Friday, 17 September 2021


 

 *ताणतणाव (डिप्रेशन) दूर करा* 


 🌹 *कारणे* 🌹


👉बदललेली जीवनशैली

👉 कौटुंबिक कलह पती-पत्नी,

सासू-सून, मुलगा-वडील इ..

👉सकारात्मक विचारांचा अभाव

👉 आजाराचे टेन्शन

👉 तामसी आहाराचे सेवन

👉 क्षणोक्षणी भावनांमध्ये बद्दल

👉 पुरेशी झोप न होणे

👉 पोट साफ नसणे

👉 चुकीचा संगती 

पूर्वी  माणसांना टेन्शन शारीरिक   असायचे. हल्ली मानसिक टेन्शन  जास्त प्रमाणात वाढलेला आहे.


*लक्षणे  ---*


१) शुल्लक  कारणावरून चिडचिड करणे रागावणे. क्षणोक्षणी मूड बदलणे अस्वस्थ   होणे .

२) जास्तच  खाणे  किंवा  अजिबात न  खाणे.

३) झोप न येणे किंवा सतत झोपलेला असणे

४) चहा, काॅफी, धुम्रपान, मद्यपान इ. व्यसन लागणे.

५) निर्णयक्षमता कमी होणे .

६) डोकेदुखी, अपचन, आम्लपित्त, मानदुखी, त्वचारोग, हृदयाची  धडधड  वाढणे, दात चावणे, बेशुद्ध होणे इ.

७) B.P.  high  होणे.  किंवा  low  होणे.

८) जास्तच थकवा येणे. कामात उत्साह नसणे सतत आळस

९) पोट साफ न होणे. लघवी थांबणे

किंवा सारखे सारखे लघवीला जावे लागणे


*होणारे परिणाम व आजार*  


१) रोगप्रतिकारकशक्ती कमी कमी होत जाते .

२) हार्टॲटॅक येणे .

३) लैंगिक समस्या निर्माण होणे .

४)  सोरायसिस (Psoriasis) सारखे त्वचाविकार होणे .

५) पुरुषांना अल्सर व हृदयरोग होतात. तर स्त्रियांना अस्वस्थता व नैराश्य  येते 

६) सतत बडबड करणे किंवा शांत राहणे

७) मधुमेहासारखे आजार जडणे

८) कुठले तरी आजार होणे व बरे न होणे

९) असंबंध कृती करणे


 *उपाय* 

१) प्रत्येक विचार सकारात्मकच करा.

२)  दुःखी होण्यापेक्षा आनंदी विचार करण्याची सवय लावा.

३) शाकाहारी राहून पौष्टिक व सात्विक आहार घ्या.

४) गरजेपेक्षा जास्त खाऊ नका. नाहीतर शारीरिक व बौद्धिक थकवा लवकर येईल.

५) एकच काम जास्त वेळ न करता, वेगवेगळी कामे करा.

६) सामाजिक संबंध वाढवा, त्यासाठी नातेवाईक, शेजारधर्म व मित्रमैत्रिणी जोडा.

७) करमणूकीकरीता छंद जोपासणे .

८) विश्रांती घ्या. ध्यानधारणा थोडावेळ तरी करा.

९) टेन्शन आल्यास भरपूर हसा किंवा रडा. टेन्शन नक्कीच कमी होणार.

१०) व्यसने केल्याने टेन्शन कमी न होता टेन्शन सहन करण्याची क्षमता नष्ट होते. 

११) नियमित ध्यान, प्राणायाम, योगा, सूर्यनमस्कार इ. करा.

१२)  टेन्शन आल्यास हातापायांचे तळवे घासा व प्रेस करा.

 *हे सोपे उपाय आहेत.*


➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

: *जिंकायची तयारी ,*

 *तिथुनच करायची .*

 *जिथे हारण्याची भीती*

 *जास्त वाटत असते ....*

             

: *कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवाने माझ्यासाठीच ठेवलं होतं.*


        *🙏🏻शुभ सकाळ🙏🏻*

 “वेडात मराठे वीर दौडले #सात”


जेष्ठ साहित्यीक कविवर्य #कुसुमाग्रजांच्या ओजस्वी लेखणीतून साकारलेल्या या रक्त सळसळणाऱ्या ओळी वाचल्या की ओळख होते कर्तबगार मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याची.हि कविता कानावर पडली की जवळ जवळ प्रत्येकालाच स्फुरण येतं अन् मराठ्यांचा ज्वलंत इतिहास डोळयासमोर उभा राहतो. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी १६७४ साली शौर्य गाजवलेला स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान.


छत्रपती शिवाजी महाराज, यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यात अनेक मातब्बर सरदार आणि लढवय्ये मराठा शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते.

