Wednesday, 4 January 2023

साव्हत्रीच्या लेकी

 नाव : नव्या देवेंद्र कोळी

वय : 3 वर्षे 6 महिने

गावाचे नावं : नवघर कोळीवाडा, पेण

शाळा : अंगणवाडी न


वघर

राज्यातील खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे आवाहन.

 राज्यातील खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. ४ : राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी/फिल्मसिटी) केले आहे.


            महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरणायोग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मितीसंस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिद्धी होईल.


            अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org, www.filmcell.maharashtra.gov या संकेतस्थळांवर भेट देता येईल. गुगल ड्राईव्ह लिंक वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ०२२-२८४९७५५०/२८४०१५३२ या क्रमांकावर अथवा mdmfscdc@gmail.com या ई मेलवर संपर्क साधवा.


000

Promotion of Private Shootable Locations

       Filming activity requires shooting locations of both indoor as well as outdoor nature. Each script demands a unique location having salient features. Setting up Dadasaheb Phalke Chitranagari being managed by Maharashtra Film, Stage and Cultural Development Corporation Limited (popularly known as Filmcity) was a pioneering effort undertaken by Government of Maharashtra in that direction. Filmcity offers well equipped studios as well as picturesque outdoor locations for film, television serials, web series production apart from hosting prestigious events related to filming.


       Production houses/companies are always on the lookout of new locations and Maharashtra has presence of numerous such private locations that can feed to the demand of industry. In an effort to promote such private locations as shooting destinations, we have decided to invite details including photos, videos, advertorials from the owners of these locations. Selected few locations shall be promoted across various promotional platforms. This will not only help private owner earn profits but will promote destination as a tourist spot in addition to adding to the economy of local area. More information can be sought at Filmcity’s web portal at www.filmcitymumbai.org or www.filmcell.maharashtra.gov.in.


0000



लोकराज्यच्या ‘विश्व मराठी संमेलन’ विशेषांकाचे प्रकाशन

 लोकराज्यच्या ‘विश्व मराठी संमेलन’ विशेषांकाचे प्रकाशन

            मुंबई, दि. 4 : विश्व मराठी संमेलनाचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या जानेवारी-2023 च्या ‘लोकराज्य’च्या विश्व मराठी संमेलन विशेषांकाचे प्रकाशन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 


            ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे उद्घाटन झाले, यावेळी हे प्रकाशन करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, आमदार आशिष शेलार, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर - म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल आदी यावेळी उपस्थित होते.


            यापूर्वी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने वेळोवेळी ‘लोकराज्य’चे जे विविध विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले होते, त्यातील काही निवडक लेख या विशेषांकात संकलित करून पुनर्मुद्रित करण्यात आले आहेत. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या अनुषंगाने काही मूलभूत सूत्रांची मांडणी करणारे हे लेख वाचकांना नवा आनंद आणि नवी उमेद देऊन जातील.

           हा अंक माहिती व जनसंपर्कमहासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.


0000



विश्व मराठी संमेलन 2023’ चे थाटात उद्घाटन


विश्व मराठी संमेलन 2023’ चे थाटात उद्घाटन


दर दोन वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये विश्व मराठी संमेलन भरवणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई दि. 4 : "विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            'मराठी तितुका मेळवावा' या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.


            या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, आमदार आशिष शेलार, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदि मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, "मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे. मराठी माणूस या मुंबईमधून बाहेर जाता कामा नये. मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसालादेखील मुंबईत परत कसे आणता येईल, यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. आज मुंबईतले हे विश्व संमेलन खऱ्या अर्थाने आपल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याची एक सुरुवात आहे".


            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, "जी भाषा सर्वांना जोडते, जी भाषा सर्वांना सामावून घेते आणि जी भाषा जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते, माणुसकी जपते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा, यासाठी केंद्राकडे देखील पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, तसेच मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे".


            "मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने आज जगभरामध्ये सगळीकडे यशाची शिखरं गाठतोय आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण गेलो तरी मराठी भाषा कानावर पडते. या सर्व मराठी माणसांना एकत्र आणणारा दुवा म्हणून हे विश्व मराठी संमेलन आहे. मराठी भाषा आणि आपले सण, उत्सव जगभरातील मराठी माणसांना एकत्र जोडून ठेवतात, त्यामुळे गणेशोत्सव साजरा केल्याशिवाय आपल्या मराठी बांधवांना चैन पडत नाही. गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये कोरोनामुळे सगळे कामकाज ठप्प होते. आता सगळे सुरू झाले आहे, सर्व सण आपण आनंदाने एकत्रितपणे साजरे करत आहोत", असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.


मराठी ज्ञानभाषा व्हावी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            "उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विकभाषा होऊ शकणार नाही, मराठी ही ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे", असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण राज्याच्या भाषेत तयार करण्याचे सर्व राज्यांना आवाहन केले. महाराष्ट्राने त्यानुसार काम सुरू केले असून त्यात आघाडी घेतली आहे. मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचं काम राज्य शासन करीत आहे".

            "जगातल्या सर्व मराठी भाषिकांना एकत्रित आणण्याचे काम या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे", असे सांगून "जगातल्या विविध भाषांतील साहित्य मराठीमध्ये अनुवादित झाले आहे. मात्र मराठीतील साहित्य हे जगाच्या विविध भाषांत अनुवादित होऊ शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच रशिया येथे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आयोजित संमेलनास उपस्थित राहिल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

            केवळ साहित्य क्षेत्रातच नव्हे तर उद्योग क्षेत्रातही मराठी उद्योजक पुढे असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, येत्या काळामध्ये मराठी माणूस उद्योगाच्या स्टार्टअपच्या, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर पाहायला मिळेल आणि एक अतिशय चांगली इकोसिस्टीम राज्यात तयार करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

            "महाराष्ट्र उद्योगांमध्ये क्रमांक एकवर होता, क्रमांक एकवर पुन्हा आम्ही त्याला आणतो आहोत आणि भविष्यात देखील तो क्रमांक एक वरच राहील," असा विश्वास श्री.फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही - मंत्री दीपक केसरकर

            यावेळी बोलतांना मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले, "मुंबई म्हणजे मराठीची राजधानी आहे. येथे मराठी भाषा टिकली पाहिजे. मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही, हा शासनाचा निर्धार आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे".

            "मुंबईतील मरीन लाइन्स येथे मराठी भाषा भवन होणार असून तेथे मराठी भाषा विभागाची सर्व कार्यालय एका छताखाली असणार आहोत.

            "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आम्ही सर्व पुरावे विभागामार्फत केंद्र सरकारकडे सादर करणार आहोत. या संमेलनाच्या माध्यमातून परदेशस्थ मराठी उद्योजकांना प्रोत्साहित करणे, तसेच त्यांच्यापैकी ज्या उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरु करावयाचा असेल किवा भांडवली गुंतवणूक करायची असेल त्या उद्योजकांना योग्य ती शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे", अशी माहिती श्री केसरकर यांनी यावेळी दिली .

            प्रास्ताविक मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी केले तर राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.


क्षणचित्रे

· परदेशातील ४९८ मराठी मंडळांतील प्रतिनिधी, ६२ परदेशस्थ उद्योजक, परराज्यातील ४७० बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी, १६४ राज्यातील नामवंत साहित्यिक संमेलनासाठी उपस्थित लेझिम पथकांकडून उपस्थित मान्यवरांचे वाजत गाजत स्वागत.


· संपूर्ण परिसरात मराठी पेहराव केलेल्या देश विदेशातून आलेल्या मराठी प्रेमींची गर्दी


· मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या जात्यावरच्या ओव्या, रांगोळीने समजलेले तुळशी वृंदावन, खलबत्ता वापरत असणाऱ्या मराठी गृहीणींचे देखावे.


· पुस्तक विक्रीसाठी वेगवेगळी दालने


· खानदेशी, वऱ्हाडी, मराठवाडा, कोकणी अशा विविध भागातील खाद्यपदार्थांचा जेवणात समावेश.












 




 



हो जाये माला मालं

 


अजब गजब

 


सावित्रीच्या लेकी पहा


 

Featured post

Lakshvedhi