*ज्ञान से शब्द समझ में आते हैं और अनुभव से अर्थ.... इंसान बहुत कमाल का है.., पसंद करे तो बुराई नहीं देखता, नफ़रत करे तो अच्छाई नहीं देखता!*
*नमस्कार*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
*ज्ञान से शब्द समझ में आते हैं और अनुभव से अर्थ.... इंसान बहुत कमाल का है.., पसंद करे तो बुराई नहीं देखता, नफ़रत करे तो अच्छाई नहीं देखता!*
*नमस्कार*
स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची जागतिक महिला दिनी घोषणाl.
मुंबई, दि. 8 : “देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्क रोगाने 90 हजार महिलांचा मृत्यू होतो. दर सहा मिनिटाला एक मृत्यू, अशी या रोगाची चिंताजनक आकडेवारी आहे. स्तनाच्या कर्क रोगावरील सर्व उपचार राज्य शासन मोफत करणार असल्याची घोषणा आज जागतिक महिला दिनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी नोंदणी शुल्क (केस पेपर) फी माफ करणार असल्याचेही, श्री. महाजन यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनी कामा व आलब्लेस रूग्णालय येथे स्तनाच्या कर्क रोगाबाबत जनजागृती आणि उपचार अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक दिलीप म्हैसेकर, सहसंचालक अजय चंदनवाले, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. श्री. महाजन यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्तन कर्करोगाबाबत बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये तपासणी, निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. देशात कर्क रोगामध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पूर्वी 60 ते 65 वर्षे वयातील महिलांना स्तन कर्करोग होत असे. मात्र, सध्या फास्टफूडच्या जमान्यात 25 ते 35 वर्षे वयोगटातील महिला बळी पडत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा आजारही गंभीर असून यासाठी शहरांसोबत ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांचा जीव वाचावा, त्यांचे वेळेत निदान होवून त्वरित उपचार व्हावेत, यासाठी ही स्तन कर्करोग जागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महाविद्यालयीन मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत ग्रामीण भागात जनजागृती केली जाणार आहे. रुग्णालयात जाण्यास महिला घाबरत असल्याने घरोघरी जाऊन त्यांची विचारपूस केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्तनाचा कर्करोग हा चार स्तरांपर्यंत पसरत जातो. पहिल्या दोन स्तरांवर कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णावर उपचार करणे सोपे जाते. रुग्ण वाचू शकतो. तिसऱ्या, चौथ्या स्तरावर स्तन कर्करोगाचे निदान झाल्यास सर्जरी, केमो थेरपी, रेडिएशन यानंतरही रुग्ण वाचण्याचे प्रमाण कमी आहे. आपण स्वत:ही तपासणी करू शकतो. यामुळे महिला, मुली यांनी न घाबरता स्तनाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
प्रारंभी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते कामा व आलब्लेस रूग्णालयात अत्याधुनिक आयव्हीएफ आणि युरो गायनॉकॉलॉजी सेंटरचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर बालरोग विभागाचे उद्घाटन आणि पाहणी करण्यात आली. स्तन कर्करोगाचे निदान त्वरित होण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या निदान केंद्राचे उद्घाटनही मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. स्तनाच्या कर्करोगाबाबत संपूर्ण माहिती असलेल्या प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री श्री. महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
०००
कर्करोग जनजागृती व उपचार ही काळाची गरज .
- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. ८ : “आजची बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव पाहता महिलांमध्ये स्तन कर्करोग आजार वाढत असतांना दिसत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी स्तन कर्करोग जनजागृती व त्यावर उपचार ही काळाची गरज आहे,” असे उद्गार वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी काढले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्तन कर्करोग जनजागृती व उपचार रॅलीचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते आज काळा घोडा येथे झेंडा दाखवून करण्यात आले. ही रॅली काळा घोडा, लायन गेट, ओल्ड कस्टम ऑफिस, एशियाटिक लायब्ररी, जनरल पोस्ट ऑफिस ते सेंट जॉर्ज रुग्णालयपर्यंत काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.या रॅलीत वैद्यकीय महाविद्यालयांतील २ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. वैद्यकीय महाविद्यालयातील युवक-युवतींनी स्तन कर्करोगाबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली.
वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक महिला दिनी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडुलजी, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, के.जी. मित्तल महाविद्यालयाचे सल्लागार हरिप्रसाद शर्मा, प्राचार्य अजय साळुंखे उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आज देशात 90 हजार महिला स्तन कर्करोग आजारामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. दर सहा मिनिटाला एका महिलेचा मृत्यू या आजारामुळे होत आहे. पूर्वी हा आजार 50 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये आढळून येत होता. आज हा आजार 25 ते 40 वयोगटातील तरुण महिलामध्ये आढळत आहे.
आयुर्वेदिक महाविद्यालयाची याबाबत खूप मोठी जबाबदारी आहे. या आजारावर घरच्या घरी निदान करण्यासाठी टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण, शहरी भागात आशा वर्कर, महिला बचत गट, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून याबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी शासनामार्फत प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या निदान व उपचारासाठी समर्पित दर बुधवारी दु. 12 ते 2 या दरम्यान बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात करण्यात येणार आहे. इथे उपचारासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाहीत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कुणाकडूनही पैसे प्राप्त करण्यासाठी ओटीपी देऊ नका किंवा बार कोड/ क्यूआर कोड स्कॅन करू नका किंवा एमपिन एंटर करू नका. कधीही कुणीही असा मेसेज पाठवतात किंवा असे करण्यास सांगतात तर सावध रहा. -RBI