सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 17 May 2023
औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?* 📕
Tuesday, 16 May 2023
सैन्यदलातील अधिकारी पदभरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी
सैन्यदलातील अधिकारी पदभरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी
मुंबई दि.१५: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी आणि प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यासाठी मुलाखती होणार असून मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बुधवारी १७ मे २०२३ रोजी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
नाशिकमधील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. २९ मे ते ७ जून २०२३ या कालावधीत एसएसबीचे कोर्स क्र ५३ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे दि. १७ मे २०२३ रोजी मुलाखतीस हजार रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी पुणे सैनिक कल्याण विभागाच्या (Department of Sainik Welfare, Pune (DSW) या फेसबुक पेजवर सर्च करून त्यामधील SSB ५३ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्ठांची प्रत भरून सोबत आणावी.
केंद्रातील कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता आवश्यक असून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र सोबत आणावेत. त्यानुसार कंम्बाईंड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSC-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. किंवा एनसीसी (C) सर्टिफिकेट अ किंवा ब श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.किंवा टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. किंवा विद्यापीठ प्रवेश योजनेसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी pctcoic@yahoo.in व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे
चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि.16 : मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2022-2023 मधील चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, भिक्षेकरी गृह परीसर, आर सी मार्ग, चेंबुर ठिकाणी होणार असून या अर्जांचे वाटप व स्वीकृती दि. 11 मे 23 पासून ते दि.20 मे 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांवरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 750 क्षमतेचे मुलांचे वसतिगृह प्रस्तावित आहे. यापैकी 250 मुलांची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष 2022-23 या वर्षांमध्ये सुरू करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी निवासस्थान तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपलब्ध झालेले आहेत. या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रस्तावित आहे.
वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता पुढीलप्रमाणे आहे.विदयार्थी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावा. सदर विद्यार्थ्याकडे पालकांच्या उत्पन्नाचा दाखला असावा.
विद्यार्थी सन 2022-2023 मध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावा, स्थानिक रहिवासी नसावा, विद्यार्थ्याचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही.
पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत वसतिगृहात प्रवेशासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, भिक्षेकरी गृह परिसर, आर सी मार्ग, चेंबूर या ठिकाणी अर्ज सादर करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे समाज कल्याण सहायक आयुक्त, प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
००००
पाकिस्तान मधून सुटका झालेल्या मच्छीमारांचे स्वागत..!
पाकिस्तान मधून सुटका झालेल्या मच्छीमारांचे स्वागत..!
# उर्वरित मच्छीमारांच्या सुटकेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत – आमदार विनोद निकोले
# आमदार निकोले यांच्या मागणीला यश
मुंबई /डहाणू. (विशेष प्रतिनिधी) – दि. 02/10/2022 रोजी डहाणूचे मच्छीमार पाकिस्तानच्या ताब्यात असल्याबाबतचे ईमेल द्वारे प्रशासनाला कळविले होते. तद्नंतर आता त्यांची सुटका होत आहे ही आनंदाची बाब आहे. त्याचे स्वागत असून उर्वरित मच्छीमारांची सुटका करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावे अशी जोरदार मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केली आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, आदिवासी बांधवांना रोजगार मिळत नाही, म्हणून ते गुजरातच्या मच्छीमार समाजासोबत खलाशी म्हणून काम करत असतात
. पण अनवधानाने मासेमारी करताना पाकिस्तानच्या हद्दीत असल्याचा ठपका ठेऊन त्या मच्छीमारांना ताब्यात घेऊन त्यांना डांबून ठेवण्यात येते. हे अतिशय निंदनीय आहे. आपल्या भारत देशातील 666 मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यापैकी 600 मच्छिमारांची सोडण्याची अधिकृत घोषणा दि. 13 मे 2023 रोजी पाकिस्तान सरकारने केली आहे. नुकत्याच मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत मंत्रालयाकडून जारी केलेल्या पत्रानुसार पहिला गट दि. 11 मे 2023 रोजी 200 मच्छिमार जिल्हा तुरुंग मलिर, कराची येथून वाघा बॉर्डरवर पाठविण्यात येतील. दुसरा गट दि. 02 जून 2023 रोजी 200 मच्छिमार पाठविण्यात येतील तसेच तिसरा गट 100 मच्छिमारांचा दि. 03 जुलै 2023 रोजी पाठविण्यात येईल असे त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.
यात साधारण 30 मच्छिमार हे पालघर जिल्ह्यातील असून 05 मच्छिमारांना पहिल्या गटात सोडण्यात आले. यात पालघर जिल्ह्यासहित डहाणू व तलासरी येथील विविध पाड्यातील आदिवासी बांधवांचा देखील समावेश आहे, अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी दिली आहे, आणि त्यांच्या सुटकेचे स्वागत केले आहे.
कफ*घरगुती उपचार
*कफ*घरगुती उपचार
१)हळदपूड साजूक तुपावर मंद आचेवर भाजून एक चमचा आले आणि तुळशी रसात ३वेळा
२)वारंवार कफ ,सर्दी,पडसे,खोकला पडत असल्यास सुवर्ण सुतशेखर दोन डाळी एवढा मध,मोरावळा, किंवा दूध साखरेतून. सकाळ संध्याकाळी
३)रोज सकाळ संध्याकाळी ओवा व गुळ हळद यांचे मिश्रण जेवणा नंतर चावून खाणे.
४)शक्यतो रोज गरमपाणी पिणे फ्रिजचे पाणी टाळावेच.
५)आल्याचा रस व मध व हळद समभाग घेऊन दोन वेळा चाटण स.सं.
६)हळद ,मिरपूड चिमुटभर,मध,कोरफड गर चाटण केल्यास कफाचे बेटके येणं बंद होतं
६)रात्री गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेतल्यास या विकारातून कायमस्वरूपी सुटका होते.
वैद्य गजानन
*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,*
*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,*
*त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*
_*(
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे ३१ मे रोजी वितरण -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे
३१ मे रोजी वितरण - महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
· राज्यातील सर्व ग्रामपंचायत तसेच गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांची होणार निवड
मुंबई,दि.१५ : महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येणार असून ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या महिलांना आपल्या कार्यअहवालासह शनिवार दि. २० मे पर्यंत अर्ज स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये करावयाचा आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी बालविवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या क्षेत्रात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतलेला असावा.
पुरस्कार निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम योग्य पदधतीने राबविण्याची दक्षता घ्यावी, तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी व संरक्षण अधिकारी यांनी समन्वयाने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम राबवावा. ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येत आहे. याबाबतचाच महिला व बालविकास विभागाचा शासननिर्णय दिनांक ९ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
-20 उर्जा संक्रमण कार्य गटाची बैठक आजपासून मुंबईत सुरू
जी-20 उर्जा संक्रमण कार्य गटाची बैठक आजपासून मुंबईत सुरू
हवामान बदलाचा सामना आणि ऊर्जा सुरक्षेच्या हमीसाठीअपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करावा
- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे
मुंबई, 15 :- भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील तिसरी उर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी-20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA), आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 100 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
तिसऱ्या उर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठकीच्या पहिल्या दिवशी, भारत सरकारचे रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या विशेष संबोधनात शाश्वत ऊर्जा स्रोत आणि त्यांचे संवर्धन तसेच कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या धोरणांचा विकास आणि अवलंब करण्याला प्राधान्य देण्यावर भर दिला. “शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी जी-20 राष्ट्रांवर एक अद्वितीय जबाबदारी आहे.” असेही श्री. दानवे म्हणाले.
या दृष्टीने या अशा प्रकारच्या ऊर्जा संक्रमणाबाबत (उर्जास्रोतांच्या वापरातील बदल) भारत आघाडीवर असून जगात करत असलेले नेतृत्व खूप महत्त्वाचे आहे, धोरणे आखणे आणि नियमन करणे याबाबत सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. निधी पुरवठा आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यात वित्तीय संस्था सुद्धा महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. उद्योग जगत, दीर्घकाळ चालू शकणाऱ्या पद्धती राबवून अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या क्षेत्रात गुंतवणूक करू शकते. एकापेक्षा जास्त सदस्य राष्ट्र असलेल्या जागतिक संघटना विकसनशील राष्ट्रांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवू शकतात आणि सर्वात शेवटचे आणि महत्वाचे म्हणजे, नागरिकही त्यांच्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर करून या चळवळीचा एक भाग बनू शकतात, असे काही उपायही रावसाहेब पाटील दानवे यांनी या बैठकीत आपले विचार मांडताना सुचवले.
ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आणि ईटीडब्लूजीचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला आणि खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज हे देखील या बैठकीत आणि विचारविनिमयामध्ये सहभागी होते.
तिसऱ्या ईटीडब्लूजी बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मंत्रिस्तरीय परिपत्रकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीच्या निमित्ताने तीन इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये धोरणकर्ते, बहुस्तरीय संघटना, वित्तीय संस्था, व्यापारी संघटना आणि विषयतज्ञ सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी या इतर कार्यक्रमांमध्ये पुढील उपक्रमांचा समावेश होता.
कमी खर्चाचे आंतरराष्ट्रीय अर्थसाहाय्य मिळवण्याच्या उद्देशाने बहुस्तरीय विकास बँकांसोबत कार्यशाळा– बॅटरी, साठवणूक, हरित हायड्रोजन, किनारपट्टीवरील वारे, जैवऊर्जा आणि कार्बन कॅप्चर युटीलायजेशन यांसारख्या उदयोन्मुख आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी देशांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे सुनिश्चित करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.
न्याय्य संक्रमण आराखड्यावर परिसंवाद – कोळसा क्षेत्रातील संक्रमणासमोर, प्राथमिकतेने कोळशावर आधारित अर्थव्यवस्थांसमोर असलेल्या आव्हानांबाबत परिसंवादात चर्चा करण्यात आली. संस्थामक शासन, भूमी आणि पायाभूत सुविधा मालमत्ता यांचा इतर कारणांसाठी वापर, जागतिक स्तरावरील यशस्वी उपक्रमांमधील तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्याद्वारे तंत्रज्ञानात्मक आणि आर्थिक साहाय्य यावर भर देण्यात आला.
जैवइंधनावर परिसंवाद - जागतिक जैवइंधन आघाडी तयार करण्यासह जैवइंधनासंदर्भात सहकार्यविषयक आघाडी बळकट करण्याच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानासह जैवइंधनाचा विकास आणि वापर अधिक गतीने करण्याच्या उपाययोजनांवर या परिसंवादात चर्चा झाली.
या मंत्रिस्तरीय परिपत्रकाच्या मसुद्यावरील चर्चा आणि प्रगती बैठकीच्या दुसऱ्या दिवशी देखील सुरू राहील. 17 मे 2023 रोजी या तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचा समारोप होणार आहे. सदस्य देशांमधील करार आणि सहमती स्वच्छ ऊर्जा संक्रमणाबाबत जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी सहाय्यकारक ठरण्याची अपेक्षा आहे.
०००
वृत्त क्र. 1554
दिल्लीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी !
नवी दिल्ली, 15 : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती रविवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती 2023 दिल्ली यांच्यावतीने करण्यात आले. विचारमंचावर लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव, संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण, अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर, विजय काकडे, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के, प्रदीप साळुंखे उपस्थित होते.
मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुणे लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव यांनी इतिहासकालीन अनेक पैलूंचा उलगडा केला. माँ जिजाऊ यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा पाढा वाचताना विदर्भ - मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र - कोकण व दक्षिण भारत हे कार्यक्षेत्र कसे होते याबद्दल त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर म्हणाले, आमच्या समितीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असून राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वराज्य निर्मितीचा अखंड तळपणारा दीपक देशभरातील शालेय स्तरावर पोहचावा म्हणून केंद्र शासनातर्फे सुद्धा विशेष उपक्रम राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रख्यात वक्ते प्रा. प्रदीप साळुंके म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांनी सोळाव्या वर्षी लिहिलेले महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि त्यातून मांडलेली स्वराज्याची संकल्पना अत्यंत महत्त्वाची असून त्या मधून प्राप्त संदेशच खरी एकात्मतेची हाक देणार असून अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य रक्षणार्थ आपले आयुष्य वेचले. म्हणी वाक्यप्रचारातून त्यांनी आजच्या परिस्थितीवरही बोट ठेवले. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधी हार मानली नाही तोच संदेश त्यांच्या मावळ्यांनी घ्यावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
विजय काकडे, कमलेश पाटील, इंजि.तानाजी हुस्सेकर, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के यांचीही प्रबोधनपर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले, शासनातर्फे साजरे करण्यात येणारे राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती कार्यक्रमाच्या यादीमध्ये 14 मे हा दिवस छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती म्हणून समाविष्ठ केल्यामुळे राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. राष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करावी. यासह मराठा टुरिझम नावाने शिवरायांचा भौगोलिक इतिहास जोडणारा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घ्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केले. समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.राजाराम दमगीर यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सदन येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यासह या परिसरात असणाऱ्या महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सदनाच्या आतील भागात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, अर्धाकृती पुतळ्या
स पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
00000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


