Wednesday, 17 May 2023

औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?* 📕

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*
📕 *औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?* 📕
*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

जेवल्यानंतरच औषधे घ्यावी, असा एक समज समाजात आढळून येतो. गोळ्या गरम पडतात, उष्ण असतात आणि त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जेवण करून मगच औषध घ्यावे; असेही काही जणांना वाटत असते. 

औषधे केव्हा घेणे जास्त योग्य ते आता पाहू. एक मात्र नक्की की आजारी पडल्याखेरीज औषधे कधीही घेऊ नयेत. कारण आजकाल काही लोक स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनतात आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहून तापाच्या स्मरणशक्ती वाढवण्याच्या किंवा शक्ती वाढवण्याच्या गोळ्या घेतात. अर्थात याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात.

काही औषधे उपाशीपोटी म्हणजे जेवणाच्या तासभर अगोदर घेतली, तर त्याचे रक्तात शोषण चांगले होते आणि त्यांचा परिणामही चांगला घडून येतो. अशा औषधांमध्ये पेनिसिलीन, अ‍ॅम्पीसिलीन, रिफॅम्पीसीन, टेट्रासायक्लीन या जंतूनाशकांचा समावेश होतो. 

टेट्रासायक्लीन घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर तासभर तरी दूध पिऊ नये. अ‍ॅस्पीरिन, लोहयुक्त गोळ्या औषधे, जीवनसत्त्वे, एरिथ्रोमायसीन, पॅराअमायनो सॅलीसिलीक अ‍ॅसीड आदी औषधे मात्र जेवणानंतर किंवा जेवताना घ्यावीत. 

औषधांमुळे जठराच्या आवरणावर दाह निर्माण होऊन आम्लनिर्मिती वाढते. त्यामुळे मळमळ, उलट्या आदी त्रास होण्याची शक्यता असते. जेल्यूसील सारख्या गोळ्या पोट रिकामे असताना घेतल्यास त्यांचा चांगला परिणाम दिसून येतो.

औषधांबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक औषध प्रत्येक माणसा प्रमाणेच वेगळे असते. त्यामुळे ते केव्हा, कसे घ्यायचे याची डॉक्टरांकडून माहिती घ्यावी आणि मगच त्यांचा उपयोग करावा. कारण एक लक्षात ठेवा की, औषध आणि विष यांच्यात फक्त देणाऱ्याच्या हेतूचाच फरक असतो.

*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 

*संकलक - दिपक तरवडे*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺
*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi