Friday, 1 July 2022

भवताल

 भवताल” मासिकाचा जून २०२२ चा अंक शेअर करत आहोत.


 


या अंकात पुढील महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे =

• कशासाठी हवीत, संवर्धन राखीव क्षेत्रे?

• ...अन्यथा संवर्धन कागदावरच राहील!

• भारतातील पानघोड्याचा शोध

• ‘पाच पायांचा’ हत्ती

• इको - अपडेट्स

• भवतालचे उपक्रम आणि बरेच काही...

या अंकासोबत अंकाचे कव्हर आणि अंकासाठी नावनोंदणी करण्याची लिंकही देत आहोत.

कव्हर आणि लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी. त्यांनाही "भवताल" मासिकासाठी नावनोंदणी करायला सांगा आणि पर्यावरण विषयाचा दर्जेदार मजकूर वाचण्याचे आवाहन करावी, ही विनंती.

नावनोंदणीसाठी लिंक-

https://bhavatal.com/connectus/masik-nondani-information

- टीम भवताल

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


अधिवेशन

 विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी

अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत 2 जुलै दुपारी 12 पर्यंत.

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 जुलै, 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक 3 जुलै रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित रहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.

००००

कृषी दिन

 कृषि दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा.

महाराष्ट्र सुजलाम- सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करू !

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कृषी दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

            महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की, हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊयात.

0000



, पाऊस आला

 


 




 

मुख्यमंत्री

 एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

 

            मुंबईदि. 30 :- महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून श्री.एकनाथ शिंदे यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

            राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर श्री. शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाचा उल्लेख करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

            या सोहळ्यास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेकेंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटीलकेंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह सर्वश्री प्रवीण दरेकरचंद्रकांत पाटीलआशिष शेलारसुधीर मुनगंटीवारगिरीश महाजनमंगलप्रभात लोढाचंद्रशेखर बावनकुळेप्रसाद लाडराधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर तसेच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवअपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहनितीन गद्रेप्रधान सचिव दीपक कपूर, मनीषा म्हैसकरविकास खारगेमुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहलएमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासपोलिस महासंचालक रजनीश सेठमुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

            पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

पदभार स्वीकारला

            त्यानंतर मंत्रालयात श्री.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.         

00000






Featured post

Lakshvedhi