Thursday, 11 August 2022

इंडियन फ्लॅग की स्टोरी


 ये भारत देश है मेरा.जय हिंद 

ये भारत देश है मेरा


 

Tata मॅरेथॉन

 आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे        .

            मुंबई, दि. 10 : आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवाशाली परंपरा आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली ही स्पर्धा 15 जानेवारी 2023 मध्ये होणार असून या स्पर्धेसाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

            हॉटेल ट्रायडंट येथे टाटा मुंबई मॅरेथॉन नोंदणी शुभारंभाची घोषणा करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, टाटा सन्सचे ब्रँड संरक्षक हरीश भट, टाटा सन्सचे उपाध्यक्ष उज्ज्वल माथूर, आयडीएफसी बँकेचे मुख्य कार्यअधिकारी बी. माधवन, एफआय चे अध्यक्ष अदीले सुमरीवाला, वेस्टर्न नेव्हल कमांडट कृष्ण स्वामिनाथन, बीसीसीएलचे अध्यक्ष शिवकुमार सुंदरम, टाटा मोटर्सचे मार्केटींग हेड विवेक श्रीवास्तव यांसह मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा होत्या. तथापि, सध्या जनजीवन पूर्वपदावर आल्याने मोठ्या कालावधीनंतर, सर्व स्पर्धकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मॅरेथॉन २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटू आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना आता या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत 50 हजारांहून अधिक हौशी तसेच व्यावसायिक धावपटू जगभरातून सहभागी होतील, ही स्पर्धा अधिक आकर्षक होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वांना एकाच मंचावर आणण्याठी मॅरेथॉन हे एक उत्तम माध्यम आहे. सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रीटी, लोकप्रतिनिधी देखील या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवतील, अशी आशा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.

            यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. श्री. नार्वेकर, टाटा सन्सचे ब्रँड संरक्षक हरीश भट, टाटा सन्सचे उपाध्यक्ष उज्ज्वल माथूर, आयडीएफसी बँकेचे मुख्य कार्यअधिकारी बी. माधवन आदींनी मनोगत व्यक्त केले तसेच अधिकाधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

             टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी tatamumbaimarathon.procam.in या अधिकृत वेब पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन टाटा सन्सचे ब्रँड संरक्षक हरीश भट यांनी केले.

००००



कोविड प्रतिबंधक लस



 बुस्टर लसीकरणाची गती वाढवा

                                             -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई दि. ११: राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बुस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावीअशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव अंतर्गत लसीकरणाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. विधिमंडळातील समिती कक्षात सुभाष पाटील आणि अशका पवार यांना लस देण्यात आली. परिचारिका लता कोहाड यांनी त्यांना लस दिली.

            यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यासअपर मुख्य सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक दीपक कपूरआरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी एन.आरोग्य संचालक डॉ साधना तायडे आदी उपस्थित होते.

            आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाडडॉ. हेमंत बोरसेठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवारसहाय्यक संचालक डॉ संजीव जाधवडॉ. विलास साळवी यांनी संयोजन केले.

            केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवअंतर्गत सर्व शासकीय केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे. मात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीच्या दुसरी मात्रा घेऊन सहा महिने अथवा सव्वीस आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावाअशा सूचना देण्यात आल्या आहेत.

000


अधिवेशन

 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्ट पासून

            मुंबई, दि. 11 : सन 2022 चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

            मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

            दिनांक 17 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत अधिवेशन होणार असून, यामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आणि दिनांक २० आणि 21 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्ट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच, दिनांक 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

            बैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.  

Cat and mouce


 

खळखळून हसायचे नाहीं बरे


 

Featured post

Lakshvedhi