तर दुसरीकडे विकसित भारत संकल्पनेत सहभागी होऊन दर्जेदार शैक्षणिक संस्था,कुशल मनुष्यबळ उपलब्धता याकडे अधिक लक्ष दिले आहे. असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

            श्री.जगदीशकुमार म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवीन संशोधनाला अधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. विकासित भारतासाठी युवक, महिला,शेतकरी आणि शिक्षण हे प्रमुख स्तंभ आहेत.याला अधिक विकसित केले तर त्याचे सकारात्मक परिमाण देशाच्या विकासावर होतील.


लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेनंतर आरोग्य विभागाद्वारे शीघ्र कृती पथकाची स्थापना

 लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेनंतर आरोग्य विभागाद्वारे

 शीघ्र कृती पथकाची स्थापना

 

            मुंबई, दि. 07 : नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामधील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये प्रसादातून सुमारे 2 हजार भाविकांना मंगळवारी, दि. 6 फेब्रुवारी रोजी अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने शीघ्र कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेची शहानिशा करून अहवाल सादर करावा, असे आदेश संचालक, पुणे, आरोग्य सेवा यांनी जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. दरम्यान, सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सद्यस्थितीत विषबाधेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

            कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने आयोजित केलेल्या यात्रेमध्ये 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर सुमारे 2 हजार भाविकांना 7 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळून आले आहे. या रुग्णांना मळमळ, उलटी, शौचास लागणे अशी लक्षणे दिसून आल्यानंतर 600 रुग्णांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड, 100 रुग्णांना श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, 150 रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय लोहा, 20 रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, माळाकोळी, 150 रुग्णांना लोहा येथील खाजगी रुग्णालय  येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे अतिरिक्त खाटांची पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.

              रुग्णांना कोष्ठवाडी, सावरगाव, पोस्ट वाडी, रिसनगाव, मस्की या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री 102 क्रमांकाच्या 8 रुग्णवाहिका आणि टोल फ्री 108 क्रमांकाच्या 6 रुग्णवाहिका, खासगी 3 बसेस,  महामंडळाची एक बस तसेच गावातील इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला आहे. रुग्णांना औषधोपचारासाठी मुबलक औषधींचा साठा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा रुग्णालय औषधी भांडार, जिल्हा परिषद नांदेड औषधी भांडार येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे तात्काळ औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी अन्न, पाणी आणि उलटीचे नमुने घेण्यात आलेले आहेत.

            आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत या गावामध्ये 5 आरोग्य पथके हे औषधोपचार, सर्वेक्षणसाठी कार्यरत आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शीघ्र कृती पथक स्थापन करण्यात आलेले आहे. नांदेडचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी हे पथकाचे प्रमुख असून  डॉ. नितीन अंभोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. बालाजी माने (बाल रोग तज्ञ) जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. तज्जमुल पटेल, जिल्हा रुग्णालय नांदेड यांचा या पथकात समावेश आहे.

            याकामी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने कार्यरत आहेत. विषबाधेमुळे सद्यस्थितीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

0000

राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करावे

 राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करावे

-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्यस्तरीय मेळाव्यात 400 संस्थाचा सहभाग    

     

              मुंबई, दि. ७ :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी  आणि नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी  सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश र्काशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

            हायलॅण्ड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता राज्यस्तरीय 'नमो महारोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोमध्ये ४०० विविध औद्योगिक शासकीय व खाजगी संस्था सहभागी होणार असून हा मेळावा २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४  रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल.या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनव्हेस्टर्स व इन्क्यूबेटर्स या सर्वांना सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

         मंत्रालयातील परिषद सभागृह येथे राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा पूर्व तयारीबाबत बैठक झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, ठाणेचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळसिंग राजपूत, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगूरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिंगाबर दळवी, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील,नवी मुंबईचे कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे उपआयुक्त दि.दे.पवास यासह इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

           कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, या मेळाव्यात राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी आणि औद्योगिक संस्थांनी नावनोंदणी करावी यासाठी सर्व विभागांनी, स्थानिक प्रशासनाने याबाबत जनजागृती करावी. जास्तीत जास्त उद्योजक आणि विविध शासकीय आस्थापना यांनी याबाबत माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी  यासाठी प्रयत्न करावेत. मेळाव्यासाठी उभारण्यात येणारे स्टॉल्स आणि रोजगार नोंदणी याबाबत स्थानिक प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक शासकीय व खासगी संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. नमो महारोजगार मेळाव्यात जास्तीत नोकरीइच्छुक उमेदवार यांचा सहभाग वाढावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.तसेच नमो महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने उभारण्यात येणा-या सोयी सुविधांचा अशा सूचना त्यांनी केल्या.                          

नमो महारोजगार राज्यस्तरीय मेळावा

           राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर, पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेत रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंकवर जाऊन उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करुन मुलाखत देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील, त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत.या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

                  नमो महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत

       कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                   -000000-

संध्या गरवारे/विसंअ

Featured post

Lakshvedhi