त्यात हिरे ,मोती ,माणिक अशी मानवी रत्नांची खाण होती…या लढवय्या सैनिकांचे सरनोबत होते प्रताप राव गुजर यांचे खरे नाव कुडतोजी गुजर होते पण त्यांच्या असीम पराक्रमा बद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापराव ही पदवी दिली.

#प्रतापराव !


प्रताप राव गुजर खरोखरच एक कुशल रणनीतिकारक आणि कुशल सेनापती होते. त्यांनी मुघल व विजापुरी सुलतानांविरूद्ध अनेक महत्त्वपूर्ण व कित्येक निर्णायक युद्ध विजयांचे ते नायक होते.

शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते.याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. 

याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली की “खान वळवळ भारी करतो, त्यास मारोन फते करणे.महाराजांची आज्ञा घेऊन प्रतापराव आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले. बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता. 


मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने खानाला पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला चढवला. त्यानंतर झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली.पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्याने प्रतापरावांकडे गयावया करीत अभयदान मागितले प्रतापरावांचे मन द्रवले.खानाला असा हिसका दाखवल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी खात्री त्यांना वाटली आणि त्यांनी प्रार्थनेचा स्वीकार करून खानाला अभय दिले. इतकेच नाही तर त्याला कैद न करता, मुक्काम हलवण्यास वाट करून दिली.या लढाईची बातमी महाराजांना कळल्यावर ते साहजिकच चिडले. महाराजांच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका त्यांना होतीच.त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून सला काय निमित्य केला?  असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले.महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच बहलोलने हल्ले पुन्हा सुरू केले. शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली होती. यांत होणारे बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते. 


त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे.अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे. 

महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर त्यांना लागलीआणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह ते खानावर चालून गेले.


पंधरा हजार सैन्यावर हल्ला करण्यासाठी ज्यात होते, विसाजी बल्लाळ, दिपाजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोटजी, आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजरत्यातल्या एकाचेही पाय डगमगले नाहीत.पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या हवाली केले. ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले. या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले.तसेच राजारामांचा विवाह प्रतापरावांची एक कन्या जानकीबाईंशी लावला.

Thursday, 16 September 2021

 प्राथमिकता कशाला द्यायची हे विचारसरणी वर अवलंबुन असते.. नक्की वाचा..

दक्षिण आफ्रिकेचा जगप्रसिद्ध २७ वर्षाचा फुटबॉल खेळाडू सादिओ माने सेनेगल याची भारतीय चलनानुसार पाहायला गेले तर एका आठवड्याची कमाई १ करोड ४० लाख रूपये आहे. ह्या खेळाडूला अनेक वेळा लोकांनी त्याला हातात तुटलेल्या फोनसह पाहिलेले आहे. 

एक मुलाखती दरम्यान शेवटी मुलाखत घेणा-याने त्याला डिवचलेच की, तुमचा फोन तुटला आहे, तर त्यांनी सहजपणे पत्रकाराला उत्तर दिले की, "मी ठीक करून घेईल" 

परंतु पत्रकाराचे ह्या उत्तराने समाधान झाले नाही म्हणून त्याने सेनेगलला दुसरा प्रश्न विचारला की, तुम्ही नवीन फोन का घेत नाही?? त्यावर सेनेगल बोलले की, असे हजार फोन मी घेवू शकतो, १० फेरारी घेवू शकतो. २ जेट विमान खरेदी करू शकतो. डायमंडची घड्याळे खरेदी करू शकतो. 

परंतु ह्या सर्वांची मला गरज काय आहे ?? 

मी गरीब घरातूनच आलेलो आहे. गरीबी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. परंतु शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून मी शाळा, कॉलेजेस बांधले आहेत. माझ्या जवळ चांगले बुट नव्हते, तेव्हा मी विना शुज खेळत होतो. अंगावर घालण्यासाठी चांगली कपडे नव्हती. एक वेळच्या जेवणाची चिंता आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पाणी पिऊन आम्ही झोपायचो. आणि आज सर्व काही मला मिळत आहे तर त्याचा देखावा करण्याऐवजी मी माझी संपत्ती माझ्या लोकांसाठी खर्च करतो ज्यामुळे मला त्यांच्या चेह-यावरील आनंद पाहून मानसिक समाधान मिळते़़़

 *You are great if you can find your faults...*

*Greater if you can correct them...*

*But greatest if you accept & love others with their faults...*

         🌹🌹🌹🌹🌹

         *Good Morning*

 *Have a blessed Thursday*


 

Featured post

Lakshvedhi